स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष म्हणून अहिल्यानगरात सक्रिय कार्य

शेवगाव प्रतिनिधी सज्जाद पठाण 
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष म्हणून अहिल्यानगरात सक्रिय कार्य

 
अहिल्यानगर : शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर ठामपणे आवाज उठवत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष दत्तात्रय बाळकृष्ण फुंदे यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. शेतीमालाला हमीभाव, वीजदर सवलत, पाणीटंचाई आणि पीकविमा यांसारख्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर त्यांनी प्रशासनाचे लक्षन वेधले आहे.
फुंदे यांनी सांगितले की, शेतकरी हा देशाचा कणा असून त्याच्या अडचणी तात्काळ सोडवणे गरजेचे आहे. शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी संघटनेच्या माध्यमातून विविध आंदोलने आणि निवेदने देण्यात येत आहेत.
अहिल्यानगर जिल्ह्यातील अनेक भागांत त्यांनी दौरे करून शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या असून त्या सोडवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. आगामी काळात मोठ्या प्रमाणात आंदोलन छेडण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

श्री अमित नवनाथ करचे यांची राष्ट्रीय युवक अध्यक्षपदी निवड

Airtel Payments Bank च्या खातेदाराच्या वारसांना बँकेकडून 2 लाख रुपयांची आर्थिक मदत

🩸🌱 स्वर्गीय श्रीपती सावंत सर यांच्या प्रथम स्मृतीदिनानिमित्त विविध सामाजिक उपक्रम उत्साहात संपन्न 🌱🩸