पोस्ट्स

मिरज शासकीय रुग्णालयाची स्वागतम कमान बांधकामादरम्यान कोसळली; चार कामगार गंभीर जखमी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट आक्रमक

इमेज
प्रतिनिधी प्रशांत शिंदे  मिरज येथील शासकीय रुग्णालय येथील स्वागत कमान बांधकामादरम्यान कोसळून चार कामगार गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे बांधकामाच्या दर्जाबाबत गंभीर प्रश्न रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ने उपस्थित केले आहे. या प्रकरणाची तातडीने चौकशी करून संबंधित अधिकारी व ठेकेदाराची जबाबदारी निश्चित करावी. सार्वजनिक निधीचा गैरवापर किंवा बांधकामात अनियमितता आढळल्यास संबंधित ठेकेदारावर चौकशी अंती कठोर कारवाई करावी व स्ट्रक्चर ऑडिट करून संबंधित ठेकेदाराचे काळे यादीत नाव समाविष्ट करावे, अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) यांच्या वतीने करण्यात येत आहे. प्रशासनाने तातडीने कारवाई न केल्यास रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे. यावेळी उपस्थित शहर जिल्हाध्यक्ष पोपटराव कांबळे,जिल्हा कार्याध्यक्ष तथा मिरज तालुका अध्यक्ष अरविंद कांबळे,युवक जिल्हाकार्याध्यक्ष स्वप्निल खांडेकर,मिरज तालुका कार्याध्यक्ष प्रशांत शिंदे, तालुका संपर्कप्रमुख देवदास कांबळे,मिरज तालुका युवक आघाडी उपाध्यक्ष र...

सांगलीचे सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालय समोर जनता क्रांती दलाचे बेमुदत धरणे आंदोलन ‌‌

इमेज
सांगलीचे सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालय समोर जनता क्रांती दलाचे बेमुदत धरणे आंदोलन  ‌‌ कडेगाव प्रतिनिधी  अजित वायदंडे         सांगली जिल्ह्यातील बांधकाम कामगार यांना मिळणाऱ्या सेफ्टी किट असेल किट संसार उपयोगी भांडी किट यामध्ये ठेकेदाराकडून व एजंटाकडून मोठ्या प्रमाणात पैसे गोळा केले जात आहेत त्याची चौकशी करून दिलेला ठेका त्वरित रद्द करण्यासाठी सांगली जिल्हा सहाय्यक कामगार आयुक्त यांच्या कार्यालयासमोर जनता क्रांती दलाचे 2 ऑक्टोबर 2026 पासून बेमुदत धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याचे जनता क्रांती दलाचे संस्थापक अध्यक्ष मा.सत्यवान कमाने साहेब व सांगली जिल्हा अध्यक्ष मा.अजित वायदंडे यांच्या नेतृत्वाखाली प्रशासनाला निवेदन देण्यात आले महाराष्ट्र शासनाची महत्त्वकांक्षी योजना महाराष्ट्र सह सांगली जिल्ह्यात प्रभावीपणे राबवली जात असताना त्याचा लाभ सर्व सामान्य गरीब गरजू कामगारांना मिळण्यासाठी कामगार आयुक्त कार्यालय आटोकाट प्रयत्न करीत असताना परंतु ज्या ठेकेदारी संस्थांना टेंडर देण्यात आले आहे त्यामुळे अक्षरशा बांधकाम कामगारांचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक...

पाटीलवाडीत भक्तिमय कीर्तन सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न

इमेज
पाटीलवाडीत भक्तिमय कीर्तन सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न सातारा जिल्हा प्रतिनिधी सुहास पाटील  पाटीलवाडी : आशिर्वाद गणेश मंडळ, पाटीलवाडी यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला भक्तिमय कीर्तन सोहळा मंगळवार, दि. १५ सप्टेंबर २०२६ रोजी उत्साहपूर्ण आणि भक्तिमय वातावरणात संपन्न झाला. या सोहळ्यात ह. भ. प. पौर्णिमा ताई कलकुरे (आणे, कर्नाटक) यांनी आपल्या ओघवत्या वाणीतून भाविकांना भक्तिरसात चिंब भिजवले. त्यांच्या प्रभावी कीर्तनातून भक्ती, संस्कार आणि सामाजिक एकोपा यांचा संदेश देण्यात आला. कार्यक्रमाला भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. जुगाईमाता सांप्रदाय महिला भजन मंडळ, पाटीलवाडी यांची कीर्तन साथ लाभली. तसेच गायक, मृदंग, पेटी व चोपदार यांच्या सुरेल साथसंगतीमुळे कार्यक्रमाला विशेष रंगत आली. कीर्तनादरम्यान परिसरात टाळ-मृदंगाच्या गजराने आणि भक्तिगीतांनी भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते. महिला, पुरुष तसेच तरुण-तरुणींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कीर्तनाचा लाभ घेतला. “भक्तीचा वारसा जपुया, तरुणाईने आवर्जून सहभागी होऊया” या संदेशाला प्रतिसाद देत तरुणाईनेही कार्यक्रमात...

तांबवे येथे जाहीर सभेत हिंगणगावातील नागरिकांचा जाहीर शिवसेनेत पक्षप्रवेश

इमेज
तांबवे येथे जाहीर सभेत हिंगणगावातील नागरिकांचा जाहीर शिवसेनेत पक्षप्रवेश प्रतिनिधी वैष्णव ढमाळ  तांबवे : तांबवे येथे आयोजित जाहीर सभेत हिंगणगाव येथील नागरिकांचा जाहीर शिवसेनेत पक्षप्रवेश सोहळा उत्साहात पार पडला. पालकमंत्री ना. शंभूराजे देसाई तसेच जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष मा. श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली हा पक्षप्रवेश पार पडला. यावेळी सचिन हणमंत ठोंबरे, संभाजी शिवाजी झिटे, सुनील चंदर शिंदे, गोविंदा बापू शिंदे, अभिजीत बाळू शिंदे, लालासो आकुंश ठोंबरे, सुभाष ज्ञानदेव शिंदे, पोपट विलास शिंदे, सुभाष चंद्रकांत झिटे आणि तुकाराम कृष्णा ठोंबरे यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. या पक्षप्रवेश सोहळ्यास पराग भोईटे-इनामदार, नरशिंग ठोंबरे, नानासो खरात, संतोष ज्ञानदेव ठोंबरे, जयदीप भोईटे, ओंकार भोईटे, मंगेश काकडे यांच्यासह हिंगणगाव येथील बहुसंख्य नागरिक उपस्थित होते. हिंगणगावातील नागरिकांनी जाहीरपणे शिवसेनेत प्रवेश केल्याने तांबवे परिसरातील राजकीय वातावरणात या पक्षप्रवेशाची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

मेढा येथे ‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत तिरंगा ध्वज वाटप उत्साहात संपन्न

इमेज
मेढा येथे ‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत तिरंगा ध्वज वाटप उत्साहात संपन्न  जावली प्रतिनिधी मोहन खुडे  आज जावळी तालुक्याची राजधानी मेढा शहरात मेढा नगरपंचायत प्रशासन यांच्या वतीने तसेच *नामदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले महाराज साहेब सार्वजनिक बांधकाममंत्री महाराष्ट्र राज्य*, यांचे सूचनेनुसार *‘हर घर तिरंगा’* अभियानांतर्गत नागरिकांना व शालेय विद्यार्थ्यांना तिरंगा ध्वज वाटपाचा कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. या उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. मोठ्या संख्येने नागरिका व शालेय विद्यार्थी उपस्थित राहून तिरंगा ध्वज स्वीकारला.  यावेळी मेढा शहरातुन तिरंगा रॅली काढण्यात आली,‘भारत माता की जय’, ‘वंदे मातरम्’ अशा घोषणांनी मेढा शहर दुमदुमून गेले. या कार्यक्रमास जावळीचे तहसीलदार श्री प्रविण मुदगल साहेब व नायब तहसिलदार श्री मुनावळे,सौ मोहीते मॅडम,व तहसिलदार ऑफिस अधिकारी वर्ग,बीडीओ श्री महेंद्र सपाते सर,विस्तार अधिकारी श्री कर्णे सर, व पंचायत समिती अधिकारी वर्ग,मेढा शहरातील प्रथम लोकनियुक्त नगराध्यक्षा सौ रूपालीताई वारागडे, उपनगराध्यक्ष...

मेढा आगारातील अपघातांबाबत गंभीर प्रश्न; चालक-वाहकांवरील अतिरिक्त कामाचा ताण आणि बस देखभालीकडे दुर्लक्षाचा आरोप

इमेज
मेढा आगारातील अपघातांबाबत गंभीर प्रश्न; चालक-वाहकांवरील अतिरिक्त कामाचा ताण आणि बस देखभालीकडे दुर्लक्षाचा आरोप प्रतिनिधी मोहन खुडे  सदर अपघात हा विजापूर येथून रिटर्न प्रवास करताना चालकाला पुरेशी विश्रांती न मिळाल्यामुळे झाल्याचा आरोप करण्यात येत आहे. तसेच मेढा आगारातील एसटी बसगाड्यांची नियमित व योग्य पद्धतीने देखभाल केली जात नसल्याचीही गंभीर बाब समोर येत आहे. मेढा आगारामध्ये चालक व वाहकांचा इतरत्र मोठ्या प्रमाणात वापर केला जात असल्याने उपलब्ध चालक-वाहकांवर अतिरिक्त कामाचा ताण पडत असल्याचे सांगण्यात येत आहे. परिणामी, पुरेशी विश्रांती न मिळालेल्या चालकांकडून लांब पल्ल्याच्या फेऱ्या करून घेतल्या जात असल्याचा आरोप आहे. आगार प्रशासनाकडून लांब पल्ल्याच्या गाड्या रिटर्न प्रवासासाठी पुन्हा आगारात आणल्या जात असल्याने चालकांना विश्रांतीसाठी पुरेसा वेळ मिळत नसल्याचेही सांगितले जात आहे. या सर्व बाबींचा परिणाम प्रवासी सुरक्षेवर होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. विशेष म्हणजे, मागील महिन्यापासून मेढा आगाराच्या एसटी बसगाड्यांचे जवळपास चार अपघात झाल्याचे सांगण्यात येत असून, त्यापैकी सदर...

तांबवे येथे विविध विकासकामांचे भूमिपूजन व उद्घाटन; नवनिर्वाचित सदस्यांचा सत्कार समारंभ

इमेज
तांबवे येथे विविध विकासकामांचे भूमिपूजन व उद्घाटन; नवनिर्वाचित सदस्यांचा सत्कार समारंभ फलटण | प्रतिनिधी वैष्णव ढमाळ  फलटण तालुक्यातील तांबवे येथे विविध विकासकामांचे भूमिपूजन, उद्घाटन तसेच शिवसेना शाखेच्या उद्घाटनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. यासोबतच जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या नवनिर्वाचित सदस्यांचा सत्कार समारंभही यावेळी होणार आहे. हा कार्यक्रम शनिवार, दि. १५ ऑगस्ट २०२६ रोजी सायंकाळी ४.३० वाजता , तांबवे येथील भैरवनाथ मंदिर सभामंडप येथे आयोजित करण्यात आला आहे. कार्यक्रमास महाराष्ट्र राज्याचे पर्यटन व खनिकर्म मंत्री तथा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री मा. ना. शंभूराज देसाई यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. तसेच मा. आ. श्रीमंत रामराजे नाईक-निंबाळकर यांच्यासह विविध मान्यवरांची उपस्थिती लाभणार आहे. कार्यक्रमास फलटण विधानसभा मतदारसंघाचे आमदार मा. श्री. दीपकराव चव्हाण , तसेच फलटण नगरपरिषद, पंचायत समिती, जिल्हा परिषद आणि विविध स्थानिक संस्थांमधील पदाधिकारी व लोकप्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. शिवसेना महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष मा. सौ. रेश्माताई भोसले यांच्यास...