महाबळेश्वर बसस्थानकातील वाहतूक निरीक्षकाच्या मुजोरीचा डिजिप्रेस मिडिया संघटना महाराष्ट्र राज्यकडून तीव्र निषेध
महाबळेश्वर बसस्थानकातील वाहतूक निरीक्षकाच्या मुजोरीचा डिजिप्रेस मिडिया संघटना महाराष्ट्र राज्यकडून तीव्र निषेध
महाबळेश्वर बसस्थानकात एका वाहतूक निरीक्षकाने प्रवाशांसमोर पत्रकाराला धमकी देत अरेरावीची भाषा वापरल्याचा तसेच पत्रकारांबाबत अवमानकारक वक्तव्य केल्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेचा Digipress Media Association (डिजिप्रेस मिडिया संघटना महाराष्ट्र राज्य) यांनी तीव्र शब्दांत निषेध व्यक्त केला आहे.
संघटनेचे संस्थापक अध्यक्ष वैष्णव मनोज ढमाळ तसेच राष्ट्रीय उपाध्यक्ष सुहास पाटील यांनी संयुक्त निवेदनाद्वारे सांगितले की, पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ असून पत्रकारांबाबत अपमानास्पद वक्तव्य करणे व धमकी देणे हे अत्यंत निषेधार्ह आहे.
संबंधित वाहतूक निरीक्षकाने पत्रकारांचा अवमान केल्याचा आरोप गंभीर असून या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषी अधिकाऱ्यावर तात्काळ व कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. पत्रकारांच्या सन्मानाला धक्का पोहोचवणाऱ्या कोणत्याही प्रकाराला संघटना खपवून घेणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.
डिजिप्रेस मिडिया संघटना महाराष्ट्र राज्यने राज्यातील सर्व पत्रकार, पत्रकार संघटना आणि सामाजिक संस्थांनी या घटनेचा निषेध नोंदवून पत्रकारांच्या हक्क व सन्मानासाठी एकजूट दाखवावी, असे आवाहन केले आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा