पोस्ट्स

जुलै, २०२६ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

कराड तालुक्यातील म्हासोली (शेवाळेवाडी) येथे युवकांमध्ये अमली पदार्थांच्या व्यसनाबाबत नागरिकांची चिंता

इमेज
कराड तालुक्यातील म्हासोली (शेवाळेवाडी) येथे युवकांमध्ये अमली पदार्थांच्या व्यसनाबाबत नागरिकांची चिंता कराड | प्रतिनिधी सुहास पाटील  कराड तालुक्यातील म्हासोली (शेवाळेवाडी) या गावात काही युवक व अल्पवयीन मुलांमध्ये गांजाचे सेवन वाढत असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. यामुळे गावातील पालक आणि नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, काही महिन्यांपूर्वी अशा प्रकारच्या व्यसनाधीन युवकांची संख्या दोन ते तीन इतकी होती. मात्र आता ती वाढून आठ ते दहा जणांपर्यंत पोहोचल्याचा दावा करण्यात येत आहे. या प्रकारामुळे इतर युवक आणि शालेय वयातील मुलांवरही विपरीत परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. ग्रामपंचायतीचे सरपंच व सदस्य बरखास्त झाल्यानंतर गावात प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच, या प्रकरणाची माहिती संबंधित यंत्रणांना असूनही आवश्यक ती कारवाई होत नसल्याचा आरोप काही नागरिकांनी केला आहे. गावातील नागरिकांनी कराड तालुका पोलीस, स्थानिक प्रशासन व अमली पदार्थविरोधी पथकाने या प्रकरणाची तातडीने चौकशी करून दोषी आढळणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी,...

३५ ते ४० वर्षांचा वनवास संपणार कधी? दुधगाव आरोग्य उपकेंद्राची उभारणी अजूनही रखडली; नागरिकांमध्ये संताप

इमेज
३५ ते ४० वर्षांचा वनवास संपणार कधी? दुधगाव आरोग्य उपकेंद्राची उभारणी अजूनही रखडली; नागरिकांमध्ये संताप प्रतिनिधी गेल्या ३५ ते ४० वर्षांपासून दुधगाव परिसरातील नागरिक आरोग्य उपकेंद्राच्या प्रतीक्षेत आहेत. अनेक वर्षांपूर्वी मंजूर झालेल्या दुधगाव आरोग्य उपकेंद्राच्या इमारतीचे काम आजतागायत पूर्ण झाले नसल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. दुधगावसह परिसरातील नागरिकांना प्राथमिक आरोग्य सेवांसाठी दूरवर जावे लागत असल्याने विशेषतः गर्भवती महिला, ज्येष्ठ नागरिक, लहान मुले आणि आपत्कालीन रुग्णांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. आरोग्य सुविधा गावात उपलब्ध नसल्याने वेळ आणि आर्थिक खर्च वाढत असून नागरिकांचे हाल होत आहेत. स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, आरोग्य उपकेंद्राच्या इमारतीसाठी जागा उपलब्ध असूनही बांधकाम रखडले आहे. अनेकदा संबंधित विभाग आणि लोकप्रतिनिधींकडे पाठपुरावा करूनही ठोस कार्यवाही झालेली नाही. त्यामुळे प्रशासनाच्या उदासीन भूमिकेबाबत ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला आहे. दुधगावच्या नागरिकांनी तातडीने आरोग्य उपकेंद्राच्या इमारतीचे रखडलेले काम पूर्ण करून उपकेंद्र क...
इमेज

पुणे जिल्ह्यात रेड अलर्ट; उद्या सर्व शाळांना सुट्टी*

प्रतिनिधी गौरव दिवेकर : भारतीय हवामान विभागाने (IMD) ६ जुलै २०२६ रोजी पुणे जिल्ह्यासाठी 'रेड अलर्ट' जारी केला असून, संभाव्य अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा विचार करून जिल्ह्यातील सर्व शाळांना सोमवार, ६ जुलै रोजी सुट्टी जाहीर करण्यात आली असल्याची माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिली. हवामान विभागाने जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा दिल्यामुळे प्रशासनाने सर्व संबंधित यंत्रणांना सतर्क राहण्याचे निर्देश दिले आहेत. आपत्कालीन परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी यंत्रणा सज्ज ठेवण्यात आल्या असून, नागरिकांनीही खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी नागरिकांना अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडणे टाळावे, नदी, नाले, पूरप्रवण भाग तसेच धोकादायक ठिकाणांपासून दूर राहावे, असे आवाहन केले आहे. तसेच स्थानिक प्रशासन, आपत्ती व्यवस्थापन विभाग आणि हवामान विभागाकडून वेळोवेळी दिल्या जाणाऱ्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्याचेही त्यांनी सांगितले. दरम्यान, संभाव्य अतिवृष्टीच्या पार्श्वभ...

जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर अंगणवाडी सेविकेची उत्तुंग झेप; सौ. दिपाली शिंदे यांची 'वैद्यकीय अधीक्षक' पदावर निवड!

इमेज
दौंड: प्रतिनिधी :अमोल शिंदे  जिद्द, मेहनत आणि काहीतरी करून दाखवण्याची चिकाटी असेल, तर कोणतीही परिस्थिती यशाच्या आड येऊ शकत नाही, हे दौंड तालुक्यातील गलांडवाडी गावच्या सूनेने सिद्ध करून दाखवले आहे. गलांडवाडी गावच्या सून आणि अंगणवाडी सेविका म्हणून कार्यरत असणाऱ्या सौ. दिपाली संदीप शिंदे यांची वैद्यकीय संशोधन व आयुष विभागात 'समाजसेवा अधीक्षक (वैद्यकीय) / वैद्यकीय अधीक्षक' या अत्यंत प्रतिष्ठेच्या पदावर निवड झाली आहे. वयाच्या ३८ व्या वर्षी त्यांनी मिळवलेले हे यश ग्रामीण भागातील महिलांसाठी एक अत्यंत प्रेरणादायी उदाहरण ठरले आहे. अंगणवाडी सेविका ते वैद्यकीय अधीक्षक थक्क करणारा प्रवास सौ. दिपाली शिंदे यांनी कौटुंबिक जबाबदाऱ्या सांभाळत, अंगणवाडी सेविका म्हणून समाजसेवा करत आपले उद्दिष्ट डोळ्यांसमोर ठेवले होते. शासकीय सेवेतील हे मोठे पद मिळवण्यासाठी त्यांनी घेतलेले परिश्रम थक्क करणारे आहेत. वयाच्या ३८ व्या वर्षी, जेव्हा अनेकजण आपल्या करिअरमध्ये स्थिरावलेले असतात, अशा काळात दिपाली यांनी स्पर्धा परीक्षा आणि कठीण कौशल्यांच्या जोरावर हे यश खेचून आणले आहे. गलांडवाडी गावाचे नाव उंचाव...