पोस्ट्स

ऑगस्ट, २०२६ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

तांबवे येथे जाहीर सभेत हिंगणगावातील नागरिकांचा जाहीर शिवसेनेत पक्षप्रवेश

इमेज
तांबवे येथे जाहीर सभेत हिंगणगावातील नागरिकांचा जाहीर शिवसेनेत पक्षप्रवेश प्रतिनिधी वैष्णव ढमाळ  तांबवे : तांबवे येथे आयोजित जाहीर सभेत हिंगणगाव येथील नागरिकांचा जाहीर शिवसेनेत पक्षप्रवेश सोहळा उत्साहात पार पडला. पालकमंत्री ना. शंभूराजे देसाई तसेच जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष मा. श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली हा पक्षप्रवेश पार पडला. यावेळी सचिन हणमंत ठोंबरे, संभाजी शिवाजी झिटे, सुनील चंदर शिंदे, गोविंदा बापू शिंदे, अभिजीत बाळू शिंदे, लालासो आकुंश ठोंबरे, सुभाष ज्ञानदेव शिंदे, पोपट विलास शिंदे, सुभाष चंद्रकांत झिटे आणि तुकाराम कृष्णा ठोंबरे यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. या पक्षप्रवेश सोहळ्यास पराग भोईटे-इनामदार, नरशिंग ठोंबरे, नानासो खरात, संतोष ज्ञानदेव ठोंबरे, जयदीप भोईटे, ओंकार भोईटे, मंगेश काकडे यांच्यासह हिंगणगाव येथील बहुसंख्य नागरिक उपस्थित होते. हिंगणगावातील नागरिकांनी जाहीरपणे शिवसेनेत प्रवेश केल्याने तांबवे परिसरातील राजकीय वातावरणात या पक्षप्रवेशाची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

मेढा येथे ‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत तिरंगा ध्वज वाटप उत्साहात संपन्न

इमेज
मेढा येथे ‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत तिरंगा ध्वज वाटप उत्साहात संपन्न  जावली प्रतिनिधी मोहन खुडे  आज जावळी तालुक्याची राजधानी मेढा शहरात मेढा नगरपंचायत प्रशासन यांच्या वतीने तसेच *नामदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले महाराज साहेब सार्वजनिक बांधकाममंत्री महाराष्ट्र राज्य*, यांचे सूचनेनुसार *‘हर घर तिरंगा’* अभियानांतर्गत नागरिकांना व शालेय विद्यार्थ्यांना तिरंगा ध्वज वाटपाचा कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. या उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. मोठ्या संख्येने नागरिका व शालेय विद्यार्थी उपस्थित राहून तिरंगा ध्वज स्वीकारला.  यावेळी मेढा शहरातुन तिरंगा रॅली काढण्यात आली,‘भारत माता की जय’, ‘वंदे मातरम्’ अशा घोषणांनी मेढा शहर दुमदुमून गेले. या कार्यक्रमास जावळीचे तहसीलदार श्री प्रविण मुदगल साहेब व नायब तहसिलदार श्री मुनावळे,सौ मोहीते मॅडम,व तहसिलदार ऑफिस अधिकारी वर्ग,बीडीओ श्री महेंद्र सपाते सर,विस्तार अधिकारी श्री कर्णे सर, व पंचायत समिती अधिकारी वर्ग,मेढा शहरातील प्रथम लोकनियुक्त नगराध्यक्षा सौ रूपालीताई वारागडे, उपनगराध्यक्ष...

मेढा आगारातील अपघातांबाबत गंभीर प्रश्न; चालक-वाहकांवरील अतिरिक्त कामाचा ताण आणि बस देखभालीकडे दुर्लक्षाचा आरोप

इमेज
मेढा आगारातील अपघातांबाबत गंभीर प्रश्न; चालक-वाहकांवरील अतिरिक्त कामाचा ताण आणि बस देखभालीकडे दुर्लक्षाचा आरोप प्रतिनिधी मोहन खुडे  सदर अपघात हा विजापूर येथून रिटर्न प्रवास करताना चालकाला पुरेशी विश्रांती न मिळाल्यामुळे झाल्याचा आरोप करण्यात येत आहे. तसेच मेढा आगारातील एसटी बसगाड्यांची नियमित व योग्य पद्धतीने देखभाल केली जात नसल्याचीही गंभीर बाब समोर येत आहे. मेढा आगारामध्ये चालक व वाहकांचा इतरत्र मोठ्या प्रमाणात वापर केला जात असल्याने उपलब्ध चालक-वाहकांवर अतिरिक्त कामाचा ताण पडत असल्याचे सांगण्यात येत आहे. परिणामी, पुरेशी विश्रांती न मिळालेल्या चालकांकडून लांब पल्ल्याच्या फेऱ्या करून घेतल्या जात असल्याचा आरोप आहे. आगार प्रशासनाकडून लांब पल्ल्याच्या गाड्या रिटर्न प्रवासासाठी पुन्हा आगारात आणल्या जात असल्याने चालकांना विश्रांतीसाठी पुरेसा वेळ मिळत नसल्याचेही सांगितले जात आहे. या सर्व बाबींचा परिणाम प्रवासी सुरक्षेवर होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. विशेष म्हणजे, मागील महिन्यापासून मेढा आगाराच्या एसटी बसगाड्यांचे जवळपास चार अपघात झाल्याचे सांगण्यात येत असून, त्यापैकी सदर...

तांबवे येथे विविध विकासकामांचे भूमिपूजन व उद्घाटन; नवनिर्वाचित सदस्यांचा सत्कार समारंभ

इमेज
तांबवे येथे विविध विकासकामांचे भूमिपूजन व उद्घाटन; नवनिर्वाचित सदस्यांचा सत्कार समारंभ फलटण | प्रतिनिधी वैष्णव ढमाळ  फलटण तालुक्यातील तांबवे येथे विविध विकासकामांचे भूमिपूजन, उद्घाटन तसेच शिवसेना शाखेच्या उद्घाटनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. यासोबतच जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या नवनिर्वाचित सदस्यांचा सत्कार समारंभही यावेळी होणार आहे. हा कार्यक्रम शनिवार, दि. १५ ऑगस्ट २०२६ रोजी सायंकाळी ४.३० वाजता , तांबवे येथील भैरवनाथ मंदिर सभामंडप येथे आयोजित करण्यात आला आहे. कार्यक्रमास महाराष्ट्र राज्याचे पर्यटन व खनिकर्म मंत्री तथा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री मा. ना. शंभूराज देसाई यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. तसेच मा. आ. श्रीमंत रामराजे नाईक-निंबाळकर यांच्यासह विविध मान्यवरांची उपस्थिती लाभणार आहे. कार्यक्रमास फलटण विधानसभा मतदारसंघाचे आमदार मा. श्री. दीपकराव चव्हाण , तसेच फलटण नगरपरिषद, पंचायत समिती, जिल्हा परिषद आणि विविध स्थानिक संस्थांमधील पदाधिकारी व लोकप्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. शिवसेना महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष मा. सौ. रेश्माताई भोसले यांच्यास...

आलोक आश्विन शेटे यांची सातारा जिल्हा उपाध्यक्षपदी नियुक्ती

इमेज
आलोक आश्विन शेटे यांची सातारा जिल्हा उपाध्यक्षपदी नियुक्ती सातारा | प्रतिनिधी सुहास पाटील  डिजिप्रेस मीडिया संघ – इंटरनॅशनल विंगच्या वतीने आलोक आश्विन शेटे, रा. सातारा, ता. सातारा, जि. सातारा यांची सातारा जिल्हा उपाध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. संघटनेची ध्येय-धोरणे व उद्दिष्टे तळागाळापर्यंत पोहोचविणे, संघटनेचा जिल्ह्यात विस्तार करणे तसेच पत्रकार व माध्यम क्षेत्रातील व्यक्तींच्या विविध प्रश्नांसाठी कार्य करणे, या उद्देशाने ही नियुक्ती करण्यात आली आहे. आलोक आश्विन शेटे यांच्या सामाजिक व संघटनात्मक कार्याची दखल घेत त्यांच्यावर ही जबाबदारी सोपविण्यात आली असून, ते संघटनेच्या माध्यमातून सातारा जिल्ह्यात संघटनात्मक कार्याला अधिक बळकटी देतील, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे. त्यांच्या नियुक्तीबद्दल डिजिप्रेस मीडिया संघ – इंटरनॅशनल विंगच्या पदाधिकारी व सदस्यांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.

MSME उद्योगांना मोठा दिलासा; थकीत देयके वसुलीला अधिक बळTReDSद्वारे बिल सेटलमेंट, MSEFCची संख्या वाढविण्याचा मार्ग मोकळा; नियमभंगासाठी गुन्हेगारी शिक्षेऐवजी टप्प्याटप्प्याने नागरी दंड

MSME उद्योगांना मोठा दिलासा; थकीत देयके वसुलीला अधिक बळ TReDSद्वारे बिल सेटलमेंट, MSEFCची संख्या वाढविण्याचा मार्ग मोकळा; नियमभंगासाठी गुन्हेगारी शिक्षेऐवजी टप्प्याटप्प्याने नागरी दंड नवी दिल्ली | प्रतिनिधी सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना (MSME) वेळेवर पेमेंट मिळावे, थकीत देयकांची वसुली जलद व्हावी आणि उद्योगांसाठी अधिक सुलभ व विश्वासाधारित नियामक व्यवस्था निर्माण व्हावी, यासाठी MSMED Act मध्ये महत्त्वपूर्ण सुधारणा करण्यात आल्या आहेत. या सुधारणांमुळे MSME क्षेत्राला मोठा दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे. सुविधा परिषद (Facilitation Council) किंवा कलम 18 अंतर्गत मध्यस्थी सेवा प्रदाता अथवा अन्य पर्यायी विवाद निवारण संस्थेमार्फत झालेला मध्यस्थी समझोता करार किंवा लवादाचा निवाडा याची रक्कम आता ‘जमीन महसुलाची थकबाकी’ (Arrear of Land Revenue) म्हणून वसूल करण्याची तरतूद करण्यात आली आहे. संबंधित खरेदीदाराची मालमत्ता ज्या अधिकारक्षेत्रात आहे, त्या ठिकाणी जिल्हाधिकारी, उपायुक्त किंवा अधिसूचित प्राधिकरणामार्फत ही रक्कम वसूल करता येणार आहे. त्यामुळे MSME उद्योगांच्या थकीत देयकांच्या वसुलीला अधिक प्रभाव...

कर्जमाफी योजनांमुळे प्रामाणिक शेतकऱ्यांवर अन्याय?

कर्जमाफी योजनांमुळे प्रामाणिक शेतकऱ्यांवर अन्याय? प्रतिनिधी सुहास पाटील  महाराष्ट्रात प्रत्येक विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विविध राजकीय पक्ष शेतकरी कर्जमाफीचे आश्वासन देताना दिसतात. शेतकऱ्यांना दिलासा देण्याच्या उद्देशाने अशा योजना जाहीर केल्या जात असल्या, तरी त्यांचा लाभ नेमका कोणाला होतो, हा विचार करण्यासारखा प्रश्न आहे. अनेक शेतकरी दरवर्षी राष्ट्रीयीकृत बँका किंवा गावातील विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांकडून पीककर्ज घेतात. शासनाच्या व नाबार्डच्या व्याज सवलत योजनांनुसार, पीककर्जाची वेळेत परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ३ टक्के किंवा काही योजनांमध्ये शून्य टक्के व्याजाचा लाभ मिळतो. त्यामुळे अनेक प्रामाणिक शेतकरी वेळेत कर्ज फेडण्याचा प्रयत्न करतात. मात्र, काही शेतकरी भविष्यात कर्जमाफीची घोषणा होईल, या अपेक्षेने कर्जाची परतफेड टाळतात. कारण पूर्वीच्या अनेक कर्जमाफी योजनांचा लाभ प्रामुख्याने थकीत कर्जदारांनाच मिळाल्याची भावना ग्रामीण भागात निर्माण झाली आहे. परिणामी, नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना अन्याय झाल्याची भावना व्यक्त केली जाते. खरे तर, वेळेवर कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ...