पोस्ट्स

जून, २०२६ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

संदीप ठवाळ यांची 'ग्रामविकास अधिकारी युनियन'च्या दौंड तालुका अध्यक्षपदी बिनविरोध निवड!

इमेज
 (प्रतिनिधी):अमोल शिंदे  दौंड तालुक्यातील गलांडवाडी गावचे कर्तव्यदक्ष ग्रामविकास अधिकारी श्री. संदीप ठवाळ यांची 'ग्रामविकास अधिकारी युनियन, दौंड'च्या तालुका अध्यक्षपदी जाहीर निवड करण्यात आली आहे. त्यांच्या या निवडीमुळे संपूर्ण तालुक्यातून आणि शासकीय वर्तुळातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. गलांडवाडी (ता. दौंड, जि. पुणे) येथे ग्रामविकास अधिकारी म्हणून कार्यरत असताना, संदीप ठवाळ यांनी आपल्या अष्टपैलू आणि कुशल प्रशासकीय कौशल्याच्या जोरावर अनेक लोकोपयोगी कामे यशस्वीरित्या पूर्ण केली आहेत. त्यांची कामावरील निष्ठा आणि सर्व सहकाऱ्यांना सोबत घेऊन जाण्याची वृत्ती लक्षात घेऊन, युनियनच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी आणि सदस्यांनी एकमुखाने ही जबाबदारी त्यांच्या खांद्यावर सोपवली आहे. "तालुक्यातील ग्रामविकासाला नवी गती मिळणार" संदीप ठवाळ भाऊसाहेब यांच्या कुशल नेतृत्वाखाली आगामी काळात दौंड तालुक्यातील ग्रामविकासाच्या कामांना अधिक गती मिळेल, तसेच ग्रामविकास अधिकाऱ्यांचे प्रश्न आणि समस्या प्राधान्याने सुटतील, असा विश्वास युनियनच्या सर्व सदस्यांनी व ग्रामस्थांनी व्यक्त क...

संजय दिना पाटील यांच्या वक्तव्यावर मुख्यमंत्री यांनी तात्काळ कायदेशीर कारवाई करावी – पत्रकार संघटनांची मागणी

इमेज
ब्रेकिंग न्यूज | जाहीर निषेध व मागणी संजय दिना पाटील यांच्या वक्तव्यावर मुख्यमंत्री यांनी तात्काळ  कारवाई करावी – पत्रकार संघटनांची मागणी मुंबई/प्रतिनिधी – पत्रकारांशी कथित गैरवर्तन, शिवीगाळ व धमकीच्या प्रकरणावरून खासदार Sanjay Dina Patil यांच्या विरोधात राज्यभरातून तीव्र संताप व्यक्त होत आहे. या प्रकरणाची तात्काळ दखल घेऊन मुख्यमंत्री Devendra Fadnavis यांनी लवकरात लवकर  कारवाई करावी, अशी जोरदार मागणी विविध पत्रकार संघटनांकडून करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर डिजिप्रेस मीडिया संघटना महाराष्ट्र राज्य यांनीही जाहीर निषेध नोंदविला असून, पत्रकारांच्या सन्मान व सुरक्षिततेसाठी कठोर पावले उचलावीत, अशी मागणी केली आहे. संघटनेने स्पष्ट केले आहे की, पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ असून त्यांच्यावर दबाव, धमकी किंवा अपमान सहन केला जाणार नाही. संबंधित प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणीही करण्यात आली आहे. मागण्या: तात्काळ  कारवाई करावी पत्रकार सुरक्षेची हमी द्यावी गैरवर्तन करणाऱ्यांवर कठोर पावले उचलावीत – डिजिप्रेस मीडिया संघटना महाराष्ट्र रा...

क्रांतिसिंह नाना पाटील हायस्कूल, सरडे येथे आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा

इमेज
क्रांतिसिंह नाना पाटील हायस्कूल, सरडे येथे आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा फलटण प्रतिनिधी उमेश धुमाळ  सरडे, ता. फलटण: 11वा आंतरराष्ट्रीय योग दिन सोमवार दि. 21 जून 2026 रोजी क्रांतिसिंह नाना पाटील हायस्कूल, सरडे येथे उत्साहात साजरा करण्यात आला. 'एक पृथ्वी, एक आरोग्यासाठी योग' या संकल्पनेनुसार विद्यार्थ्यांनी योगाभ्यास केला.  कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. अनिल खलाटे सर होते. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. क्रीडाशिक्षक श्री. आप्पासाहेब वाघमोडे सर यांनी विद्यार्थ्यांना योगासनांचे प्रात्यक्षिक करून दाखवले. ताडासन, वृक्षासन, त्रिकोणासन, भुजंगासन, शवासन तसेच प्राणायाम, अनुलोम-विलोम यांचे महत्त्व पटवून दिले. "रोज 20 मिनिटे योग केल्याने शारीरिक व मानसिक आरोग्य चांगले राहते, एकाग्रता वाढते," असे त्यांनी सांगितले. यावेळी जेष्ठ शिक्षक श्री. देवकाते सर, श्री. एजगर सर, श्री. पाटील सर व श्री. बेलदार सर यांनी विद्यार्थ्यांबरोबर योगाभ्यासात सहभाग घेतला. शिंदे मॅडम, विरणक मॅडम व मोर...

देवनागरी अक्षरे ओळखणाऱ्या तंत्रसाधनाच्या पेटंटला भारत सरकारची मान्यताप्रा. डॉ. ज्योती माने यांची उल्लेखनीय कामगिरी

इमेज
वरवंड, प्रतिनिधी :  वरवंड (ता. दौंड) येथील एकनाथ सीताराम दिवेकर महाविद्यालयाच्या मराठी विभागातील प्राध्यापक डॉ. ज्योती माने यांनी विकसित केलेल्या "Device for Devnagari Characters Recognition" (देवनागरी अक्षरे ओळखणारे तंत्रसाधन) या संशोधनाधारित शोधाला भारत सरकारकडून पेटंट मान्यता प्राप्त झाली आहे. या यशामुळे महाविद्यालयासह संपूर्ण शैक्षणिक क्षेत्रात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. देवनागरी लिपी ही भारतातील सर्वाधिक वापरल्या जाणाऱ्या लिपींपैकी एक असून हिंदी, मराठी, संस्कृतसह अनेक भाषांमध्ये तिचा वापर केला जातो. या लिपीतील अक्षरे, शब्द, वाक्ये, जोडाक्षरे, संयुक्त अक्षरे आणि विविध चिन्हे अचूकपणे ओळखून त्यांचे डिजिटल स्वरूपात रूपांतर करण्यासाठी डॉ. माने यांनी हे अत्याधुनिक तंत्रसाधन विकसित केले आहे. या प्रणालीमध्ये उच्च क्षमतेचा कॅमेरा मॉड्यूल, संगणकीय यंत्रणा, कृत्रिम बुद्धिमत्ता (AI), मशीन लर्निंग (ML), ऑप्टिकल कॅरेक्टर रिकग्निशन (OCR) मॉड्यूल, डिस्प्ले युनिट, डेटा संचयन मेमरी, तसेच वापरकर्ता नियंत्रण प्रणालीचा समावेश आहे. त्यामुळे छापील, कोरलेले किंवा हस्तलिखित स्...

महाराष्ट्र रक्षक न्यूज’ हे डिजिप्रेस मीडिया संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या अंतर्गत अधिकृत डिजिटल न्यूज चॅनेल; अधिकृत पत्र जारी

इमेज
‘महाराष्ट्र रक्षक न्यूज’ हे डिजिप्रेस मीडिया संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या अंतर्गत अधिकृत डिजिटल न्यूज चॅनेल; अधिकृत पत्र जारी पुणे | प्रतिनिधी : अमोल शिंदे  डिजिप्रेस मीडिया संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने ‘महाराष्ट्र रक्षक न्यूज’ हे संघटनेच्या अंतर्गत अधिकृत डिजिटल न्यूज चॅनेल म्हणून कार्यरत असल्याबाबत अधिकृत पत्र जारी करण्यात आले आहे. संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष वैष्णव ढमाळ यांनी दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्र रक्षक न्यूज हे संघटनेचे अधिकृत वृत्तमाध्यम असून राज्यभरातील सामाजिक, शैक्षणिक, प्रशासकीय, सांस्कृतिक तसेच जनहिताच्या विषयांवरील बातम्या सत्य, निष्पक्ष आणि जबाबदारीने जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य करणार आहे. अधिकृत पत्रानुसार, संघटनेच्या सर्व उपक्रम, निवेदने, पत्रकार परिषद, सामाजिक अभियान, कार्यक्रम तसेच विविध घडामोडींचे अधिकृत वृत्तांकन यापुढे महाराष्ट्र रक्षक न्यूज या माध्यमातून प्रकाशित व प्रसारित करण्यात येणार आहे. राष्ट्रीय अध्यक्ष वैष्णव ढमाळ यांनी सर्व पदाधिकारी, सदस्य, पत्रकार प्रतिनिधी व नागरिकांना आवाहन केले आहे की, संघटनेशी संबंधित अधिकृत मा...

नेताजी शिक्षण संस्थेच्या विद्यालयात रंगला 'नवगतांचा प्रवेशोत्सव', पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांचे उत्साहात स्वागत!

इमेज
नवनाथ खोपडे-प्रतिनिधी:-केडगाव  (दौंड)नेताजी शिक्षण संस्थेच्या विद्यालयात नुकताच इयत्ता पाचवी ते दहावीच्या नवीन विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सव आणि स्वागत समारंभ अत्यंत उत्साहात व आनंदमय वातावरणात संपन्न झाला. नवीन शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीला शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांचे स्वागत करून त्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आनंदाने सामील करून घेण्याच्या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण म्हणजे शाळेच्या प्रांगणात काढलेली आकर्षक रांगोळी आणि लाल-पांढऱ्या फुग्यांची सुंदर कमान, ज्याने संपूर्ण परिसर सुशोभित केला होता.  मान्यवरांची प्रमुख उपस्थिती आणि मार्गदर्शन या सोहळ्याचे अध्यक्षपद नेताजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष माननीय श्री. सुनीलआण्णा निंबाळकर यांनी भूषवले. तर संस्थेचे सचिव माननीय श्री. धनाजी शेळके-पाटील यांची याप्रसंगी प्रमुख उपस्थिती होती. मान्यवरांच्या हस्ते नवीन प्रवेश घेतलेल्या चिमुकल्या विद्यार्थ्यांना गुलाबपुष्प व मुलांचे फुले टाकून स्वागत करण्यात आले आणि शैक्षणिक पुस्तके देऊन त्यांचे उत्साहात स्वागत करण्यात आले. यावे...

शारदा सदन प्राथमिक शाळेत चिमुरड्यांचा 'प्रवेशोत्सव' उत्साहात संपन्न!

इमेज
नवनाथ खोपडे-प्रतिनिधी:-केडगाव: दीर्घ उन्हाळी सुटीनंतर नवीन शैक्षणिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी, केडगाव येथील 'शारदा सदन प्राथमिक शाळा' येथे इयत्ता पहिली आणि बालवाडीत प्रवेश घेतलेल्या चिमुरड्यांचे अत्यंत उत्साहात आणि जल्लोषात स्वागत करण्यात आले. या अभिनव 'प्रवेशोत्सवा'मुळे शाळेत येणाऱ्या नवोदित विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद आणि उत्साह पाहायला मिळाला. फुगे आणि फुलांची आकर्षक सजावट सकाळी ठीक १० वाजता शाळेच्या मुख्य प्रवेशद्वारावर रंगीबेरंगी फुगे आणि सुवासिक फुलांच्या माळा लावून अतिशय सुंदर सजावट करण्यात आली होती. शाळेत पहिल्यांदाच पाऊल ठेवणाऱ्या इयत्ता पहिली व बालवाडीच्या सर्व चिमुरड्यांचे शिक्षकांनी गुलाबपुष्प देऊन आणि 'पहिले पाऊल' उपक्रमांतर्गत अनोख्या पद्धतीने स्वागत केले.  मान्यवरांचे मार्गदर्शन व दप्तर वाटप याप्रसंगी शाळेच्या मुख्याध्यापिका मा. अरुनिमा पाटील यांनी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले. "शारदा सदनमधील विद्यार्थ्यांचा हा शैक्षणिक प्रवास अत्यंत आनंददायी आणि ज्ञानवर्धक ठरेल," असा विश्वास त्यांनी आपल्या भाषणातून व्...

सर्व जिल्ह्यांत पत्रकार भवनासाठी जागा देणार - बावनकुळे मराठी पत्रकार संघाच्या राज्यस्तरीय महाअधिवेशनात घोषणा

इमेज
* ( प्रतिनिधी) =अमोल शिंदे  मुंबई, ९ जून २०२६  मराठी पत्रकार संघाचे राज्यस्तरीय महाअधिवेशन २०२६ आज यशवंतराव चव्हाण सेंटर, मुंबई येथे मोठ्या उत्साहात पार पडले. या अधिवेशनात राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये पत्रकार भवनासाठी जागा उपलब्ध करून देण्यात येईल, अशी महत्त्वपूर्ण घोषणा केली. पिंपरी-चिंचवड शहरात पत्रकार भवनासाठी जागा देण्याची मागणीही मान्य करण्यात आल्याचे त्यांनी जाहीर केले. व्यासपीठावर मान्यवरांची उपस्थिती  महाअधिवेशनाच्या अध्यक्षस्थानी राज्यपाल जिष्णू देव वर्मा होते. व्यासपीठावर विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर, आंतरराष्ट्रीय ख्यातीचे प्रेरक वक्ते गौर गोपाल दास, सकाळ माध्यम समूहाचे मुख्य संपादक निलेश खरे, एबीपी माझाच्या संपादक सरिता कौशिक, पुढारी माध्यम समूहाच्या मल्टीमीडिया संपादक मृणालिनी नानिवडेकर, राज्यपालांचे सचिव प्रशांत ननावरे, मराठी पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष किरण जोशी आदी मान्यवर उपस्थित होते. बावनकुळे व गौर गोपाल दास यांचा विशेष सन्मान  महसूल खात्यात काम करताना ऐतिहासिक व क्रांतीकारक निर्णय घ...

उमेश बबन धुमाळ यांची डिजिप्रेस मीडिया संघटना भारतच्या राष्ट्रीय उपाध्यक्ष (पश्चिम भारत) पदी निवड

इमेज
उमेश बबन धुमाळ यांची डिजिप्रेस मीडिया संघटना भारतच्या राष्ट्रीय उपाध्यक्ष (पश्चिम भारत) पदी निवड  प्रतिनिधी सुहास पाटील  उमेश बबन धुमाळ यांची डिजिप्रेस मीडिया संघटना भारतच्या राष्ट्रीय उपाध्यक्ष (पश्चिम भारत) पदी निवड करण्यात आली आहे. त्यांच्या निवडीमुळे संघटनेच्या कार्याला अधिक बळ मिळणार असल्याची भावना पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. ही निवड संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री. वैष्णव ढमाळ यांच्या नेतृत्वाखाली जाहीर करण्यात आली. पत्रकारिता, सामाजिक कार्य आणि संघटनात्मक बांधिलकी लक्षात घेऊन उमेश धुमाळ यांच्यावर ही महत्त्वपूर्ण जबाबदारी सोपविण्यात आली आहे. राष्ट्रीय उपाध्यक्ष (पश्चिम भारत) या पदाच्या माध्यमातून महाराष्ट्रासह पश्चिम भारतातील विविध राज्यांमध्ये संघटनेचे कार्य अधिक प्रभावीपणे विस्तारण्यासाठी ते प्रयत्नशील राहतील, असा विश्वास संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला. उमेश बबन धुमाळ यांच्या निवडीबद्दल संघटनेचे राष्ट्रीय, राज्य, जिल्हा व तालुका स्तरावरील पदाधिकारी, पत्रकार बांधव तसेच हितचिंतकांकडून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. त्यांच्या भावी वाटचालीसाठ...

जयसिंग मानसिंग कांबळे यांची डिजिप्रेस मीडिया संघटना भारतच्या कराड तालुका उपाध्यक्षपदी निवड

इमेज
जयसिंग मानसिंग कांबळे यांची डिजिप्रेस मीडिया संघटना भारतच्या कराड तालुका उपाध्यक्षपदी निवड कराड | प्रतिनिधी प्रकाश पवार  जयसिंग मानसिंग कांबळे यांची डिजिप्रेस मीडिया संघटना भारत, महाराष्ट्र राज्यच्या कराड तालुका उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. त्यांच्या निवडीबद्दल विविध स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. ही निवड संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री. वैष्णव ढमाळ, राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉ. सुहास पाटील, राष्ट्रीय कार्याध्यक्ष श्री. अमोल शिंदे तसेच सातारा जिल्हाध्यक्ष श्री. राजाराम पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जाहीर करण्यात आली. जयसिंग कांबळे यांनी सामाजिक, पत्रकारिता व संघटनात्मक क्षेत्रात केलेल्या कार्याची दखल घेऊन त्यांच्यावर ही जबाबदारी सोपविण्यात आली आहे. त्यांच्या निवडीमुळे कराड तालुक्यात संघटनेचे कार्य अधिक प्रभावीपणे विस्तारेल, असा विश्वास पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला. त्यांच्या भावी कार्यकाळासाठी विविध मान्यवर, पत्रकार बांधव व हितचिंतकांकडून शुभेच्छा देण्यात येत आहेत.

फाल्कन CI HMA DLX हॉरिझॉन्टल ओपनवेल पंप शेतकऱ्यांच्या पसंतीस

इमेज
फाल्कन CI HMA DLX हॉरिझॉन्टल ओपनवेल पंप शेतकऱ्यांच्या पसंतीस लोणंद | प्रतिनिधी शेतीसाठी विश्वासार्ह वीज बचत करणाऱ्या पंपांची मागणी वाढत असताना फाल्कन कंपनीचा CI HMA DLX हॉरिझॉन्टल ओपनवेल पंप शेतकऱ्यांच्या पसंतीस उतरत आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून तयार करण्यात आलेल्या या पंपामध्ये उच्च दर्जाचे व गंजरोधक साहित्य वापरण्यात आल्याने त्याची कार्यक्षमता व टिकाऊपणा अधिक वाढला आहे. या पंपामध्ये CED Coated CI Parts वापरण्यात आल्यामुळे गंजरोधक संरक्षण मिळते. तसेच High Tech Carbon व S.S. Thrust Bearing मुळे हेवी ड्युटी परफॉर्मन्स मिळत असल्याचा दावा कंपनीने केला आहे. CRNGO Progressive Cutting Stamping Stack तंत्रज्ञानामुळे मोटर थंड राहण्यास मदत होते, तर Aluminum Rotor with CED Coating व S.S. Cap मुळे वीज बचत होऊन पंपाचे आयुष्य वाढते. याशिवाय S.S. Oil Seal Plate मुळे लीकेजची समस्या कमी होत असल्याने शेतकऱ्यांना दीर्घकाळ विश्वासार्ह सेवा मिळते. शेती सिंचनासाठी सक्षम, टिकाऊ व किफायतशीर पर्याय म्हणून हा पंप बाजारात उपलब्ध आहे. अधिकृत विक्रेते : हमाल इलेक्ट्रिकल्स, लोणंद संपर्क : 989037...

पत्रकारांना "दलाल" म्हणणाऱ्या मुजोर वाहतूक निरीक्षक शाहरुख खान यांचे निलंबन डिजिप्रेस मीडिया संघटना महाराष्ट्र राज्य यांच्याकडून निर्णयाचे स्वागत

इमेज
डिजिप्रेस मीडिया संघटना महाराष्ट्र राज्य यांचा निर्णयाचे स्वागत महाबळेश्वर बसस्थानक येथे पत्रकारांना "दलाल" म्हणत अपमानास्पद वक्तव्य करणाऱ्या व पत्रकारांना धमकी देणाऱ्या वाहतूक निरीक्षक शाहरुख खान यांच्या निलंबनाच्या कारवाईचे डिजिप्रेस मीडिया संघटना महाराष्ट्र राज्य यांनी स्वागत केले आहे. संघटनेचे संस्थापक अध्यक्ष वैष्णव मनोज ढमाळ राष्ट्रीय उपाध्यक्ष सुहास शिवाजी पाटील यांनी सांगितले की, पत्रकार हे लोकशाहीचा चौथा स्तंभ असून त्यांचा अपमान कोणत्याही परिस्थितीत सहन केला जाणार नाही. पत्रकारांवर दबाव टाकणे, धमकावणे किंवा त्यांची बदनामी करणे हे निषेधार्ह असून अशा प्रवृत्तीविरोधात संघटना नेहमीच ठाम भूमिका घेईल. संघटनेने प्रशासनाने केलेल्या निलंबनाच्या कारवाईचे स्वागत करत भविष्यात अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी संबंधित विभागाने कठोर पावले उचलावीत, अशी मागणी केली आहे. यावेळी डिजिप्रेस मीडिया संघटना महाराष्ट्र राज्यचे पदाधिकारी व सदस्यांनी पत्रकारांच्या सन्मानासाठी एकजूट राहण्याचे आवाहन केले.

महाबळेश्वर बसस्थानकातील वाहतूक निरीक्षकाच्या मुजोरीचा डिजिप्रेस मिडिया संघटना महाराष्ट्र राज्यकडून तीव्र निषेध

इमेज
महाबळेश्वर बसस्थानकातील वाहतूक निरीक्षकाच्या मुजोरीचा डिजिप्रेस मिडिया संघटना महाराष्ट्र राज्यकडून तीव्र निषेध महाबळेश्वर बसस्थानकात एका वाहतूक निरीक्षकाने प्रवाशांसमोर पत्रकाराला धमकी देत अरेरावीची भाषा वापरल्याचा तसेच पत्रकारांबाबत अवमानकारक वक्तव्य केल्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेचा Digipress Media Association (डिजिप्रेस मिडिया संघटना महाराष्ट्र राज्य) यांनी तीव्र शब्दांत निषेध व्यक्त केला आहे. संघटनेचे संस्थापक अध्यक्ष वैष्णव मनोज ढमाळ तसेच राष्ट्रीय उपाध्यक्ष सुहास पाटील यांनी संयुक्त निवेदनाद्वारे सांगितले की, पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ असून पत्रकारांबाबत अपमानास्पद वक्तव्य करणे व धमकी देणे हे अत्यंत निषेधार्ह आहे. संबंधित वाहतूक निरीक्षकाने पत्रकारांचा अवमान केल्याचा आरोप गंभीर असून या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषी अधिकाऱ्यावर तात्काळ व कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. पत्रकारांच्या सन्मानाला धक्का पोहोचवणाऱ्या कोणत्याही प्रकाराला संघटना खपवून घेणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला. डिजिप्रेस मिडिया संघटना महाराष्ट्र राज्यने राज्यातील सर...

छावा ग्रुप पोलीस मित्र संघाच्या सभासद नोंदणी अभियानास उत्साहात प्रारंभ

इमेज
सभासद नोंदणी लिंक लोणंद प्रतिनिधी : वैष्णव ढमाळ  छावा  ग्रुप पोलीस मित्र संघाच्या वतीने राज्यभर सभासद नोंदणी अभियानास उत्साहात प्रारंभ करण्यात आला आहे. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष महेश अण्णा फडतडे तसेच महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष प्रवीण भाऊ पवार यांच्या मार्गदर्शनाखाली हे अभियान राबविण्यात येत असून युवकांना संघटनेच्या सामाजिक कार्यात सहभागी करून घेण्याचा यामागील उद्देश आहे. या अभियानाच्या माध्यमातून युवकांमध्ये सामाजिक बांधिलकी, नागरिकांमध्ये कायद्याविषयी जनजागृती आणि समाजहिताची भावना अधिक दृढ करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. संघटनेच्या वतीने सर्व युवा युवकांनी मोठ्या संख्येने सभासद नोंदणी करून या अभियानाचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी संपर्क : प्रविण भाऊ पवार  महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष  मो. 9930089057

गलांडवाडी ग्रामस्थांचा स्तुत्य उपक्रम: शाळा खोली बांधकामासाठी निगडे कुटुंबाकडून ५१ हजार रुपयांची लोकवर्गणी!

इमेज
 अमोल शिंदे प्रतिनिधी  वृक्षारोपण करून दिला पर्यावरण संवर्धनाचा संदेश गलांडवाडी: 'मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान' अंतर्गत येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या नवीन वर्ग खोल्यांच्या बांधकामासाठी लोकसहभागातून एक महत्त्वाचे पाऊल उचलण्यात आले आहे. गावातील प्रतिष्ठित नागरिक श्री. मधुकर मारुतराव निगडे, श्री. संतोष मधुकर निगडे आणि श्री. दत्तात्रेय मधुकर निगडे यांनी सामाजिक बांधिलकी जपत शाळा खोली बांधकामासाठी ५१,००० रुपये (एक्यावन्न हजार रुपये) रकमेची लोकवर्गणी सुपूर्द केली आहे. त्यांच्या या दातृत्वाबद्दल ग्रामपंचायत गलांडवाडी आणि समस्त ग्रामस्थांच्या वतीने त्यांचे विशेष आभार मानण्यात आले. या कौतुकास्पद प्रसंगाचे औचित्य साधून निगडे कुटुंबाच्या समवेत शाळा आणि ग्रामपंचायत परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. या माध्यमातून गावकऱ्यांनी पर्यावरण सुचक आणि संवर्धनाचा अत्यंत सुंदर संदेश दिला. प्रमुख मान्यवरांची उपस्थिती याप्रसंगी गावातील ज्येष्ठ आणि प्रमुख पदाधिकाऱ्यांची मोठी उपस्थिती लाभली होती. यामध्ये प्रामुख्याने: निळकंठ बापू शितोळे, ज्ञानदेव तात्या कदम, उमेश अण्णा...

वाईत प्रसिद्ध चप्पल शोरूमला भीषण आग - आगीत संपूर्ण दुकान जळून खाक

इमेज
शहरातील गजबजलेल्या चित्रा टॉकीज परिसरातील गणपती आळी येथे बुधवारी पहाटेच्या सुमारास एका प्रसिद्ध चप्पल-बूट शोरूमला अचानक भीषण आग लागली. या आगीत 'मधू फुटवेअर' हे दुकान पूर्णपणे जळून खाक झाले असून, प्राथमिक अंदाजानुसार सुमारे ४० लाख रुपयांचे अतोनात नुकसान झाले आहे. पहाटेच्या शांततेत लागलेल्या या आगीमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी पहाटे ५ च्या सुमारास मधू फुटवेअर या दुकानातून अचानक धूर आणि आगीच्या प्रचंड ज्वाळा निघू लागल्या. पाहता पाहता आगीने रौद्ररूप धारण केले आणि शेजारील टपरीलाही आपल्या कचाट्यात घेतले. पहाटेच्या वेळी हा थरार पाहून परिसरातील नागरिकांनी तातडीने घटनास्थळाकडे धाव घेतली आणि मिळेल त्या साधनांनी आग विझवण्याचा प्रयत्न सुरू केला. तसेच घटनेचे गांभीर्य ओळखून वाई नगरपालिका अग्निशमन विभाग आणि वाई पोलिसांना तातडीने पाचारण करण्यात आले. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचा बंब आणि पोलीस प्रशासनाचे अधिकारी-कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. स्थानिक नागरिकांचे धाडस आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी सुमारे एक तासाच्या अथक प्रयत्नांनंतर आग आटोक...

बँकेत पैसे भरायचे असोत, नवीन खातं उघडायचं असो किंवा इतर कोणतंही महत्त्वाचं काम, स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेत गेल्यावर "सध्या आमचा लंच टाइम सुरू आहे, नंतर या" असा अनुभव अनेकांना आलेला असतो. सोशल मीडियावर तर एसबीआयच्या 'लंच टाइम' आणि त्यावरून तयार होणारे मीम्स-जोक्स नेहमीच तुफान व्हायरल होत असतात,*

*बँकेत पैसे भरायचे असोत, नवीन खातं उघडायचं असो किंवा इतर कोणतंही महत्त्वाचं काम, स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेत गेल्यावर "सध्या आमचा लंच टाइम सुरू आहे, नंतर या" असा अनुभव अनेकांना आलेला असतो. सोशल मीडियावर तर एसबीआयच्या 'लंच टाइम' आणि त्यावरून तयार होणारे मीम्स-जोक्स नेहमीच तुफान व्हायरल होत असतात,* *पण खरंच एसबीआय किंवा इतर बँकांमध्ये ग्राहकांचे काम थांबवून सर्व कर्मचाऱ्यांनी एकाच वेळी जेवायला जाण्याचा कोणताही अधिकृत नियम आहे का? देशातील सर्वात मोठ्या सरकारी बँकेत लंच टाइमविषयी नक्की काय नियम आहेत जाणून घ्या,* *भारतीय रिझर्व्ह बँक आणि स्टेट बँक ऑफ इंडियाच्या अधिकृत नियमांनुसार पब्लिक डिलिंग कधीही थांबत नाही. बँकेत असा कोणताही निश्चित किंवा फिक्स लंच टाइम नसतो, ज्या दरम्यान बँकेचे मुख्य शटर बंद केले जाईल किंवा ग्राहकांची कामेपूर्णपणे थांबवली जातील,* *ग्राहकांची गैरसोय टाळण्यासाठी एसबीआयमध्ये दुपारी १ ते ३ वाजेदरम्यान सर्व कर्मचारी आलटून पालटून (बारीबारीने) जेवणासाठी जातात. नियमानुसार, जर काउंटर नंबर-१ चा कर्मचारी लंचसाठी सीटवरून उठला, तर त्याच्या जागी काउंटर नंबर-२ चा...

गलांडवाडी ग्रामपंचायतीत 'शिवस्वराज्य दिन' उत्साहात साजरा, 'बर्तन बँके'चे शानदार उद्घाटन!

इमेज
 प्रतिनिधी अमोल शिंदे  दौंड : ६ जून हा दिवस संपूर्ण महाराष्ट्रात 'शिवस्वराज्य दिन' म्हणून मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. याच पार्श्वभूमीवर, दौंड तालुक्यातील गलांडवाडी ग्रामपंचायत, पंचायत समिती व जिल्हा परिषद कार्यालयाच्या संयुक्त विद्यमाने आज सकाळी ठीक ९:३० वाजता ग्रामपंचायत कार्यालय, गलांडवाडी येथे "शिवस्वराज्य दिन" अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला. प्लास्टिकमुक्तीसाठी पाऊल: 'बर्तन बँक' उपक्रम सुरू शिवस्वराज्य दिनाचे औचित्य साधून गलांडवाडी गावामध्ये एक अत्यंत स्तुत्य आणि पर्यावरणपूरक उपक्रम राबविण्यात आला. गावाला पूर्णपणे प्लास्टिकमुक्त करण्यासाठी आणि ग्रामस्थांच्या आरोग्याच्या दृष्टीने हानिकारक ठरणाऱ्या प्लास्टिक व थर्माकोलच्या पत्रवळ्यांचा वापर बंद करण्यासाठी 'बर्तन बँक' (भांडी बँक) चे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. या उपक्रमांतर्गत गावातील सार्वजनिक व घरगुती कार्यक्रमांसाठी स्टीलची भांडी उपलब्ध करून देण्यात आली असून, यापुढे गावात पत्रवळ्या वापरण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. प्रमुख मान्यवरांची उपस्थिती या महत्त्वपूर्ण कार्...

डिजिप्रेस मीडिया संघटना भारताच्या राष्ट्रीय मुख्य समन्वयकपदी शंकर कुंडलिक भोईटे यांची नियुक्ती

इमेज
पुणे, प्रतिनिधी : डिजिप्रेस मीडिया संघटना भारतच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत महत्त्वपूर्ण नियुक्ती करण्यात आली असून श्री. शंकर कुंडलिक भोईटे यांची राष्ट्रीय मुख्य समन्वयक (Chief Coordinator) पदी नियुक्ती करण्यात आल्याची माहिती संघटनेचे  अध्यक्ष वैष्णव ढमाळ यांनी दिली. संघटनेच्या राष्ट्रीय स्तरावरील विस्तार, विविध राज्यांतील पदाधिकाऱ्यांमध्ये समन्वय साधणे, संघटनात्मक कार्य अधिक प्रभावीपणे राबविणे तसेच पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते आणि सदस्य यांना एकत्रित करून संघटनेची उद्दिष्टे पूर्ण करण्याची जबाबदारी श्री. भोईटे यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. श्री. भोईटे यांच्या नियुक्तीमुळे संघटनेच्या कार्याला अधिक गती मिळेल तसेच देशभरातील संघटनात्मक जाळे मजबूत होण्यास मदत होईल, असा विश्वास संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. या नियुक्तीबद्दल विविध स्तरांवरील पदाधिकारी, पत्रकार व सदस्यांनी श्री. शंकर कुंडलिक भोईटे यांचे अभिनंदन करून त्यांच्या भावी कार्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. श्री. शंकर कुंडलिक भोईटे यांना राष्ट्रीय मुख्य समन्वयकपदी नियुक्त झाल्याबद्दल डिजिप्रेस मीडिया संघटना भार...