नेताजी शिक्षण संस्थेच्या विद्यालयात रंगला 'नवगतांचा प्रवेशोत्सव', पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांचे उत्साहात स्वागत!
नवनाथ खोपडे-प्रतिनिधी:-केडगाव
(दौंड)नेताजी शिक्षण संस्थेच्या विद्यालयात नुकताच इयत्ता पाचवी ते दहावीच्या नवीन विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सव आणि स्वागत समारंभ अत्यंत उत्साहात व आनंदमय वातावरणात संपन्न झाला. नवीन शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीला शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांचे स्वागत करून त्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आनंदाने सामील करून घेण्याच्या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण म्हणजे शाळेच्या प्रांगणात काढलेली आकर्षक रांगोळी आणि लाल-पांढऱ्या फुग्यांची सुंदर कमान, ज्याने संपूर्ण परिसर सुशोभित केला होता.
मान्यवरांची प्रमुख उपस्थिती आणि मार्गदर्शन
या सोहळ्याचे अध्यक्षपद नेताजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष माननीय श्री. सुनीलआण्णा निंबाळकर यांनी भूषवले. तर संस्थेचे सचिव माननीय श्री. धनाजी शेळके-पाटील यांची याप्रसंगी प्रमुख उपस्थिती होती. मान्यवरांच्या हस्ते नवीन प्रवेश घेतलेल्या चिमुकल्या विद्यार्थ्यांना गुलाबपुष्प व मुलांचे फुले टाकून स्वागत करण्यात आले आणि शैक्षणिक पुस्तके देऊन त्यांचे उत्साहात स्वागत करण्यात आले.
यावेळी बोलताना श्री. सुनीलआण्णा निंबाळकर यांनी विद्यार्थ्यांना नवीन शैक्षणिक वर्षासाठी शुभेच्छा दिल्या आणि दर्जेदार शिक्षणासोबतच विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास घडवून आणण्यासाठी संस्था सदैव कटिबद्ध असल्याचे सांगितले.शिक्षक आणि पालकांचा मोठा प्रतिसाद
हा सोहळा यशस्वी करण्यासाठी विद्यालयाचे प्राचार्य श्री. टुले एन. डी. आणि उपप्राचार्य श्री. खाडे बी. ए. यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.
आपल्या पाल्यांचे कौतुक पाहण्यासाठी आणि या आनंदोत्सवात सहभागी होण्यासाठी पालक वर्ग देखील मोठ्या संख्येने उपस्थित होता. नवीन पुस्तके आणि आपुलकीचे स्वागत मिळाल्याने विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद आणि उत्साह ओसंडून वाहत होता. शेवटी सामूहिक छायाचित्र घेऊन या देखण्या सोहळ्याची सांगता झाली.
टिप्पण्या