पोस्ट्स

एप्रिल, २०२६ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

महाराष्ट्रात 21 वी पशुगणनेचे मानधन रखडले; प्रगणकांमध्ये नाराजी

महाराष्ट्र रक्षक न्यूज | विशेष वृत्त डॉ सुहास पाटील सातारा जिल्हा प्रतिनिधी  महाराष्ट्रात पशुसंवर्धन विभागाकडून करण्यात आलेल्या 21 व्या पशुगणनेचे मानधन अद्याप प्रलंबित असल्याने प्रगणकांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. फेब्रुवारी 2025 मध्ये सुरू झालेली ही पशुगणना मे अखेरपर्यंत यशस्वीरित्या पूर्ण करण्यात आली होती. या कामासाठी पशुसंवर्धन विभागामार्फत प्रगणक आणि सुपरवायझर यांची नेमणूक करण्यात आली होती. प्रगणकांना प्रति कुटुंब शहरी भागासाठी 9 रुपये आणि ग्रामीण भागासाठी 10 रुपये मानधन देण्याचे जाहीर करण्यात आले होते. तसेच ऑनलाइन माहिती भरण्यासाठीही अतिरिक्त मानधन देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र, पशुगणना पूर्ण होऊन दीड वर्ष उलटून गेले असतानाही प्रगणकांना केवळ मोबाईल बिलाचा खर्च मिळाला असून मूळ मानधन अद्याप मिळालेले नाही. याबाबत तालुका पशुसंवर्धन अधिकाऱ्यांकडे चौकशी केली असता, मानधन केंद्र शासनाच्या पशुसंवर्धन विभागाकडून येणार असल्याने नेमके कधी मिळेल याबाबत स्पष्ट माहिती नसल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, या परिस्थितीमुळे प्रगणकांमध्ये तीव्र नाराजी पसरली असून भविष...

महाराष्ट्र रक्षक न्यूज सातारा ब्रेकिंग न्यूज पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांची सांगलीला बदली निखील पिंगळे साताऱ्याचे नवे एसपी

इमेज

डॉ.दिलीपराव चव्हाण यांचे निधन; “शब्दाला जागणारा नेता” हरपल्याने सर्वत्र हळहळ

इमेज
डॉ.दिलीपराव चव्हाण यांचे निधन; “शब्दाला जागणारा नेता” हरपल्याने सर्वत्र हळहळ पाटण प्रतिनिधी  कुंभारगाव (ता. पाटण) येथील बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखाना, मरळीचे माजी चेअरमन व विद्यमान संचालक कै. डॉ. दिलीपराव बापुराव चव्हाण यांचे वयाच्या ७१ व्या वर्षी अकस्मात निधन झाले. त्यांच्या निधनाने पाटण तालुक्यासह संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. आज सोमवार दिनांक २० एप्रिल २०२६ रोजी दुपारी १२.३० वाजता कुंभारगाव येथील वैकुंठधाम येथे त्यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री , शंभूराजे देसाई साहेब ,यशराज (दादा) देसाई, रविराज देसाई, कारखान्याचे चेअरमन, व्हाईस चेअरमन, संचालक मंडळ, विविध क्षेत्रातील पदाधिकारी, जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित राहून त्यांनी श्रद्धांजली अर्पण केली. कै. डॉ. दिलीपराव चव्हाण हे केवळ एक राजकीय कार्यकर्ते नव्हते, तर देसाई गटाचे खंबीर आधारस्तंभ होते. गट अडचणीत असताना त्यांनी नेहमीच धीर देत योग्य मार्गदर्शन केले.पाटण तालुक्यातील कुंभारगाव–ढेबेवाडी परिसरात त्यांनी तळागाळ...

कराड दक्षिण येळगाव येथे गॅसधारकांना घरपोच सिलेंडर सेवा ठप्प; दोन महिन्यांपासून नागरिक त्रस्त

इमेज
कराड दक्षिण येळगाव येथे गॅसधारकांना घरपोच सिलेंडर सेवा ठप्प; दोन महिन्यांपासून नागरिक त्रस्त  रामचंद्र धुळप कराड तालुका प्रतिनिधी  कराड तालुक्यातील दक्षिण येळगाव परिसरात गॅसधारकांना घरपोच गॅस सिलेंडर सेवा मिळत नसल्यामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. गेल्या दोन महिन्यांपासून ही समस्या कायम असल्याचे समोर आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दक्षिण येळगाव परिसरातील ग्राहकांना गॅस सिलेंडर मिळवण्यासाठी स्वतः एजन्सीपर्यंत जावे लागत आहे. त्यामुळे विशेषतः ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. संबंधित ओम शिवम गॅस एजन्सी कडून घरपोच सेवा सुरू करण्याबाबत वारंवार आश्वासन दिले जात असले तरी प्रत्यक्षात सेवा सुरू झालेली नाही, अशी तक्रार नागरिकांनी केली आहे. अधिकारी सतत उद्यापासून घरपोच सेवा सुरू होईल असे सांगतात; मात्र गेल्या दोन महिन्यांपासून आम्ही हेच ऐकत आहोत,” असे श्री. आनंदा शेवाळे यांनी सांगितले. दरम्यान, संबंधित प्रशासनाने या समस्येकडे तातडीने लक्ष देऊन घरपोच गॅस वितरण सेवा सुरू करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

Airtel Payments Bank च्या खातेदाराच्या वारसांना बँकेकडून 2 लाख रुपयांची आर्थिक मदत

इमेज
Airtel Payments Bank च्या खातेदाराच्या वारसांना बँकेकडून 2 लाख रुपयांची आर्थिक मदत रामचंद्र धुळप कराड तालुका प्रतिनिधी  कराड तालुक्यातील रस्ते अपघातात मृत्यू झालेल्या Airtel Payments Bank च्या एका खातेदाराच्या वारसांना बँकेकडून 2 लाख रुपयांची आर्थिक मदत देण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बाळासो कृष्णा शेवाळे (वय 70, रा. शेवाळेवाडी, येवती) यांचा गलमेवाडी–येवती रस्त्यावर झालेल्या भीषण अपघातात मृत्यू झाला. घटनेनंतर कुटुंबीयांनी सर्व आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून बँक प्रतिनिधी सौ. रोमा धुळप यांच्याकडे Airtel Payments Bank मध्ये विमा दाव्यासाठी अर्ज दाखल केला होता. बँकेने पडताळणी पूर्ण केल्यानंतर विमा योजनेअंतर्गत 2 लाख रुपयांची रक्कम वारसांना मंजूर करण्यात आली. सदर विमा रक्कम मिळवून देण्यासाठी साऊथ महाराष्ट्र (कोल्हापूर विभाग) चे CGO श्री. रविराज पाटील यांनी मोलाचे सहकार्य केले. तसेच झोनल मॅनेजर श्री. प्रवीण भोपळे आणि सातारा विभागाच्या ZTM आस्मा शेख यांनीही आवश्यक पाठपुरावा केला. ही रक्कम Airtel Payments Bank शाखा, शेवाळेवाडी (म्हासोली) येथे मृताच्या वारस आकाताताई ...

जि. प. शाळा गलांडवाडी येथे समर्थ शेंडगे याचा वाढदिवस खाऊ वाटपाने साजरा

इमेज
## **जि. प. शाळा गलांडवाडी येथे समर्थ शेंडगे याचा वाढदिवस खाऊ वाटपाने साजरा** **गलांडवाडी (प्रतिनिधी):**अमोल शिंदे  येथील **जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, गलांडवाडी** येथे इयत्ता पाचवीतील विद्यार्थी **कु. समर्थ रामदास शेंडगे** याचा वाढदिवस मोठ्या उत्साहात आणि सामाजिक बांधिलकी जपत साजरा करण्यात आला. या वाढदिवसाचे औचित्य साधून शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करण्यात आले. आजच्या काळात वाढदिवसावर विनाकारण खर्च न करता, तो आपल्या शाळेतील मित्र-मैत्रिणींसोबत आनंदात साजरा करावा, या हेतूने शेंडगे परिवाराने या उपक्रमाचे आयोजन केले होते. समर्थने आपल्या वाढदिवसानिमित्त वर्गातील आणि शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना खाऊ वाटून आनंद द्विगुणित केला. > "समर्थने आपल्या वाढदिवसाचा आनंद इतर विद्यार्थ्यांसोबत वाटून एक चांगला आदर्श ठेवला आहे. अशा उपक्रमांमुळे मुलांमध्ये आपुलकी आणि स्नेहाची भावना निर्माण होते," असे मत शाळेतील शिक्षकांनी व्यक्त केले. >  याप्रसंगी शाळेतील मुख्याध्यापक, शिक्षक वृंद, समर्थचे वडील श्री. रामदास शेंडगे आणि मित्रमंडळी उपस्थित होते. सर्व शिक्षकांनी आणि विद...

भव्य हिंदू संमेलनात पावसाचीही हजेरी

इमेज
भव्य हिंदू संमेलनात पावसाचीही हजेरी करडा प्रतिनिधी –  शेवाळवाडी येथे आयोजित करण्यात आलेल्या भव्य हिंदू संमेलनाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. मोठ्या संख्येने उपस्थित राहून नागरिकांनी कार्यक्रमाची शोभा वाढवली. धार्मिक आणि सांस्कृतिक वातावरणात पार पडलेल्या या संमेलनात विविध मान्यवरांनी मार्गदर्शन करत समाज एकजुटीचा संदेश दिला. दरम्यान, सायंकाळी सुमारे ५ वाजण्याच्या सुमारास अचानक पावसानेही आपली हजेरी लावली. मेघराजांच्या या आगमनामुळे वातावरण अधिक प्रसन्न झाले. पावसाच्या सरींनाही न जुमानता उपस्थितांनी कार्यक्रमात उत्साहाने सहभाग घेतला. या संमेलनामुळे परिसरात धार्मिक एकात्मता आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून कार्यक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

मंथन परीक्षेत देऊळगाव गाडा जिल्हा परिषद शाळेचे वर्चस्व; केंद्रातील पहिल्या ५ क्रमांकांत शाळेच्या ३ विद्यार्थिनी!

इमेज
  देऊळगाव गाडा (प्रतिनिधी):अमोल शिंदे  फेब्रुवारी २०२६ मध्ये घेण्यात आलेल्या 'मंथन राज्यस्तरीय सामान्य ज्ञान परीक्षेत' जिल्हा परिषद प्राथमिक शाळा देऊळगाव गाडा येथील विद्यार्थिनींनी दैदिप्यमान यश संपादन केले आहे. विशेष म्हणजे, केडगाव केंद्रामधून काढण्यात आलेल्या पहिल्या पाच क्रमांकांपैकी तब्बल तीन क्रमांक याच शाळेच्या विद्यार्थिनींनी पटकावत शाळेचा आणि गावाचा नावलौकिक वाढवला आहे. यशस्वी विद्यार्थिनींची कामगिरी:  कु. स्वरा मनोज शितोळे (इयत्ता ४ थी): हिने ३०० पैकी २४४ गुण मिळवून केडगाव केंद्रामध्ये प्रथम क्रमांक पटकावला. तिने राज्यात २१ वा, जिल्ह्यात २४ वा तर तालुक्यात १५ वा क्रमांक मिळवला आहे.  कु. श्रेया विजय दगडे (इयत्ता ४ थी): ३०० पैकी २३२ गुण मिळवून केंद्रामध्ये पाचवा क्रमांक मिळवला. तिने राज्यात ३५ वा, जिल्ह्यात ३० वा तर तालुक्यात २१ वा क्रमांक प्राप्त केला.  कु. श्रुती विजय दगडे (इयत्ता ४ थी): हिने देखील ३०० पैकी २३२ गुण मिळवून केंद्रामध्ये पाचवा क्रमांक प्राप्त केला आहे. एकाच शाळेतील तीन मुलींनी केंद्रस्तरीय गुणवत्ता यादीत स्थान मिळवल...

व्हॉईस ऑफ मीडिया सातारा जिल्ह्याच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

सातारा | प्रतिनिधी : सुहास पाटील  राज्यातील वृत्तपत्र उद्योगाला आर्थिक अडचणींमधून बाहेर काढण्यासाठी तसेच पत्रकारांवर होणाऱ्या अन्यायाला आळा घालण्यासाठी व्हॉईस ऑफ मीडिया सातारा जिल्ह्याच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले. या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, सन 2019 पासून कागद, प्रिंटिंग साहित्य, वीज, केमिकल्स आणि मनुष्यबळ खर्चामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून जवळपास 150 टक्क्यांपर्यंत खर्च वाढलेला आहे. मात्र, शासनाच्या जाहिरात दरामध्ये कोणतीही वाढ झालेली नाही. त्यामुळे लघु व मध्यम वृत्तपत्रे आर्थिक संकटात सापडली आहेत. यावर उपाय म्हणून शासनाने किमान 150% जाहिरात दरवाढ करावी, अशी प्रमुख मागणी करण्यात आली आहे. तसेच, जाहिरात बिलांचे 30 दिवसांत भुगतान करावे ई-टेंडर नोटीस पूर्ण स्वरूपात वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध करावी जाहिरात वितरणात पारदर्शकता राखावी 25 वर्षे पूर्ण केलेल्या वृत्तपत्रांना नैसर्गिक दरवाढ लागू करावी अशा विविध मागण्या निवेदनातून करण्यात आल्या आहेत. यावेळी राज्यातील पत्रकारांवर वाढत्या हल्ल्यांबाबतही चिंता व्यक्त करण्यात आली. अकोला, नांदेड, रत्नागिरी, पनव...