कराड दक्षिण येळगाव येथे गॅसधारकांना घरपोच सिलेंडर सेवा ठप्प; दोन महिन्यांपासून नागरिक त्रस्त

कराड दक्षिण येळगाव येथे गॅसधारकांना घरपोच सिलेंडर सेवा ठप्प; दोन महिन्यांपासून नागरिक त्रस्त

 रामचंद्र धुळप कराड तालुका प्रतिनिधी 

कराड तालुक्यातील दक्षिण येळगाव परिसरात गॅसधारकांना घरपोच गॅस सिलेंडर सेवा मिळत नसल्यामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. गेल्या दोन महिन्यांपासून ही समस्या कायम असल्याचे समोर आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दक्षिण येळगाव परिसरातील ग्राहकांना गॅस सिलेंडर मिळवण्यासाठी स्वतः एजन्सीपर्यंत जावे लागत आहे. त्यामुळे विशेषतः ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
संबंधित ओम शिवम गॅस एजन्सी कडून घरपोच सेवा सुरू करण्याबाबत वारंवार आश्वासन दिले जात असले तरी प्रत्यक्षात सेवा सुरू झालेली नाही, अशी तक्रार नागरिकांनी केली आहे.
अधिकारी सतत उद्यापासून घरपोच सेवा सुरू होईल असे सांगतात; मात्र गेल्या दोन महिन्यांपासून आम्ही हेच ऐकत आहोत,” असे श्री. आनंदा शेवाळे यांनी सांगितले.
दरम्यान, संबंधित प्रशासनाने या समस्येकडे तातडीने लक्ष देऊन घरपोच गॅस वितरण सेवा सुरू करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

श्री अमित नवनाथ करचे यांची राष्ट्रीय युवक अध्यक्षपदी निवड

Airtel Payments Bank च्या खातेदाराच्या वारसांना बँकेकडून 2 लाख रुपयांची आर्थिक मदत

🩸🌱 स्वर्गीय श्रीपती सावंत सर यांच्या प्रथम स्मृतीदिनानिमित्त विविध सामाजिक उपक्रम उत्साहात संपन्न 🌱🩸