पोस्ट्स

नोव्हेंबर, २०२६ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

आजऱ्यात भीषण अपघात; एकाचा जागीच मृत्यू, दोघे गंभीर जखमी

आजरा : प्रतिनिधी जयवंत पाटील  आजरा–आंबोली राष्ट्रीय महामार्गावर सुळेरानजवळ चारचाकी वाहनाचा भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत समर्थ पांडुरंग पांगम (वय १७, रा. परोळी रोड, आजरा) या महाविद्यालयीन युवकाचा जागीच मृत्यू झाला. तर संस्कार अमित सुतार (वय १७, रा. बडे गल्ली, आजरा) हा गंभीर जखमी झाला असून प्रथमेश दंडाप्पा वाजंत्री (वय १७, रा. गांधीनगर, आजरा) याला सुदैवाने बचावण्यात यश आले. मिळालेल्या माहितीनुसार, समर्थ, संस्कार आणि प्रथमेश हे तिघे मित्र चारचाकी वाहनातून आंबोलीच्या दिशेने गेले होते. तेथून परत येत असताना समर्थ याचे वाहनावरील नियंत्रण सुटले. त्यामुळे रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडाला चारचाकी वाहनाची जोरदार धडक बसली. या भीषण अपघातात समर्थचा जागीच मृत्यू झाला, तर संस्कार गंभीर जखमी झाला. प्रथमेशला सुदैवाने जीवितहानी झाली नाही. अपघाताची माहिती मिळताच परिसरात हळहळ व्यक्त करण्यात आली. अल्पवयीन युवकांच्या वाहन चालविण्याबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, पालकांनी आणि वाहनचालकांनी वाहतुकीच्या नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले जात आहे. महाराष्ट्र रक्षक न्यूज मुख्य संपादक : वैष्णव ...

साहित्य लोक कलावंत कलाकार यांचे लाडके नेते, मा. श्री युवराज मोरकर साहेब,सातारा.यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा होत आहे. -

(प्रतिनिधी श्री राजाराम पाटील.)  राजश्री छत्रपती शाहू महाराज वृद्ध कलावंत मानधन योजना महाराष्ट्र राज्य - *सातारा जिल्हा निवड समिती सदस्य*  तसेच साहित्य लोक कलावंत समन्वय समिती महाराष्ट्र राज्याचे *अध्यक्ष* मा. श्री युवराज मोरकर साहेब यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा होत आहे.  श्री. युवराज मोरकर साहेब यांच्या घराण्यात पूर्वीपासूनच तमाशा कला जोपासलेली आहे. त्याचे बाळकडू त्यांना लहान वयातच मिळाले, नंतर त्यांनी आपला स्वतःचा तमाशा फड निर्माण केला, या काळात लोक कलावंत व कलाकारांचे होणारे हाल व ससेहोलपट हे सर्व त्यांनी जवळून पाहिले, व या सामान्य कलाकारांच्या साठी आपण काहीतरी केले पाहिजे या तळमळीने त्यांनी काम करण्यास सुरुवात केली. हे करत असताना त्यांनी सर्व क्षेत्रातील कलाकारांची संघटना बांधली. आणि शासन दरबारी पाठपुरावा करून कलाकारांना योग्य न्याय देण्याचे काम त्यांनी केले. हे कार्य पाहून शासनाने त्यांना राजश्री छत्रपती शाहू महाराज वृद्ध कलावंत मानधन योजनेच्या सातारा जिल्हा निवड समितीच्या सदस्य पदी नियुक्ती केली.  आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त सर्व कलाकारांनी त्यांना शु...