श्री अमित नवनाथ करचे यांची राष्ट्रीय युवक अध्यक्षपदी निवड
श्री अमित नवनाथ करचे यांची राष्ट्रीय युवक अध्यक्षपदी निवड
डिजिप्रेस मिडिया संघटना भारत यांच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत महत्त्वपूर्ण नियुक्ती करण्यात आली असून, श्री अमित नवनाथ करचे यांची राष्ट्रीय युवक अध्यक्ष या पदावर निवड करण्यात आली आहे.
ही निवड संस्थेचे संस्थापक अध्यक्ष वैष्णव ढमाळ साहेब, राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉ. सुहास पाटील साहेब तसेच राष्ट्रीय कार्याध्यक्ष अमोल शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.श्री अमित करचे हे सामाजिक, पत्रकारिता व युवक संघटन क्षेत्रातील कार्यामुळे परिचित असून त्यांच्या निवडीमुळे संघटनेच्या युवक विभागाला अधिक बळ मिळणार असल्याचा विश्वास पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.त्यांच्या निवडीबद्दल संघटनेतील सर्व पदाधिकारी, सदस्य तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे. आगामी काळात संघटनेची युवक संघटना अधिक मजबूत करून सामाजिक व जनजागृतीपर उपक्रम प्रभावीपणे राबविण्यासाठी ते कार्य करतील, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा