मेढा आगारातील अपघातांबाबत गंभीर प्रश्न; चालक-वाहकांवरील अतिरिक्त कामाचा ताण आणि बस देखभालीकडे दुर्लक्षाचा आरोप

मेढा आगारातील अपघातांबाबत गंभीर प्रश्न; चालक-वाहकांवरील अतिरिक्त कामाचा ताण आणि बस देखभालीकडे दुर्लक्षाचा आरोप

प्रतिनिधी मोहन खुडे 

सदर अपघात हा विजापूर येथून रिटर्न प्रवास करताना चालकाला पुरेशी विश्रांती न मिळाल्यामुळे झाल्याचा आरोप करण्यात येत आहे. तसेच मेढा आगारातील एसटी बसगाड्यांची नियमित व योग्य पद्धतीने देखभाल केली जात नसल्याचीही गंभीर बाब समोर येत आहे.
मेढा आगारामध्ये चालक व वाहकांचा इतरत्र मोठ्या प्रमाणात वापर केला जात असल्याने उपलब्ध चालक-वाहकांवर अतिरिक्त कामाचा ताण पडत असल्याचे सांगण्यात येत आहे. परिणामी, पुरेशी विश्रांती न मिळालेल्या चालकांकडून लांब पल्ल्याच्या फेऱ्या करून घेतल्या जात असल्याचा आरोप आहे.
आगार प्रशासनाकडून लांब पल्ल्याच्या गाड्या रिटर्न प्रवासासाठी पुन्हा आगारात आणल्या जात असल्याने चालकांना विश्रांतीसाठी पुरेसा वेळ मिळत नसल्याचेही सांगितले जात आहे. या सर्व बाबींचा परिणाम प्रवासी सुरक्षेवर होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
विशेष म्हणजे, मागील महिन्यापासून मेढा आगाराच्या एसटी बसगाड्यांचे जवळपास चार अपघात झाल्याचे सांगण्यात येत असून, त्यापैकी सदर अपघात हा सर्वात मोठा अपघात असल्याचे बोलले जात आहे.
या पार्श्वभूमीवर मेढा आगार प्रशासनाने चालक-वाहकांना नियमानुसार पुरेशी विश्रांती देणे, वाहनांची नियमित तांत्रिक तपासणी व देखभाल करणे तसेच मनुष्यबळाचे योग्य नियोजन करणे आवश्यक आहे. वारंवार होणाऱ्या अपघातांची कारणमीमांसा करून प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी ठोस उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

तांबवे येथे जाहीर सभेत हिंगणगावातील नागरिकांचा जाहीर शिवसेनेत पक्षप्रवेश

श्री अमित नवनाथ करचे यांची राष्ट्रीय युवक अध्यक्षपदी निवड