भव्य हिंदू संमेलनात पावसाचीही हजेरी

भव्य हिंदू संमेलनात पावसाचीही हजेरी
करडा प्रतिनिधी –
 शेवाळवाडी येथे आयोजित करण्यात आलेल्या भव्य हिंदू संमेलनाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. मोठ्या संख्येने उपस्थित राहून नागरिकांनी कार्यक्रमाची शोभा वाढवली. धार्मिक आणि सांस्कृतिक वातावरणात पार पडलेल्या या संमेलनात विविध मान्यवरांनी मार्गदर्शन करत समाज एकजुटीचा संदेश दिला.
दरम्यान, सायंकाळी सुमारे ५ वाजण्याच्या सुमारास अचानक पावसानेही आपली हजेरी लावली. मेघराजांच्या या आगमनामुळे वातावरण अधिक प्रसन्न झाले. पावसाच्या सरींनाही न जुमानता उपस्थितांनी कार्यक्रमात उत्साहाने सहभाग घेतला.
या संमेलनामुळे परिसरात धार्मिक एकात्मता आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून कार्यक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

तांबवे येथे जाहीर सभेत हिंगणगावातील नागरिकांचा जाहीर शिवसेनेत पक्षप्रवेश

श्री अमित नवनाथ करचे यांची राष्ट्रीय युवक अध्यक्षपदी निवड

मेढा आगारातील अपघातांबाबत गंभीर प्रश्न; चालक-वाहकांवरील अतिरिक्त कामाचा ताण आणि बस देखभालीकडे दुर्लक्षाचा आरोप