व्हॉईस ऑफ मीडिया सातारा जिल्ह्याच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन


सातारा | प्रतिनिधी : सुहास पाटील 

राज्यातील वृत्तपत्र उद्योगाला आर्थिक अडचणींमधून बाहेर काढण्यासाठी तसेच पत्रकारांवर होणाऱ्या अन्यायाला आळा घालण्यासाठी व्हॉईस ऑफ मीडिया सातारा जिल्ह्याच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले.

या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, सन 2019 पासून कागद, प्रिंटिंग साहित्य, वीज, केमिकल्स आणि मनुष्यबळ खर्चामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून जवळपास 150 टक्क्यांपर्यंत खर्च वाढलेला आहे. मात्र, शासनाच्या जाहिरात दरामध्ये कोणतीही वाढ झालेली नाही. त्यामुळे लघु व मध्यम वृत्तपत्रे आर्थिक संकटात सापडली आहेत.

यावर उपाय म्हणून शासनाने किमान 150% जाहिरात दरवाढ करावी, अशी प्रमुख मागणी करण्यात आली आहे.

तसेच,

जाहिरात बिलांचे 30 दिवसांत भुगतान करावे

ई-टेंडर नोटीस पूर्ण स्वरूपात वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध करावी

जाहिरात वितरणात पारदर्शकता राखावी

25 वर्षे पूर्ण केलेल्या वृत्तपत्रांना नैसर्गिक दरवाढ लागू करावी


अशा विविध मागण्या निवेदनातून करण्यात आल्या आहेत.

यावेळी राज्यातील पत्रकारांवर वाढत्या हल्ल्यांबाबतही चिंता व्यक्त करण्यात आली. अकोला, नांदेड, रत्नागिरी, पनवेल आणि श्रीरामपूर येथील घटनांचा उल्लेख करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली.

पत्रकार संरक्षण कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्याची मागणीही यावेळी करण्यात आली.

व्हॉईस ऑफ मीडिया सातारा जिल्हाध्यक्ष अनिल करंदेकर यांनी सांगितले की,
👉 “या मागण्यांकडे तातडीने लक्ष न दिल्यास जिल्हाभर तीव्र आंदोलन करण्यात येईल.”

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

श्री अमित नवनाथ करचे यांची राष्ट्रीय युवक अध्यक्षपदी निवड

Airtel Payments Bank च्या खातेदाराच्या वारसांना बँकेकडून 2 लाख रुपयांची आर्थिक मदत

🩸🌱 स्वर्गीय श्रीपती सावंत सर यांच्या प्रथम स्मृतीदिनानिमित्त विविध सामाजिक उपक्रम उत्साहात संपन्न 🌱🩸