Airtel Payments Bank च्या खातेदाराच्या वारसांना बँकेकडून 2 लाख रुपयांची आर्थिक मदत
Airtel Payments Bank च्या खातेदाराच्या वारसांना बँकेकडून 2 लाख रुपयांची आर्थिक मदत
रामचंद्र धुळप कराड तालुका प्रतिनिधी
कराड तालुक्यातील रस्ते अपघातात मृत्यू झालेल्या Airtel Payments Bank च्या एका खातेदाराच्या वारसांना बँकेकडून 2 लाख रुपयांची आर्थिक मदत देण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बाळासो कृष्णा शेवाळे (वय 70, रा. शेवाळेवाडी, येवती) यांचा गलमेवाडी–येवती रस्त्यावर झालेल्या भीषण अपघातात मृत्यू झाला.
घटनेनंतर कुटुंबीयांनी सर्व आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून बँक प्रतिनिधी सौ. रोमा धुळप यांच्याकडे Airtel Payments Bank मध्ये विमा दाव्यासाठी अर्ज दाखल केला होता. बँकेने पडताळणी पूर्ण केल्यानंतर विमा योजनेअंतर्गत 2 लाख रुपयांची रक्कम वारसांना मंजूर करण्यात आली.
सदर विमा रक्कम मिळवून देण्यासाठी साऊथ महाराष्ट्र (कोल्हापूर विभाग) चे CGO श्री. रविराज पाटील यांनी मोलाचे सहकार्य केले. तसेच झोनल मॅनेजर श्री. प्रवीण भोपळे आणि सातारा विभागाच्या ZTM आस्मा शेख यांनीही आवश्यक पाठपुरावा केला.
ही रक्कम Airtel Payments Bank शाखा, शेवाळेवाडी (म्हासोली) येथे मृताच्या वारस आकाताताई बाळासो शेवाळे व सचिन बाळासो शेवाळे यांना रक्कम सुपूर्द करण्यात आली.
दरम्यान, अशा विमा योजनांबाबत अनेक खातेदार अनभिज्ञ असल्याचे दिसून येत असून, नागरिकांनी आपल्या बँक खात्यांशी संबंधित सुविधांची माहिती करून घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा