महाराष्ट्रात 21 वी पशुगणनेचे मानधन रखडले; प्रगणकांमध्ये नाराजी

महाराष्ट्र रक्षक न्यूज | विशेष वृत्त
डॉ सुहास पाटील सातारा जिल्हा प्रतिनिधी 
महाराष्ट्रात पशुसंवर्धन विभागाकडून करण्यात आलेल्या 21 व्या पशुगणनेचे मानधन अद्याप प्रलंबित असल्याने प्रगणकांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.
फेब्रुवारी 2025 मध्ये सुरू झालेली ही पशुगणना मे अखेरपर्यंत यशस्वीरित्या पूर्ण करण्यात आली होती. या कामासाठी पशुसंवर्धन विभागामार्फत प्रगणक आणि सुपरवायझर यांची नेमणूक करण्यात आली होती.
प्रगणकांना प्रति कुटुंब शहरी भागासाठी 9 रुपये आणि ग्रामीण भागासाठी 10 रुपये मानधन देण्याचे जाहीर करण्यात आले होते. तसेच ऑनलाइन माहिती भरण्यासाठीही अतिरिक्त मानधन देण्याचे आश्वासन देण्यात आले होते.
मात्र, पशुगणना पूर्ण होऊन दीड वर्ष उलटून गेले असतानाही प्रगणकांना केवळ मोबाईल बिलाचा खर्च मिळाला असून मूळ मानधन अद्याप मिळालेले नाही.
याबाबत तालुका पशुसंवर्धन अधिकाऱ्यांकडे चौकशी केली असता, मानधन केंद्र शासनाच्या पशुसंवर्धन विभागाकडून येणार असल्याने नेमके कधी मिळेल याबाबत स्पष्ट माहिती नसल्याचे सांगण्यात येत आहे.
दरम्यान, या परिस्थितीमुळे प्रगणकांमध्ये तीव्र नाराजी पसरली असून भविष्यात पशुगणना करण्यासाठी कर्मचारी मिळतील की नाही याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
स्थानिक पशुवैद्यकीय दवाखान्यांतील डॉक्टरांच्या सहकार्यामुळे ही गणना पूर्ण झाली असली तरी, अशा धोरणामुळे भविष्यात डॉक्टरांनाच उपचार आणि लसीकरण बंद करून अशा कामांकडे वळावे लागेल, अशी भीती व्यक्त होत आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

श्री अमित नवनाथ करचे यांची राष्ट्रीय युवक अध्यक्षपदी निवड

Airtel Payments Bank च्या खातेदाराच्या वारसांना बँकेकडून 2 लाख रुपयांची आर्थिक मदत

🩸🌱 स्वर्गीय श्रीपती सावंत सर यांच्या प्रथम स्मृतीदिनानिमित्त विविध सामाजिक उपक्रम उत्साहात संपन्न 🌱🩸