तांबवे येथे जाहीर सभेत हिंगणगावातील नागरिकांचा जाहीर शिवसेनेत पक्षप्रवेश
तांबवे येथे जाहीर सभेत हिंगणगावातील नागरिकांचा जाहीर शिवसेनेत पक्षप्रवेश प्रतिनिधी वैष्णव ढमाळ तांबवे : तांबवे येथे आयोजित जाहीर सभेत हिंगणगाव येथील नागरिकांचा जाहीर शिवसेनेत पक्षप्रवेश सोहळा उत्साहात पार पडला. पालकमंत्री ना. शंभूराजे देसाई तसेच जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष मा. श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली हा पक्षप्रवेश पार पडला. यावेळी सचिन हणमंत ठोंबरे, संभाजी शिवाजी झिटे, सुनील चंदर शिंदे, गोविंदा बापू शिंदे, अभिजीत बाळू शिंदे, लालासो आकुंश ठोंबरे, सुभाष ज्ञानदेव शिंदे, पोपट विलास शिंदे, सुभाष चंद्रकांत झिटे आणि तुकाराम कृष्णा ठोंबरे यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. या पक्षप्रवेश सोहळ्यास पराग भोईटे-इनामदार, नरशिंग ठोंबरे, नानासो खरात, संतोष ज्ञानदेव ठोंबरे, जयदीप भोईटे, ओंकार भोईटे, मंगेश काकडे यांच्यासह हिंगणगाव येथील बहुसंख्य नागरिक उपस्थित होते. हिंगणगावातील नागरिकांनी जाहीरपणे शिवसेनेत प्रवेश केल्याने तांबवे परिसरातील राजकीय वातावरणात या पक्षप्रवेशाची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
टिप्पण्या