मंथन परीक्षेत देऊळगाव गाडा जिल्हा परिषद शाळेचे वर्चस्व; केंद्रातील पहिल्या ५ क्रमांकांत शाळेच्या ३ विद्यार्थिनी!
देऊळगाव गाडा (प्रतिनिधी):अमोल शिंदे
फेब्रुवारी २०२६ मध्ये घेण्यात आलेल्या 'मंथन राज्यस्तरीय सामान्य ज्ञान परीक्षेत' जिल्हा परिषद प्राथमिक शाळा देऊळगाव गाडा येथील विद्यार्थिनींनी दैदिप्यमान यश संपादन केले आहे. विशेष म्हणजे, केडगाव केंद्रामधून काढण्यात आलेल्या पहिल्या पाच क्रमांकांपैकी तब्बल तीन क्रमांक याच शाळेच्या विद्यार्थिनींनी पटकावत शाळेचा आणि गावाचा नावलौकिक वाढवला आहे.
यशस्वी विद्यार्थिनींची कामगिरी:
कु. स्वरा मनोज शितोळे (इयत्ता ४ थी): हिने ३०० पैकी २४४ गुण मिळवून केडगाव केंद्रामध्ये प्रथम क्रमांक पटकावला. तिने राज्यात २१ वा, जिल्ह्यात २४ वा तर तालुक्यात १५ वा क्रमांक मिळवला आहे.
कु. श्रेया विजय दगडे (इयत्ता ४ थी): ३०० पैकी २३२ गुण मिळवून केंद्रामध्ये पाचवा क्रमांक मिळवला. तिने राज्यात ३५ वा, जिल्ह्यात ३० वा तर तालुक्यात २१ वा क्रमांक प्राप्त केला.
कु. श्रुती विजय दगडे (इयत्ता ४ थी): हिने देखील ३०० पैकी २३२ गुण मिळवून केंद्रामध्ये पाचवा क्रमांक प्राप्त केला आहे.
एकाच शाळेतील तीन मुलींनी केंद्रस्तरीय गुणवत्ता यादीत स्थान मिळवल्याबद्दल ग्रामस्थांकडून समाधान व्यक्त केले जात आहे. या यशाबद्दल देऊळगाव गाडा केंद्राच्या केंद्रप्रमुख प्रतिभा शितोळे, शाळा व्यवस्थापन समिती आणि ग्रामस्थांच्या वतीने यशस्वी विद्यार्थिनींचा विशेष सत्कार करून त्यांचे कौतुक करण्यात आले.
या विद्यार्थिनींना शाळेचे मुख्याध्यापक श्री. गणेश कृष्णराव खेडेकर, वर्गशिक्षक सौ. दमयंती गणेश खेडेकर आणि श्रीमती मनीषा शांतीलाल चव्हाण यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. या यशाबद्दल सर्व स्तरांतून विद्यार्थिनींचे आणि शिक्षकांचे अभिनंदन होत आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा