उमेश बबन धुमाळ यांची डिजिप्रेस मीडिया संघटना भारतच्या राष्ट्रीय उपाध्यक्ष (पश्चिम भारत) पदी निवड

उमेश बबन धुमाळ यांची डिजिप्रेस मीडिया संघटना भारतच्या राष्ट्रीय उपाध्यक्ष (पश्चिम भारत) पदी निवड

 प्रतिनिधी सुहास पाटील 

उमेश बबन धुमाळ यांची डिजिप्रेस मीडिया संघटना भारतच्या राष्ट्रीय उपाध्यक्ष (पश्चिम भारत) पदी निवड करण्यात आली आहे. त्यांच्या निवडीमुळे संघटनेच्या कार्याला अधिक बळ मिळणार असल्याची भावना पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.

ही निवड संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री. वैष्णव ढमाळ यांच्या नेतृत्वाखाली जाहीर करण्यात आली. पत्रकारिता, सामाजिक कार्य आणि संघटनात्मक बांधिलकी लक्षात घेऊन उमेश धुमाळ यांच्यावर ही महत्त्वपूर्ण जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

राष्ट्रीय उपाध्यक्ष (पश्चिम भारत) या पदाच्या माध्यमातून महाराष्ट्रासह पश्चिम भारतातील विविध राज्यांमध्ये संघटनेचे कार्य अधिक प्रभावीपणे विस्तारण्यासाठी ते प्रयत्नशील राहतील, असा विश्वास संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.

उमेश बबन धुमाळ यांच्या निवडीबद्दल संघटनेचे राष्ट्रीय, राज्य, जिल्हा व तालुका स्तरावरील पदाधिकारी, पत्रकार बांधव तसेच हितचिंतकांकडून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. त्यांच्या भावी वाटचालीसाठी सर्व स्तरांतून शुभेच्छा व्यक्त करण्यात येत आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

तांबवे येथे जाहीर सभेत हिंगणगावातील नागरिकांचा जाहीर शिवसेनेत पक्षप्रवेश

श्री अमित नवनाथ करचे यांची राष्ट्रीय युवक अध्यक्षपदी निवड

मेढा आगारातील अपघातांबाबत गंभीर प्रश्न; चालक-वाहकांवरील अतिरिक्त कामाचा ताण आणि बस देखभालीकडे दुर्लक्षाचा आरोप