संदीप ठवाळ यांची 'ग्रामविकास अधिकारी युनियन'च्या दौंड तालुका अध्यक्षपदी बिनविरोध निवड!
दौंड तालुक्यातील गलांडवाडी गावचे कर्तव्यदक्ष ग्रामविकास अधिकारी श्री. संदीप ठवाळ यांची 'ग्रामविकास अधिकारी युनियन, दौंड'च्या तालुका अध्यक्षपदी जाहीर निवड करण्यात आली आहे. त्यांच्या या निवडीमुळे संपूर्ण तालुक्यातून आणि शासकीय वर्तुळातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
गलांडवाडी (ता. दौंड, जि. पुणे) येथे ग्रामविकास अधिकारी म्हणून कार्यरत असताना, संदीप ठवाळ यांनी आपल्या अष्टपैलू आणि कुशल प्रशासकीय कौशल्याच्या जोरावर अनेक लोकोपयोगी कामे यशस्वीरित्या पूर्ण केली आहेत. त्यांची कामावरील निष्ठा आणि सर्व सहकाऱ्यांना सोबत घेऊन जाण्याची वृत्ती लक्षात घेऊन, युनियनच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी आणि सदस्यांनी एकमुखाने ही जबाबदारी त्यांच्या खांद्यावर सोपवली आहे.
"तालुक्यातील ग्रामविकासाला नवी गती मिळणार"
संदीप ठवाळ भाऊसाहेब यांच्या कुशल नेतृत्वाखाली आगामी काळात दौंड तालुक्यातील ग्रामविकासाच्या कामांना अधिक गती मिळेल, तसेच ग्रामविकास अधिकाऱ्यांचे प्रश्न आणि समस्या प्राधान्याने सुटतील, असा विश्वास युनियनच्या सर्व सदस्यांनी व ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे.
त्यांच्या या निवडीबद्दल प्रशासकीय अधिकारी, राजकीय नेते, विविध संघटनांचे पदाधिकारी आणि गलांडवाडी ग्रामस्थांकडून त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करण्यात येत असून, पुढील भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या जात आहेत.
टिप्पण्या