पत्रकारांना "दलाल" म्हणणाऱ्या मुजोर वाहतूक निरीक्षक शाहरुख खान यांचे निलंबन डिजिप्रेस मीडिया संघटना महाराष्ट्र राज्य यांच्याकडून निर्णयाचे स्वागत

डिजिप्रेस मीडिया संघटना महाराष्ट्र राज्य यांचा निर्णयाचे स्वागत
महाबळेश्वर बसस्थानक येथे पत्रकारांना "दलाल" म्हणत अपमानास्पद वक्तव्य करणाऱ्या व पत्रकारांना धमकी देणाऱ्या वाहतूक निरीक्षक शाहरुख खान यांच्या निलंबनाच्या कारवाईचे डिजिप्रेस मीडिया संघटना महाराष्ट्र राज्य यांनी स्वागत केले आहे.

संघटनेचे संस्थापक अध्यक्ष वैष्णव मनोज ढमाळ राष्ट्रीय उपाध्यक्ष सुहास शिवाजी पाटील यांनी सांगितले की, पत्रकार हे लोकशाहीचा चौथा स्तंभ असून त्यांचा अपमान कोणत्याही परिस्थितीत सहन केला जाणार नाही. पत्रकारांवर दबाव टाकणे, धमकावणे किंवा त्यांची बदनामी करणे हे निषेधार्ह असून अशा प्रवृत्तीविरोधात संघटना नेहमीच ठाम भूमिका घेईल.

संघटनेने प्रशासनाने केलेल्या निलंबनाच्या कारवाईचे स्वागत करत भविष्यात अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी संबंधित विभागाने कठोर पावले उचलावीत, अशी मागणी केली आहे.

यावेळी डिजिप्रेस मीडिया संघटना महाराष्ट्र राज्यचे पदाधिकारी व सदस्यांनी पत्रकारांच्या सन्मानासाठी एकजूट राहण्याचे आवाहन केले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

तांबवे येथे जाहीर सभेत हिंगणगावातील नागरिकांचा जाहीर शिवसेनेत पक्षप्रवेश

श्री अमित नवनाथ करचे यांची राष्ट्रीय युवक अध्यक्षपदी निवड

मेढा आगारातील अपघातांबाबत गंभीर प्रश्न; चालक-वाहकांवरील अतिरिक्त कामाचा ताण आणि बस देखभालीकडे दुर्लक्षाचा आरोप