बँकेत पैसे भरायचे असोत, नवीन खातं उघडायचं असो किंवा इतर कोणतंही महत्त्वाचं काम, स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेत गेल्यावर "सध्या आमचा लंच टाइम सुरू आहे, नंतर या" असा अनुभव अनेकांना आलेला असतो. सोशल मीडियावर तर एसबीआयच्या 'लंच टाइम' आणि त्यावरून तयार होणारे मीम्स-जोक्स नेहमीच तुफान व्हायरल होत असतात,*

*बँकेत पैसे भरायचे असोत, नवीन खातं उघडायचं असो किंवा इतर कोणतंही महत्त्वाचं काम, स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेत गेल्यावर "सध्या आमचा लंच टाइम सुरू आहे, नंतर या" असा अनुभव अनेकांना आलेला असतो. सोशल मीडियावर तर एसबीआयच्या 'लंच टाइम' आणि त्यावरून तयार होणारे मीम्स-जोक्स नेहमीच तुफान व्हायरल होत असतात,*

*पण खरंच एसबीआय किंवा इतर बँकांमध्ये ग्राहकांचे काम थांबवून सर्व कर्मचाऱ्यांनी एकाच वेळी जेवायला जाण्याचा कोणताही अधिकृत नियम आहे का? देशातील सर्वात मोठ्या सरकारी बँकेत लंच टाइमविषयी नक्की काय नियम आहेत जाणून घ्या,*

*भारतीय रिझर्व्ह बँक आणि स्टेट बँक ऑफ इंडियाच्या अधिकृत नियमांनुसार पब्लिक डिलिंग कधीही थांबत नाही. बँकेत असा कोणताही निश्चित किंवा फिक्स लंच टाइम नसतो, ज्या दरम्यान बँकेचे मुख्य शटर बंद केले जाईल किंवा ग्राहकांची कामेपूर्णपणे थांबवली जातील,*

*ग्राहकांची गैरसोय टाळण्यासाठी एसबीआयमध्ये दुपारी १ ते ३ वाजेदरम्यान सर्व कर्मचारी आलटून पालटून (बारीबारीने) जेवणासाठी जातात. नियमानुसार, जर काउंटर नंबर-१ चा कर्मचारी लंचसाठी सीटवरून उठला, तर त्याच्या जागी काउंटर नंबर-२ चा कर्मचारी किंवा दुसरा कोणताही उपलब्ध स्टाफ येऊन ती सीट सांभाळेल, जेणेकरून ग्राहकांना ताटकळत उभे राहावे लागणार नाही,*

*बँका सकाळी १० ते संध्याकाळी ४ वाजेपर्यंत पब्लिक डिलिंगसाठी खुल्या असतात. दुपारी १ ते ३ या लंचच्या वेळेतही ग्राहकांचे काम करून देणे बँकेवर बंधनकारक आहे,*

*जर तुम्ही दुपारी बँकेत गेलात आणि तिथले काउंटर रिकामे दिसले किंवा कर्मचारी लंचचे कारण सांगून तुम्हाला तासंतास प्रतीक्षा करायला लावत असतील, तर तुम्ही शांत न बसता खालील पर्यायांचा वापर करून तक्रार नोंदवू शकता,*

*१) शाखा व्यवस्थापकाकडे तक्रार :* सर्वात आधी संबंधित बँकेच्या ब्रांच मॅनेजरला भेटून या प्रकाराची तोंडी किंवा लेखी तक्रार करा. ग्राहकांच्या तक्रारीचे निवारण करणे मॅनेजरचे कर्तव्य असते,
*२) टोल-फ्री नंबरवर कॉल :* तुम्ही थेट एसबीआयच्या अधिकृत ग्राहक सेवा केंद्राच्या १८०० १२३४ (1800 1234) या टोल-फ्री नंबरवर कॉल करून संबंधित कर्मचाऱ्याची आणि शाखेची तक्रार करू शकता,
*३) ऑनलाइन तक्रार :* एसबीआयच्या अधिकृत वेबसाइटवर (crc.sbi.co.in) 'CMS' (Customer Grievance) पोर्टलवर जाऊन तुमची तक्रार नोंदवू शकता.

*⚛️ 93 26 36 53 96 ⚛️*

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

श्री अमित नवनाथ करचे यांची राष्ट्रीय युवक अध्यक्षपदी निवड

Airtel Payments Bank च्या खातेदाराच्या वारसांना बँकेकडून 2 लाख रुपयांची आर्थिक मदत

🩸🌱 स्वर्गीय श्रीपती सावंत सर यांच्या प्रथम स्मृतीदिनानिमित्त विविध सामाजिक उपक्रम उत्साहात संपन्न 🌱🩸