डिजिप्रेस मीडिया संघटना भारताच्या राष्ट्रीय मुख्य समन्वयकपदी शंकर कुंडलिक भोईटे यांची नियुक्ती

पुणे, प्रतिनिधी : डिजिप्रेस मीडिया संघटना भारतच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत महत्त्वपूर्ण नियुक्ती करण्यात आली असून श्री. शंकर कुंडलिक भोईटे यांची राष्ट्रीय मुख्य समन्वयक (Chief Coordinator) पदी नियुक्ती करण्यात आल्याची माहिती संघटनेचे  अध्यक्ष वैष्णव ढमाळ यांनी दिली.संघटनेच्या राष्ट्रीय स्तरावरील विस्तार, विविध राज्यांतील पदाधिकाऱ्यांमध्ये समन्वय साधणे, संघटनात्मक कार्य अधिक प्रभावीपणे राबविणे तसेच पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते आणि सदस्य यांना एकत्रित करून संघटनेची उद्दिष्टे पूर्ण करण्याची जबाबदारी श्री. भोईटे यांच्याकडे सोपविण्यात आली आहे.
श्री. भोईटे यांच्या नियुक्तीमुळे संघटनेच्या कार्याला अधिक गती मिळेल तसेच देशभरातील संघटनात्मक जाळे मजबूत होण्यास मदत होईल, असा विश्वास संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.
या नियुक्तीबद्दल विविध स्तरांवरील पदाधिकारी, पत्रकार व सदस्यांनी श्री. शंकर कुंडलिक भोईटे यांचे अभिनंदन करून त्यांच्या भावी कार्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.श्री. शंकर कुंडलिक भोईटे यांना राष्ट्रीय मुख्य समन्वयकपदी नियुक्त झाल्याबद्दल डिजिप्रेस मीडिया संघटना भारततर्फे हार्दिक अभिनंदन व पुढील कार्यासाठी शुभेच्छा व्यक्त करण्यात आल्या आहेत. 💐
– महाराष्ट्र रक्षक न्यूज / डिजिप्रेस मीडिया संघटना भारत

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

श्री अमित नवनाथ करचे यांची राष्ट्रीय युवक अध्यक्षपदी निवड

Airtel Payments Bank च्या खातेदाराच्या वारसांना बँकेकडून 2 लाख रुपयांची आर्थिक मदत

🩸🌱 स्वर्गीय श्रीपती सावंत सर यांच्या प्रथम स्मृतीदिनानिमित्त विविध सामाजिक उपक्रम उत्साहात संपन्न 🌱🩸