गलांडवाडी ग्रामस्थांचा स्तुत्य उपक्रम: शाळा खोली बांधकामासाठी निगडे कुटुंबाकडून ५१ हजार रुपयांची लोकवर्गणी!
अमोल शिंदे प्रतिनिधी
वृक्षारोपण करून दिला पर्यावरण संवर्धनाचा संदेश गलांडवाडी: 'मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान' अंतर्गत येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या नवीन वर्ग खोल्यांच्या बांधकामासाठी लोकसहभागातून एक महत्त्वाचे पाऊल उचलण्यात आले आहे. गावातील प्रतिष्ठित नागरिक श्री. मधुकर मारुतराव निगडे, श्री. संतोष मधुकर निगडे आणि श्री. दत्तात्रेय मधुकर निगडे यांनी सामाजिक बांधिलकी जपत शाळा खोली बांधकामासाठी ५१,००० रुपये (एक्यावन्न हजार रुपये) रकमेची लोकवर्गणी सुपूर्द केली आहे. त्यांच्या या दातृत्वाबद्दल ग्रामपंचायत गलांडवाडी आणि समस्त ग्रामस्थांच्या वतीने त्यांचे विशेष आभार मानण्यात आले.
या कौतुकास्पद प्रसंगाचे औचित्य साधून निगडे कुटुंबाच्या समवेत शाळा आणि ग्रामपंचायत परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. या माध्यमातून गावकऱ्यांनी पर्यावरण सुचक आणि संवर्धनाचा अत्यंत सुंदर संदेश दिला.
प्रमुख मान्यवरांची उपस्थिती
याप्रसंगी गावातील ज्येष्ठ आणि प्रमुख पदाधिकाऱ्यांची मोठी उपस्थिती लाभली होती. यामध्ये प्रामुख्याने:
निळकंठ बापू शितोळे, ज्ञानदेव तात्या कदम, उमेश अण्णा देवकर,. सरपंच.रमेश पासलकर. उपसरपंच प्रकाश शेलार ग्रामसेवक संदीप ठवाळ विश्वनाथ पवार, दत्तात्रेय कदम, डॉक्टर संजय जाधव, कुंजीर सर, किशोर छाजेड, संदीप शितोळे, पवार सर, रमेश देवकर, , अरुण कदम.सागर तात्या कदम, गजानन कदम, प्रमोद देवकर, अभिजीत ठोंबरे, सुरेश थोरात, अजित शितोळे, मनीष कदम, राम वसव, रतन कदम, अजित पवार, मयूर गायकवाड, विशाल देवकर, कुणाल भापकर, प्रणेस शितोळे, शुभम बोबडे, अविनाश जगताप.
यावेळी समस्त गलांडवाडी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. लोकसहभागातून शाळेचा कायापालट करण्याचा आणि पर्यावरणाचा समतोल राखण्याचा गलांडवाडी ग्रामस्थांचा हा उपक्रम इतर गावांसाठीही अत्यंत प्रेरणादायी ठरत आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा