जयसिंग मानसिंग कांबळे यांची डिजिप्रेस मीडिया संघटना भारतच्या कराड तालुका उपाध्यक्षपदी निवड
जयसिंग मानसिंग कांबळे यांची डिजिप्रेस मीडिया संघटना भारतच्या कराड तालुका उपाध्यक्षपदी निवड
जयसिंग मानसिंग कांबळे यांची डिजिप्रेस मीडिया संघटना भारत, महाराष्ट्र राज्यच्या कराड तालुका उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. त्यांच्या निवडीबद्दल विविध स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
ही निवड संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री. वैष्णव ढमाळ, राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉ. सुहास पाटील, राष्ट्रीय कार्याध्यक्ष श्री. अमोल शिंदे तसेच सातारा जिल्हाध्यक्ष श्री. राजाराम पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जाहीर करण्यात आली.
जयसिंग कांबळे यांनी सामाजिक, पत्रकारिता व संघटनात्मक क्षेत्रात केलेल्या कार्याची दखल घेऊन त्यांच्यावर ही जबाबदारी सोपविण्यात आली आहे. त्यांच्या निवडीमुळे कराड तालुक्यात संघटनेचे कार्य अधिक प्रभावीपणे विस्तारेल, असा विश्वास पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.
त्यांच्या भावी कार्यकाळासाठी विविध मान्यवर, पत्रकार बांधव व हितचिंतकांकडून शुभेच्छा देण्यात येत आहेत.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा