महाराष्ट्र रक्षक न्यूज’ हे डिजिप्रेस मीडिया संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या अंतर्गत अधिकृत डिजिटल न्यूज चॅनेल; अधिकृत पत्र जारी



‘महाराष्ट्र रक्षक न्यूज’ हे डिजिप्रेस मीडिया संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या अंतर्गत अधिकृत डिजिटल न्यूज चॅनेल; अधिकृत पत्र जारी

पुणे | प्रतिनिधी : अमोल शिंदे 

डिजिप्रेस मीडिया संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने ‘महाराष्ट्र रक्षक न्यूज’ हे संघटनेच्या अंतर्गत अधिकृत डिजिटल न्यूज चॅनेल म्हणून कार्यरत असल्याबाबत अधिकृत पत्र जारी करण्यात आले आहे.

संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष वैष्णव ढमाळ यांनी दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्र रक्षक न्यूज हे संघटनेचे अधिकृत वृत्तमाध्यम असून राज्यभरातील सामाजिक, शैक्षणिक, प्रशासकीय, सांस्कृतिक तसेच जनहिताच्या विषयांवरील बातम्या सत्य, निष्पक्ष आणि जबाबदारीने जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य करणार आहे.

अधिकृत पत्रानुसार, संघटनेच्या सर्व उपक्रम, निवेदने, पत्रकार परिषद, सामाजिक अभियान, कार्यक्रम तसेच विविध घडामोडींचे अधिकृत वृत्तांकन यापुढे महाराष्ट्र रक्षक न्यूज या माध्यमातून प्रकाशित व प्रसारित करण्यात येणार आहे.

राष्ट्रीय अध्यक्ष वैष्णव ढमाळ यांनी सर्व पदाधिकारी, सदस्य, पत्रकार प्रतिनिधी व नागरिकांना आवाहन केले आहे की, संघटनेशी संबंधित अधिकृत माहिती व वृत्तांसाठी केवळ महाराष्ट्र रक्षक न्यूज या अधिकृत माध्यमावरच विश्वास ठेवावा आणि कोणत्याही अनधिकृत अथवा अप्रमाणित माहितीपासून दूर राहावे.

पत्रकारितेतील सत्यता, पारदर्शकता, विश्वासार्हता आणि सामाजिक बांधिलकी जपत समाजहितासाठी कार्य करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

तांबवे येथे जाहीर सभेत हिंगणगावातील नागरिकांचा जाहीर शिवसेनेत पक्षप्रवेश

श्री अमित नवनाथ करचे यांची राष्ट्रीय युवक अध्यक्षपदी निवड

मेढा आगारातील अपघातांबाबत गंभीर प्रश्न; चालक-वाहकांवरील अतिरिक्त कामाचा ताण आणि बस देखभालीकडे दुर्लक्षाचा आरोप