मेढा येथे ‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत तिरंगा ध्वज वाटप उत्साहात संपन्न

मेढा येथे ‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत तिरंगा ध्वज वाटप उत्साहात संपन्न

 जावली प्रतिनिधी मोहन खुडे 

आज जावळी तालुक्याची राजधानी मेढा शहरात मेढा नगरपंचायत प्रशासन यांच्या वतीने तसेच *नामदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले महाराज साहेब सार्वजनिक बांधकाममंत्री महाराष्ट्र राज्य*, यांचे सूचनेनुसार *‘हर घर तिरंगा’* अभियानांतर्गत नागरिकांना व शालेय विद्यार्थ्यांना तिरंगा ध्वज वाटपाचा कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.

या उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. मोठ्या संख्येने नागरिका व शालेय विद्यार्थी उपस्थित राहून तिरंगा ध्वज स्वीकारला.
 यावेळी मेढा शहरातुन तिरंगा रॅली काढण्यात आली,‘भारत माता की जय’, ‘वंदे मातरम्’ अशा घोषणांनी मेढा शहर दुमदुमून गेले.
या कार्यक्रमास जावळीचे तहसीलदार श्री प्रविण मुदगल साहेब व नायब तहसिलदार श्री मुनावळे,सौ मोहीते मॅडम,व तहसिलदार ऑफिस अधिकारी वर्ग,बीडीओ श्री महेंद्र सपाते सर,विस्तार अधिकारी श्री कर्णे सर, व पंचायत समिती अधिकारी वर्ग,मेढा शहरातील प्रथम लोकनियुक्त नगराध्यक्षा सौ रूपालीताई वारागडे, उपनगराध्यक्ष श्री विकासजी देशपांडे ,बांधकाम सभापती श्री शिवाजीराव देशमुख, आरोग्य सभापती श्री नितीनजी मगरे, नगरसेवक श्री शिवाजीराव गोरे, नगरसेवक श्री धनंजयजी पवार,भारतीय जनता पार्टी सातारा जिल्हा उपाध्यक्ष श्री विठ्ठलजी देशपांडे, मेढा केंद्र शाळेच्या मुख्याध्यापिका सौ रंजना सपकाळ, शिक्षक,शिक्षिका,मेढा नगरपंचायतीचे अधिकारी, कर्मचारी,सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते, 
तिरंगा हा केवळ ध्वज नाही, तर तो आपल्या देशाच्या स्वाभिमानाचे, एकतेचे आणि राष्ट्रभक्तीचे प्रतीक आहे. ‘हर घर तिरंगा’ अभियानाच्या माध्यमातून प्रत्येक घरात तिरंगा आणि प्रत्येक मनात राष्ट्रप्रेमाची भावना जागृत करण्याचा संदेश यावेळी देण्यात आला...

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

तांबवे येथे जाहीर सभेत हिंगणगावातील नागरिकांचा जाहीर शिवसेनेत पक्षप्रवेश

श्री अमित नवनाथ करचे यांची राष्ट्रीय युवक अध्यक्षपदी निवड

मेढा आगारातील अपघातांबाबत गंभीर प्रश्न; चालक-वाहकांवरील अतिरिक्त कामाचा ताण आणि बस देखभालीकडे दुर्लक्षाचा आरोप