आलोक आश्विन शेटे यांची सातारा जिल्हा उपाध्यक्षपदी नियुक्ती
आलोक आश्विन शेटे यांची सातारा जिल्हा उपाध्यक्षपदी नियुक्ती
डिजिप्रेस मीडिया संघ – इंटरनॅशनल विंगच्या वतीने आलोक आश्विन शेटे, रा. सातारा, ता. सातारा, जि. सातारा यांची सातारा जिल्हा उपाध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
संघटनेची ध्येय-धोरणे व उद्दिष्टे तळागाळापर्यंत पोहोचविणे, संघटनेचा जिल्ह्यात विस्तार करणे तसेच पत्रकार व माध्यम क्षेत्रातील व्यक्तींच्या विविध प्रश्नांसाठी कार्य करणे, या उद्देशाने ही नियुक्ती करण्यात आली आहे.
आलोक आश्विन शेटे यांच्या सामाजिक व संघटनात्मक कार्याची दखल घेत त्यांच्यावर ही जबाबदारी सोपविण्यात आली असून, ते संघटनेच्या माध्यमातून सातारा जिल्ह्यात संघटनात्मक कार्याला अधिक बळकटी देतील, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.
त्यांच्या नियुक्तीबद्दल डिजिप्रेस मीडिया संघ – इंटरनॅशनल विंगच्या पदाधिकारी व सदस्यांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.
टिप्पण्या