तांबवे येथे विविध विकासकामांचे भूमिपूजन व उद्घाटन; नवनिर्वाचित सदस्यांचा सत्कार समारंभ

तांबवे येथे विविध विकासकामांचे भूमिपूजन व उद्घाटन; नवनिर्वाचित सदस्यांचा सत्कार समारंभ


फलटण | प्रतिनिधी वैष्णव ढमाळ 

फलटण तालुक्यातील तांबवे येथे विविध विकासकामांचे भूमिपूजन, उद्घाटन तसेच शिवसेना शाखेच्या उद्घाटनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. यासोबतच जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या नवनिर्वाचित सदस्यांचा सत्कार समारंभही यावेळी होणार आहे.

हा कार्यक्रम शनिवार, दि. १५ ऑगस्ट २०२६ रोजी सायंकाळी ४.३० वाजता, तांबवे येथील भैरवनाथ मंदिर सभामंडप येथे आयोजित करण्यात आला आहे.

कार्यक्रमास महाराष्ट्र राज्याचे पर्यटन व खनिकर्म मंत्री तथा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री मा. ना. शंभूराज देसाई यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. तसेच मा. आ. श्रीमंत रामराजे नाईक-निंबाळकर यांच्यासह विविध मान्यवरांची उपस्थिती लाभणार आहे.

कार्यक्रमास फलटण विधानसभा मतदारसंघाचे आमदार मा. श्री. दीपकराव चव्हाण, तसेच फलटण नगरपरिषद, पंचायत समिती, जिल्हा परिषद आणि विविध स्थानिक संस्थांमधील पदाधिकारी व लोकप्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. शिवसेना महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष मा. सौ. रेश्माताई भोसले यांच्यासह विविध पदाधिकारी व कार्यकर्तेही उपस्थित राहणार आहेत.

या कार्यक्रमाच्या माध्यमातून तांबवे परिसरातील विविध विकासकामांना चालना मिळणार असून, नवनिर्वाचित जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्यांचा सन्मान करून त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात येणार आहे. तसेच शिवसेना शाखेच्या माध्यमातून स्थानिक पातळीवरील संघटनात्मक कार्याला अधिक बळ मिळणार आहे.

कार्यक्रमास परिसरातील नागरिक, शिवसैनिक, पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

स्थळ : भैरवनाथ मंदिर सभामंडप, तांबवे, ता. फलटण, जि. सातारा.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

तांबवे येथे जाहीर सभेत हिंगणगावातील नागरिकांचा जाहीर शिवसेनेत पक्षप्रवेश

श्री अमित नवनाथ करचे यांची राष्ट्रीय युवक अध्यक्षपदी निवड

मेढा आगारातील अपघातांबाबत गंभीर प्रश्न; चालक-वाहकांवरील अतिरिक्त कामाचा ताण आणि बस देखभालीकडे दुर्लक्षाचा आरोप