पुणे जिल्ह्यात रेड अलर्ट; उद्या सर्व शाळांना सुट्टी*



प्रतिनिधी गौरव दिवेकर
: भारतीय हवामान विभागाने (IMD) ६ जुलै २०२६ रोजी पुणे जिल्ह्यासाठी 'रेड अलर्ट' जारी केला असून, संभाव्य अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा विचार करून जिल्ह्यातील सर्व शाळांना सोमवार, ६ जुलै रोजी सुट्टी जाहीर करण्यात आली असल्याची माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिली.हवामान विभागाने जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा दिल्यामुळे प्रशासनाने सर्व संबंधित यंत्रणांना सतर्क राहण्याचे निर्देश दिले आहेत. आपत्कालीन परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी यंत्रणा सज्ज ठेवण्यात आल्या असून, नागरिकांनीही खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी नागरिकांना अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडणे टाळावे, नदी, नाले, पूरप्रवण भाग तसेच धोकादायक ठिकाणांपासून दूर राहावे, असे आवाहन केले आहे. तसेच स्थानिक प्रशासन, आपत्ती व्यवस्थापन विभाग आणि हवामान विभागाकडून वेळोवेळी दिल्या जाणाऱ्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्याचेही त्यांनी सांगितले.
दरम्यान, संभाव्य अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून असून, नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता केवळ अधिकृत माहितीलाच प्राधान्य द्यावे, असे आवाहनही प्रशासनाने केले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

तांबवे येथे जाहीर सभेत हिंगणगावातील नागरिकांचा जाहीर शिवसेनेत पक्षप्रवेश

श्री अमित नवनाथ करचे यांची राष्ट्रीय युवक अध्यक्षपदी निवड

मेढा आगारातील अपघातांबाबत गंभीर प्रश्न; चालक-वाहकांवरील अतिरिक्त कामाचा ताण आणि बस देखभालीकडे दुर्लक्षाचा आरोप