हिंगणगाव येथील जगताप डी.पी. प्रश्न अखेर मार्गी; ग्रामस्थांकडून आमदार व नेत्यांचे आभार

फलटण विशेष प्रतिनिधी शंकर भोईटे 
हिंगणगाव येथील जगताप डी.पी. प्रश्न अखेर मार्गी; ग्रामस्थांकडून आमदार व नेत्यांचे आभार 
हिंगणगाव : गावातील दीर्घकाळ प्रलंबित असलेला जगताप डी.पी. (वीज वितरण) प्रश्न अखेर मार्गी लागला असून ग्रामस्थांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.
या प्रश्नाच्या सोडवणुकीसाठी माननीय रणजीत सिंह नाईक निंबाळकर, आमदार सचिन पाटील तसेच प्रल्हाद तात्या साळुंखे पाटील आणि अभीभैया निंबाळकर यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.
स्थानिक पातळीवरून दत्ता भोईटे, रमेश तात्या भोईटे आणि पंकज अहिरेकर यांनी आमदार साहेब व अभीभैय्या यांना संपर्क साधून जगताप डी.पी. संदर्भातील सविस्तर माहिती दिली.
ही माहिती मिळताच आमदार साहेब आणि अभीभैय्या यांनी तात्काळ संबंधित अधिकाऱ्यांना सूचना करून प्रश्न सोडवण्याचे आदेश दिले. त्यांच्या तातडीच्या हस्तक्षेपामुळे हा प्रश्न अल्पावधीत मार्गी लागला.
यामुळे हिंगणगाव ग्रामस्थांनी आमदार साहेब व अभीभैय्या यांचे मनापासून आभार मानत समाधान व्यक्त केले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

तांबवे येथे जाहीर सभेत हिंगणगावातील नागरिकांचा जाहीर शिवसेनेत पक्षप्रवेश

श्री अमित नवनाथ करचे यांची राष्ट्रीय युवक अध्यक्षपदी निवड

मेढा आगारातील अपघातांबाबत गंभीर प्रश्न; चालक-वाहकांवरील अतिरिक्त कामाचा ताण आणि बस देखभालीकडे दुर्लक्षाचा आरोप