डिजीप्रेस मिडिया संघटना भारत यांच्या राष्ट्रीय कार्यकारणीची घोषणा
डिजीप्रेस मिडिया संघटना भारत यांच्या राष्ट्रीय कार्यकारणीची घोषणा
डिजीप्रेस मिडिया संघटना भारत यांच्या राष्ट्रीय कार्यकारणीची नुकतीच घोषणा करण्यात आली असून संस्थापक व राष्ट्रीय अध्यक्षपदी श्री वैष्णव मनोज ढमाळ यांची निवड करण्यात आली आहे. तसेच राष्ट्रीय उपाध्यक्षपदी डॉक्टर सुहास शिवाजी पाटील तर राष्ट्रीय सचिवपदी श्री महेश बाळकृष्ण मोहिते यांची निवड जाहीर करण्यात आली. या निवडीमुळे संघटनेच्या कार्याला नवी दिशा मिळणार असल्याची भावना सदस्यांमधून व्यक्त होत आहे.डिजिटल पत्रकारिता, सामाजिक बांधिलकी आणि माध्यम क्षेत्रातील प्रतिनिधींना एकत्र आणण्याच्या उद्देशाने ही संघटना कार्यरत असून देशभरातील पत्रकार, युट्यूब न्यूज चॅनेल चालक, डिजिटल मिडिया प्रतिनिधी आणि सामाजिक कार्यकर्त्यांना संघटित करण्याचे काम संघटनेकडून केले जात आहे. नव्याने जाहीर झालेल्या राष्ट्रीय कार्यकारणीमुळे संघटनेचा विस्तार अधिक वेगाने होईल, असा विश्वास पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.संस्थापक व राष्ट्रीय अध्यक्ष श्री वैष्णव मनोज ढमाळ यांनी संघटनेच्या माध्यमातून पत्रकारांच्या हक्कांसाठी, डिजिटल मिडियाच्या सक्षमीकरणासाठी तसेच ग्रामीण भागातील पत्रकारांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी काम केले जाईल, असे सांगितले. राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉक्टर सुहास शिवाजी पाटील यांनी सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्राशी समन्वय साधून संघटनेचे कार्य अधिक व्यापक करण्याचा मानस व्यक्त केला. तर राष्ट्रीय सचिव श्री महेश बाळकृष्ण मोहिते यांनी संघटनेची संघटनात्मक बांधणी मजबूत करण्यासाठी देशभरात सदस्य नोंदणी अभियान राबविण्यात येणार असल्याचे सांगितले.या निवडीबद्दल विविधसामाजिक, राजकीय तसेच पत्रकारिता क्षेत्रातून नव्या पदाधिकाऱ्यांवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा