डिजिप्रेस मीडिया संघटना राज्यभर निवड प्रक्रिया जाहीर

डिजिप्रेस मीडिया संघटना राज्यभर निवड प्रक्रिया जाहीर

 : डिजिटल पत्रकारितेला बळकटी देण्यासाठी डिजिप्रेस मीडिया संघटनाच्या वतीने राज्यभरातील जिल्हा व तालुका स्तरावरील विविध पदांसाठी निवड प्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे. या उपक्रमातून संघटनेचा विस्तार करण्यासोबतच सक्षम व जबाबदार डिजिटल पत्रकारांची फळी तयार करण्याचा उद्देश असल्याचे सांगण्यात आले.

जिल्हा स्तरावर जिल्हाध्यक्ष, जिल्हा उपाध्यक्ष, उत्तर/दक्षिण जिल्हाध्यक्ष, जिल्हा सचिव, जिल्हा संघटक व जिल्हा सदस्य अशी पदे भरण्यात येणार आहेत. तसेच तालुका स्तरावर तालुकाध्यक्ष, तालुका उपाध्यक्ष, तालुका सचिव, तालुका संघटक आणि तालुका सदस्य पदांसाठीही इच्छुकांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत.

संस्थेचे संस्थापक अध्यक्ष वैष्णव ढमाळ यांनी सांगितले की, “सत्याचा आवाज बुलंद करण्यासाठी आणि डिजिटल पत्रकारितेला मजबूत पाया देण्यासाठी ही निवड प्रक्रिया महत्त्वाची ठरणार आहे.” तसेच राष्ट्रीय उपाध्यक्ष सुहास पाटील यांनी इच्छुकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवावा, असे आवाहन केले.

इच्छुक उमेदवारांनी अधिक माहितीसाठी दिलेल्या संपर्क क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.

“एकत्र या, सत्यासाठी लढा, समाजासाठी काम करा!” हा संदेश देत डिजिप्रेस मीडिया संघटनाने राज्यभरातील युवकांना या चळवळीत सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.

अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक
 संस्थापक अध्यक्ष वैष्णव ढमाळ 8390789328
राष्ट्रीय उपाध्यक्ष सुहास पाटील 9823961764

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

तांबवे येथे जाहीर सभेत हिंगणगावातील नागरिकांचा जाहीर शिवसेनेत पक्षप्रवेश

श्री अमित नवनाथ करचे यांची राष्ट्रीय युवक अध्यक्षपदी निवड

मेढा आगारातील अपघातांबाबत गंभीर प्रश्न; चालक-वाहकांवरील अतिरिक्त कामाचा ताण आणि बस देखभालीकडे दुर्लक्षाचा आरोप