इस्लामपूर येथे ‘A’ ग्रेड पशुधन व्यवस्थापन व दुग्धोत्पादन पदविका अभ्यासक्रमासाठी प्रवेश सुरू
प्रतिनिधी सुहास पाटील
इस्लामपूर : महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ, नागपूर मान्यताप्राप्त पशुधन व्यवस्थापन व दुग्धोत्पादन पदविका विद्यालय, इस्लामपूर येथे नवीन शैक्षणिक वर्षासाठी व्हेटरनरी डिप्लोमा (Veterinary Diploma) अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रिया सुरू झाल्या आहेत.
गणेश शिक्षण प्रसारक मंडळ, साखराळे (इस्लामपूर) संचलित या संस्थेला ‘A’ ग्रेड मान्यता प्राप्त असून विद्यार्थ्यांसाठी उत्तम शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहेत. सदर अभ्यासक्रमाचा कालावधी २ वर्षे असून प्रवेश क्षमता ६० विद्यार्थ्यांची आहे. तसेच प्रवेशासाठी १०वी किंवा १२वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
या अभ्यासक्रमाद्वारे विद्यार्थ्यांना पशुधन व्यवस्थापन, दुग्ध व्यवसाय, पोल्ट्री व्यवस्थापन, तसेच विविध पशुसंवर्धन क्षेत्रातील प्रशिक्षण दिले जाणार आहे. अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर विद्यार्थ्यांना स्वयंरोजगाराच्या विविध संधी उपलब्ध होणार असून, शासकीय व निमशासकीय संस्थांमध्येही रोजगाराच्या संधी निर्माण होणार आहेत.
याशिवाय दुग्ध संकलन केंद्र, पशुखाद्य कंपन्या, पोल्ट्री फार्म, तसेच शेतीपूरक व्यवसायांमध्ये काम करण्याची संधी विद्यार्थ्यांना मिळणार आहे. विशेष म्हणजे, विद्यार्थ्यांना प्रयोगशाळेतील प्रशिक्षण, अनुभवी प्राध्यापकांचे मार्गदर्शन आणि एस.टी. पाससारख्या सुविधा देण्यात येणार आहेत. तसेच मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी फीमध्ये सवलतीची सोय उपलब्ध आहे.
इच्छुक विद्यार्थ्यांनी अधिक माहितीसाठी संस्थेशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
📞 संपर्क: 9975461231 / 7709390982
📍 पत्ता: नवीन बहु नाका, शुगरटेक कॉलेज कॅम्पस, के.बी.पी. कॉलेज रोड, इस्लामपूर
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा