सज्जाद नजीरखान पठाण यांची राष्ट्रीय संघटकपदी निवड

सज्जाद नजीरखान पठाण यांची राष्ट्रीय संघटकपदी निवड

डिजिप्रेस मिडिया संघटना भारत यांच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत महत्त्वपूर्ण नियुक्ती करण्यात आली असून, श्री सज्जाद नजीरखान पठाण यांची राष्ट्रीय संघटक या पदावर निवड करण्यात आली आहे.
ही निवड संस्थेचे संस्थापक अध्यक्ष वैष्णव ढमाळ साहेब, राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉ. सुहास पाटील साहेब तसेच राष्ट्रीय कार्याध्यक्ष अमोल शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
श्री सज्जाद नजीरखान पठाण हे सामाजिक क्षेत्रातील कार्य, संघटन कौशल्य व जनसंपर्क यासाठी परिचित असून त्यांच्या निवडीमुळे संघटनेच्या राष्ट्रीय स्तरावरील संघटनात्मक कार्याला अधिक गती मिळणार असल्याचा विश्वास पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.
त्यांच्या निवडीबद्दल संघटनेचे सर्व पदाधिकारी, सदस्य तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले असून आगामी काळात संघटनेचा विस्तार व बळकटीकरणासाठी ते प्रभावीपणे कार्य करतील, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

तांबवे येथे जाहीर सभेत हिंगणगावातील नागरिकांचा जाहीर शिवसेनेत पक्षप्रवेश

श्री अमित नवनाथ करचे यांची राष्ट्रीय युवक अध्यक्षपदी निवड

मेढा आगारातील अपघातांबाबत गंभीर प्रश्न; चालक-वाहकांवरील अतिरिक्त कामाचा ताण आणि बस देखभालीकडे दुर्लक्षाचा आरोप