पाटीलवाडीत भक्तिमय कीर्तन सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न
पाटीलवाडीत भक्तिमय कीर्तन सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न
सातारा जिल्हा प्रतिनिधी सुहास पाटील
पाटीलवाडी : आशिर्वाद गणेश मंडळ, पाटीलवाडी यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला भक्तिमय कीर्तन सोहळा मंगळवार, दि. १५ सप्टेंबर २०२६ रोजी उत्साहपूर्ण आणि भक्तिमय वातावरणात संपन्न झाला.
या सोहळ्यात ह. भ. प. पौर्णिमा ताई कलकुरे (आणे, कर्नाटक) यांनी आपल्या ओघवत्या वाणीतून भाविकांना भक्तिरसात चिंब भिजवले. त्यांच्या प्रभावी कीर्तनातून भक्ती, संस्कार आणि सामाजिक एकोपा यांचा संदेश देण्यात आला.
कार्यक्रमाला भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. जुगाईमाता सांप्रदाय महिला भजन मंडळ, पाटीलवाडी यांची कीर्तन साथ लाभली. तसेच गायक, मृदंग, पेटी व चोपदार यांच्या सुरेल साथसंगतीमुळे कार्यक्रमाला विशेष रंगत आली.
कीर्तनादरम्यान परिसरात टाळ-मृदंगाच्या गजराने आणि भक्तिगीतांनी भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते. महिला, पुरुष तसेच तरुण-तरुणींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कीर्तनाचा लाभ घेतला.
“भक्तीचा वारसा जपुया, तरुणाईने आवर्जून सहभागी होऊया” या संदेशाला प्रतिसाद देत तरुणाईनेही कार्यक्रमात उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी आशिर्वाद गणेश मंडळ, पाटीलवाडीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.
टिप्पण्या