सांगलीचे सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालय समोर जनता क्रांती दलाचे बेमुदत धरणे आंदोलन ‌‌

सांगलीचे सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालय समोर जनता क्रांती दलाचे बेमुदत धरणे आंदोलन
 ‌‌
कडेगाव प्रतिनिधी  अजित वायदंडे 

       सांगली जिल्ह्यातील बांधकाम कामगार यांना मिळणाऱ्या सेफ्टी किट असेल किट संसार उपयोगी भांडी किट यामध्ये ठेकेदाराकडून व एजंटाकडून मोठ्या प्रमाणात पैसे गोळा केले जात आहेत त्याची चौकशी करून दिलेला ठेका त्वरित रद्द करण्यासाठी सांगली जिल्हा सहाय्यक कामगार आयुक्त यांच्या कार्यालयासमोर जनता क्रांती दलाचे 2 ऑक्टोबर 2026 पासून बेमुदत धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याचे जनता क्रांती दलाचे संस्थापक अध्यक्ष मा.सत्यवान कमाने साहेब व सांगली जिल्हा अध्यक्ष मा.अजित वायदंडे यांच्या नेतृत्वाखाली प्रशासनाला निवेदन देण्यात आले महाराष्ट्र शासनाची महत्त्वकांक्षी योजना महाराष्ट्र सह सांगली जिल्ह्यात प्रभावीपणे राबवली जात असताना त्याचा लाभ सर्व सामान्य गरीब गरजू कामगारांना मिळण्यासाठी कामगार आयुक्त कार्यालय आटोकाट प्रयत्न करीत असताना परंतु ज्या ठेकेदारी संस्थांना टेंडर देण्यात आले आहे त्यामुळे अक्षरशा बांधकाम कामगारांचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक लूट सुरू केली आहे सेफ्टी की इसेन्शियल किट संसार उपयोगी भांड्याचे केक हे लाभ देण्यासाठी ठेकेदार असणाऱ्या संस्थांनी त्यांच्यामार्फत सांगली जिल्ह्यातील वेगवेगळ्या तालुक्यांमध्ये एजंट नेमले आहे ते लाभार्थ्यांची संपर्क करून वेगवेगळे आम्ही सुद्धा कोण प्रसंगी भीती दाखवून उदाहरणार्थ तुमचे टीप नामंजूर करून अशी प्रत्यक्ष धमकी देऊन मोठ्या प्रमाणावर पैसे घेतले जातात पैसे दिले नाही तर जाणीवपूर्वक त्यांचे किट देण्यास टाळाटाळ केली जात आहे तसेच एजंटामार्फत प्रत्येक किट मागे पंधराशे रुपये बाराशे रुपये एक हजार रुपये असे पैसे दिले तरच आपले सेफ कीट संसार उपयोगी कीट मिळेल अन्यथा कामगारांची जाणीवपूर्वक हेळसांड केली जात आहे ठेकेदार व एजंट यांच्या संगनमताने लाखो रुपये लुटण्याचा प्रकार सरळ सरळ सांगली जिल्ह्यामध्ये सुरू आहे असे राजरोसपणे सुरू असताना कार्यालयाची कसली भीती व कायदेशीर धाक ठेकेदार व एजंट यांना वाटत नाही ठेकेदार संस्था व कर्मचारी यांना विचारले असता कार्यालयाला पैसे द्यावे लागतात असे त्यांचे म्हणणे येत आहे त्याशिवाय अधिकारी तुम्हाला कोणतेही कीट ना मंजूर करीत नाहीत ही बाब अतिशय गंभीर स्वरूपाचे असून बांधकाम कामगार खऱ्या लाभार्थी ला लाभापासून वंचित ठेवण्याचे व बोगस कामगारांना पैसे देऊन लाभ देण्याचा प्रकार निंदनीय आहे त्यामुळे सदर ठेकेदार संस्था व एजंट यांची बेकायदेशीररित्या मोठ्या प्रमाणावर पैशाची उलाढाल सुरू आहे त्याची चौकशी होणे गरजेचे आहे त्या ठेकेदारी संस्थेला क***** यादीमध्ये टाकून त्यांचा ठेका रद्द करण्यात यावा असे न केल्यास जनता क्रांती दलाच्या वतीने दोन ऑक्टोबर 2026 रोजी सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालय सांगली यांच्यासमोर बेमुदत धरणे आंदोलन केले जाईल निवेदनामध्ये मा. अजित पाटोळे युवक जिल्हाध्यक्ष मा.गणेश वाघमारे कडेगाव तालुका अध्यक्ष मा.मंगेश कांबळे कडेगाव तालुका उपाध्यक्ष

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

तांबवे येथे जाहीर सभेत हिंगणगावातील नागरिकांचा जाहीर शिवसेनेत पक्षप्रवेश

श्री अमित नवनाथ करचे यांची राष्ट्रीय युवक अध्यक्षपदी निवड

मेढा आगारातील अपघातांबाबत गंभीर प्रश्न; चालक-वाहकांवरील अतिरिक्त कामाचा ताण आणि बस देखभालीकडे दुर्लक्षाचा आरोप