पोस्ट्स
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष म्हणून अहिल्यानगरात सक्रिय कार्य
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
शेवगाव प्रतिनिधी सज्जाद पठाण स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष म्हणून अहिल्यानगरात सक्रिय कार्य अहिल्यानगर : शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर ठामपणे आवाज उठवत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष दत्तात्रय बाळकृष्ण फुंदे यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. शेतीमालाला हमीभाव, वीजदर सवलत, पाणीटंचाई आणि पीकविमा यांसारख्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर त्यांनी प्रशासनाचे लक्षन वेधले आहे. फुंदे यांनी सांगितले की, शेतकरी हा देशाचा कणा असून त्याच्या अडचणी तात्काळ सोडवणे गरजेचे आहे. शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी संघटनेच्या माध्यमातून विविध आंदोलने आणि निवेदने देण्यात येत आहेत. अहिल्यानगर जिल्ह्यातील अनेक भागांत त्यांनी दौरे करून शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या असून त्या सोडवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. आगामी काळात मोठ्या प्रमाणात आंदोलन छेडण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.
इस्लामपूर येथे ‘A’ ग्रेड पशुधन व्यवस्थापन व दुग्धोत्पादन पदविका अभ्यासक्रमासाठी प्रवेश सुरू
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
प्रतिनिधी सुहास पाटील इस्लामपूर येथे ‘A’ ग्रेड पशुधन व्यवस्थापन व दुग्धोत्पादन पदविका अभ्यासक्रमासाठी प्रवेश सुरू इस्लामपूर : महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ, नागपूर मान्यताप्राप्त पशुधन व्यवस्थापन व दुग्धोत्पादन पदविका विद्यालय, इस्लामपूर येथे नवीन शैक्षणिक वर्षासाठी व्हेटरनरी डिप्लोमा (Veterinary Diploma) अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रिया सुरू झाल्या आहेत. गणेश शिक्षण प्रसारक मंडळ, साखराळे (इस्लामपूर) संचलित या संस्थेला ‘A’ ग्रेड मान्यता प्राप्त असून विद्यार्थ्यांसाठी उत्तम शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहेत. सदर अभ्यासक्रमाचा कालावधी २ वर्षे असून प्रवेश क्षमता ६० विद्यार्थ्यांची आहे. तसेच प्रवेशासाठी १०वी किंवा १२वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. या अभ्यासक्रमाद्वारे विद्यार्थ्यांना पशुधन व्यवस्थापन, दुग्ध व्यवसाय, पोल्ट्री व्यवस्थापन, तसेच विविध पशुसंवर्धन क्षेत्रातील प्रशिक्षण दिले जाणार आहे. अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर विद्यार्थ्यांना स्वयंरोजगाराच्या विविध संधी उपलब्ध होणार असून, शासकीय व निमशासकीय संस्थांमध्येही रोजगाराच्या संधी निर्माण होणा...
हिंगणगाव येथील जगताप डी.पी. प्रश्न अखेर मार्गी; ग्रामस्थांकडून आमदार व नेत्यांचे आभार
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
फलटण विशेष प्रतिनिधी शंकर भोईटे हिंगणगाव येथील जगताप डी.पी. प्रश्न अखेर मार्गी; ग्रामस्थांकडून आमदार व नेत्यांचे आभार हिंगणगाव : गावातील दीर्घकाळ प्रलंबित असलेला जगताप डी.पी. (वीज वितरण) प्रश्न अखेर मार्गी लागला असून ग्रामस्थांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. या प्रश्नाच्या सोडवणुकीसाठी माननीय रणजीत सिंह नाईक निंबाळकर, आमदार सचिन पाटील तसेच प्रल्हाद तात्या साळुंखे पाटील आणि अभीभैया निंबाळकर यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. स्थानिक पातळीवरून दत्ता भोईटे, रमेश तात्या भोईटे आणि पंकज अहिरेकर यांनी आमदार साहेब व अभीभैय्या यांना संपर्क साधून जगताप डी.पी. संदर्भातील सविस्तर माहिती दिली. ही माहिती मिळताच आमदार साहेब आणि अभीभैय्या यांनी तात्काळ संबंधित अधिकाऱ्यांना सूचना करून प्रश्न सोडवण्याचे आदेश दिले. त्यांच्या तातडीच्या हस्तक्षेपामुळे हा प्रश्न अल्पावधीत मार्गी लागला. यामुळे हिंगणगाव ग्रामस्थांनी आमदार साहेब व अभीभैय्या यांचे मनापासून आभार मानत समाधान व्यक्त केले आहे.