पोस्ट्स

सज्जाद नजीरखान पठाण यांची राष्ट्रीय संघटकपदी निवड

सज्जाद नजीरखान पठाण यांची राष्ट्रीय संघटकपदी निवड डिजिप्रेस मिडिया संघटना भारत यांच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत महत्त्वपूर्ण नियुक्ती करण्यात आली असून, श्री सज्जाद नजीरखान पठाण यांची राष्ट्रीय संघटक या पदावर निवड करण्यात आली आहे. ही निवड संस्थेचे संस्थापक अध्यक्ष वैष्णव ढमाळ साहेब, राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉ. सुहास पाटील साहेब तसेच राष्ट्रीय कार्याध्यक्ष अमोल शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. श्री सज्जाद नजीरखान पठाण हे सामाजिक क्षेत्रातील कार्य, संघटन कौशल्य व जनसंपर्क यासाठी परिचित असून त्यांच्या निवडीमुळे संघटनेच्या राष्ट्रीय स्तरावरील संघटनात्मक कार्याला अधिक गती मिळणार असल्याचा विश्वास पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. त्यांच्या निवडीबद्दल संघटनेचे सर्व पदाधिकारी, सदस्य तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले असून आगामी काळात संघटनेचा विस्तार व बळकटीकरणासाठी ते प्रभावीपणे कार्य करतील, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.

श्री अमित नवनाथ करचे यांची राष्ट्रीय युवक अध्यक्षपदी निवड

इमेज
श्री  अमित नवनाथ करचे यांची राष्ट्रीय युवक अध्यक्षपदी निवड डिजिप्रेस मिडिया संघटना भारत यांच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत महत्त्वपूर्ण नियुक्ती करण्यात आली असून, श्री अमित नवनाथ करचे यांची राष्ट्रीय युवक अध्यक्ष या पदावर निवड करण्यात आली आहे. ही निवड संस्थेचे संस्थापक अध्यक्ष वैष्णव ढमाळ साहेब, राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉ. सुहास पाटील साहेब तसेच राष्ट्रीय कार्याध्यक्ष अमोल शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. श्री अमित करचे हे सामाजिक, पत्रकारिता व युवक संघटन क्षेत्रातील कार्यामुळे परिचित असून त्यांच्या निवडीमुळे संघटनेच्या युवक विभागाला अधिक बळ मिळणार असल्याचा विश्वास पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. त्यांच्या निवडीबद्दल संघटनेतील सर्व पदाधिकारी, सदस्य तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे. आगामी काळात संघटनेची युवक संघटना अधिक मजबूत करून सामाजिक व जनजागृतीपर उपक्रम प्रभावीपणे राबविण्यासाठी ते कार्य करतील, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.

डिजिप्रेस मीडिया संघटना राज्यभर निवड प्रक्रिया जाहीर

इमेज
डिजिप्रेस मीडिया संघटना राज्यभर निवड प्रक्रिया जाहीर  : डिजिटल पत्रकारितेला बळकटी देण्यासाठी डिजिप्रेस मीडिया संघटनाच्या वतीने राज्यभरातील जिल्हा व तालुका स्तरावरील विविध पदांसाठी निवड प्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे. या उपक्रमातून संघटनेचा विस्तार करण्यासोबतच सक्षम व जबाबदार डिजिटल पत्रकारांची फळी तयार करण्याचा उद्देश असल्याचे सांगण्यात आले. जिल्हा स्तरावर जिल्हाध्यक्ष, जिल्हा उपाध्यक्ष, उत्तर/दक्षिण जिल्हाध्यक्ष, जिल्हा सचिव, जिल्हा संघटक व जिल्हा सदस्य अशी पदे भरण्यात येणार आहेत. तसेच तालुका स्तरावर तालुकाध्यक्ष, तालुका उपाध्यक्ष, तालुका सचिव, तालुका संघटक आणि तालुका सदस्य पदांसाठीही इच्छुकांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष वैष्णव ढमाळ यांनी सांगितले की, “सत्याचा आवाज बुलंद करण्यासाठी आणि डिजिटल पत्रकारितेला मजबूत पाया देण्यासाठी ही निवड प्रक्रिया महत्त्वाची ठरणार आहे.” तसेच राष्ट्रीय उपाध्यक्ष सुहास पाटील यांनी इच्छुकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवावा, असे आवाहन केले. इच्छुक उमेदवारांनी अधिक माहितीसाठी दिल...

तुकाराम बाबुराव दुधडे यांची राष्ट्रीय जनसंपर्क अधिकारीपदी नियुक्ती

इमेज
डिजीप्रेस मिडिया संघटना भारत यांच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत महत्त्वपूर्ण नियुक्ती करण्यात आली असून तुकाराम बाबुराव दुधडे यांची राष्ट्रीय जनसंपर्क अधिकारी पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. ही नियुक्ती संस्थेचे संस्थापक अध्यक्ष वैष्णव ढमाळ साहेब तसेच राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉक्टर सुहास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. तुकाराम बाबुराव दुधडे यांच्या निवडीमुळे संस्थेच्या जनसंपर्क विभागाला अधिक बळ मिळणार असून संघटनेचे कार्य अधिक प्रभावीपणे जनतेपर्यंत पोहोचण्यास मदत होणार आहे. त्यांच्या निवडीबद्दल विविध स्तरांतून अभिनंदन व शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

🩸🌱 स्वर्गीय श्रीपती सावंत सर यांच्या प्रथम स्मृतीदिनानिमित्त विविध सामाजिक उपक्रम उत्साहात संपन्न 🌱🩸

इमेज
सांगली जिल्हा प्रतिनिधी मिथुन कांबळे  जयसिंगपूर येथे सोमवार, दि. २५ मे २०२६ रोजी सामाजिक चळवळीतील धडाडीचे आणि सर्वसामान्य कार्यकर्त्यांचे आधारस्तंभ दिवंगत श्रीपती सावंत सर यांच्या प्रथम स्मृतीदिनानिमित्त अभिवादन कार्यक्रम मोठ्या उत्साहात व भावपूर्ण वातावरणात संपन्न झाला. यावेळी सरांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. तसेच त्यांच्या सामाजिक कार्याचा वारसा पुढे चालवत रक्तदान शिबीर, वृक्षारोपण आणि गरजू विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्य संकलन असे विविध समाजोपयोगी उपक्रम राबविण्यात आले. विशेष म्हणजे, सरांच्या स्मृतीप्रीत्यर्थ हार-तुऱ्यांवरील अनावश्यक खर्च टाळून वही, पेन व शालेय साहित्य देण्याचे करण्यात आलेले आवाहन नागरिकांनी उत्स्फूर्तपणे स्वीकारले. या माध्यमातून अनेक गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदतीचा हात देण्यात आला. या उपक्रमाला माजी मंत्री व आमदार माननीय डॉ. राजेंद्र पाटील यड्रावकर साहेब, दत्त सहकारी साखर कारखान्याचे सर्वेसर्वा माननीय गणपतदादा पाटील साहेब, कोल्हापूर जिल्हा परिषद समाजकल्याण सभापती सौ. गायकवाड मॅडम,व श्री अविनाश गायकवाड साहेब...

शेवगाव तालुक्यात डिझेल टंचाई; नांगरटी ठप्प, शेकडो एकर शेती पडीत राहण्याची भीती”

इमेज
शेवगाव (प्रतिनिधी): सज्जाद पठाण  खरीप हंगाम तोंडावर असताना शेवगाव तालुक्यात डिझेल टंचाईने गंभीर स्वरूप धारण केले असून, नांगरटीच्या हंगामात शेतकऱ्यांना मोठा फटका बसत आहे. पंपांवर तासन्तास रांगा लावूनही डिझेल मिळत नसल्याने शेतीची अत्यावश्यक कामे ठप्प झाली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. मे महिना हा मशागतीसाठी अत्यंत महत्त्वाचा कालावधी मानला जातो. या काळात नांगरट, रोटाव्हेटर आदी यंत्रांच्या सहाय्याने जमीन भुसभुशीत करून पेरणीसाठी तयार केली जाते. मात्र यंदा डिझेलच्या अभावामुळे शेतकरी हतबल झाले आहेत. वेळेवर मशागत न झाल्यास जमिनीतील ओलावा टिकत नाही, तण नियंत्रण होत नाही आणि पिकांची वाढ खुंटते. परिणामी संपूर्ण हंगाम धोक्यात येण्याची भीती निर्माण झाली आहे. यंदा दुष्काळाचे सावट असताना ही परिस्थिती अधिकच गंभीर ठरत आहे. “डिझेल नसेल तर शेती करायची कशी?” असा संतप्त सवाल शेतकरी उपस्थित करत आहेत. शेतात काम करावे की पंपावर थांबावे, हा मोठा प्रश्न त्यांच्या समोर उभा ठाकला आहे. दरम्यान, पुढील 8 ते 15 दिवसांत पावसाळा सुरू होण्याची शक्यता असताना वेळेवर...

डिजीप्रेस मिडिया संघटना भारत यांच्या राष्ट्रीय कार्यकारणीची घोषणा

इमेज
डिजीप्रेस मिडिया संघटना भारत यांच्या राष्ट्रीय कार्यकारणीची घोषणा डिजीप्रेस मिडिया संघटना भारत यांच्या राष्ट्रीय कार्यकारणीची नुकतीच घोषणा करण्यात आली असून संस्थापक व राष्ट्रीय अध्यक्षपदी श्री वैष्णव मनोज ढमाळ यांची निवड करण्यात आली आहे. तसेच राष्ट्रीय उपाध्यक्षपदी डॉक्टर सुहास शिवाजी पाटील तर राष्ट्रीय सचिवपदी श्री महेश बाळकृष्ण मोहिते यांची निवड जाहीर करण्यात आली. या निवडीमुळे संघटनेच्या कार्याला नवी दिशा मिळणार असल्याची भावना सदस्यांमधून व्यक्त होत आहे.डिजिटल पत्रकारिता, सामाजिक बांधिलकी आणि माध्यम क्षेत्रातील प्रतिनिधींना एकत्र आणण्याच्या उद्देशाने ही संघटना कार्यरत असून देशभरातील पत्रकार, युट्यूब न्यूज चॅनेल चालक, डिजिटल मिडिया प्रतिनिधी आणि सामाजिक कार्यकर्त्यांना संघटित करण्याचे काम संघटनेकडून केले जात आहे. नव्याने जाहीर झालेल्या राष्ट्रीय कार्यकारणीमुळे संघटनेचा विस्तार अधिक वेगाने होईल, असा विश्वास पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.संस्थापक व राष्ट्रीय अध्यक्ष श्री वैष्णव मनोज ढमाळ यांनी संघटनेच्या माध्यमातून पत्रकारांच्या हक्कांसाठी, डिजिटल मि...