पोस्ट्स

सज्जाद नजीरखान पठाण यांची राष्ट्रीय संघटकपदी निवड

सज्जाद नजीरखान पठाण यांची राष्ट्रीय संघटकपदी निवड डिजिप्रेस मिडिया संघटना भारत यांच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत महत्त्वपूर्ण नियुक्ती करण्यात आली असून, श्री सज्जाद नजीरखान पठाण यांची राष्ट्रीय संघटक या पदावर निवड करण्यात आली आहे. ही निवड संस्थेचे संस्थापक अध्यक्ष वैष्णव ढमाळ साहेब, राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉ. सुहास पाटील साहेब तसेच राष्ट्रीय कार्याध्यक्ष अमोल शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. श्री सज्जाद नजीरखान पठाण हे सामाजिक क्षेत्रातील कार्य, संघटन कौशल्य व जनसंपर्क यासाठी परिचित असून त्यांच्या निवडीमुळे संघटनेच्या राष्ट्रीय स्तरावरील संघटनात्मक कार्याला अधिक गती मिळणार असल्याचा विश्वास पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. त्यांच्या निवडीबद्दल संघटनेचे सर्व पदाधिकारी, सदस्य तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले असून आगामी काळात संघटनेचा विस्तार व बळकटीकरणासाठी ते प्रभावीपणे कार्य करतील, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.

श्री अमित नवनाथ करचे यांची राष्ट्रीय युवक अध्यक्षपदी निवड

इमेज
श्री  अमित नवनाथ करचे यांची राष्ट्रीय युवक अध्यक्षपदी निवड डिजिप्रेस मिडिया संघटना भारत यांच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत महत्त्वपूर्ण नियुक्ती करण्यात आली असून, श्री अमित नवनाथ करचे यांची राष्ट्रीय युवक अध्यक्ष या पदावर निवड करण्यात आली आहे. ही निवड संस्थेचे संस्थापक अध्यक्ष वैष्णव ढमाळ साहेब, राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉ. सुहास पाटील साहेब तसेच राष्ट्रीय कार्याध्यक्ष अमोल शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. श्री अमित करचे हे सामाजिक, पत्रकारिता व युवक संघटन क्षेत्रातील कार्यामुळे परिचित असून त्यांच्या निवडीमुळे संघटनेच्या युवक विभागाला अधिक बळ मिळणार असल्याचा विश्वास पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. त्यांच्या निवडीबद्दल संघटनेतील सर्व पदाधिकारी, सदस्य तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे. आगामी काळात संघटनेची युवक संघटना अधिक मजबूत करून सामाजिक व जनजागृतीपर उपक्रम प्रभावीपणे राबविण्यासाठी ते कार्य करतील, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.

डिजिप्रेस मीडिया संघटना राज्यभर निवड प्रक्रिया जाहीर

इमेज
डिजिप्रेस मीडिया संघटना राज्यभर निवड प्रक्रिया जाहीर  : डिजिटल पत्रकारितेला बळकटी देण्यासाठी डिजिप्रेस मीडिया संघटनाच्या वतीने राज्यभरातील जिल्हा व तालुका स्तरावरील विविध पदांसाठी निवड प्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे. या उपक्रमातून संघटनेचा विस्तार करण्यासोबतच सक्षम व जबाबदार डिजिटल पत्रकारांची फळी तयार करण्याचा उद्देश असल्याचे सांगण्यात आले. जिल्हा स्तरावर जिल्हाध्यक्ष, जिल्हा उपाध्यक्ष, उत्तर/दक्षिण जिल्हाध्यक्ष, जिल्हा सचिव, जिल्हा संघटक व जिल्हा सदस्य अशी पदे भरण्यात येणार आहेत. तसेच तालुका स्तरावर तालुकाध्यक्ष, तालुका उपाध्यक्ष, तालुका सचिव, तालुका संघटक आणि तालुका सदस्य पदांसाठीही इच्छुकांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष वैष्णव ढमाळ यांनी सांगितले की, “सत्याचा आवाज बुलंद करण्यासाठी आणि डिजिटल पत्रकारितेला मजबूत पाया देण्यासाठी ही निवड प्रक्रिया महत्त्वाची ठरणार आहे.” तसेच राष्ट्रीय उपाध्यक्ष सुहास पाटील यांनी इच्छुकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवावा, असे आवाहन केले. इच्छुक उमेदवारांनी अधिक माहितीसाठी दिल...

तुकाराम बाबुराव दुधडे यांची राष्ट्रीय जनसंपर्क अधिकारीपदी नियुक्ती

इमेज
डिजीप्रेस मिडिया संघटना भारत यांच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत महत्त्वपूर्ण नियुक्ती करण्यात आली असून तुकाराम बाबुराव दुधडे यांची राष्ट्रीय जनसंपर्क अधिकारी पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. ही नियुक्ती संस्थेचे संस्थापक अध्यक्ष वैष्णव ढमाळ साहेब तसेच राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉक्टर सुहास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. तुकाराम बाबुराव दुधडे यांच्या निवडीमुळे संस्थेच्या जनसंपर्क विभागाला अधिक बळ मिळणार असून संघटनेचे कार्य अधिक प्रभावीपणे जनतेपर्यंत पोहोचण्यास मदत होणार आहे. त्यांच्या निवडीबद्दल विविध स्तरांतून अभिनंदन व शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

🩸🌱 स्वर्गीय श्रीपती सावंत सर यांच्या प्रथम स्मृतीदिनानिमित्त विविध सामाजिक उपक्रम उत्साहात संपन्न 🌱🩸

इमेज
सांगली जिल्हा प्रतिनिधी मिथुन कांबळे  जयसिंगपूर येथे सोमवार, दि. २५ मे २०२६ रोजी सामाजिक चळवळीतील धडाडीचे आणि सर्वसामान्य कार्यकर्त्यांचे आधारस्तंभ दिवंगत श्रीपती सावंत सर यांच्या प्रथम स्मृतीदिनानिमित्त अभिवादन कार्यक्रम मोठ्या उत्साहात व भावपूर्ण वातावरणात संपन्न झाला. यावेळी सरांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. तसेच त्यांच्या सामाजिक कार्याचा वारसा पुढे चालवत रक्तदान शिबीर, वृक्षारोपण आणि गरजू विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्य संकलन असे विविध समाजोपयोगी उपक्रम राबविण्यात आले. विशेष म्हणजे, सरांच्या स्मृतीप्रीत्यर्थ हार-तुऱ्यांवरील अनावश्यक खर्च टाळून वही, पेन व शालेय साहित्य देण्याचे करण्यात आलेले आवाहन नागरिकांनी उत्स्फूर्तपणे स्वीकारले. या माध्यमातून अनेक गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदतीचा हात देण्यात आला. या उपक्रमाला माजी मंत्री व आमदार माननीय डॉ. राजेंद्र पाटील यड्रावकर साहेब, दत्त सहकारी साखर कारखान्याचे सर्वेसर्वा माननीय गणपतदादा पाटील साहेब, कोल्हापूर जिल्हा परिषद समाजकल्याण सभापती सौ. गायकवाड मॅडम,व श्री अविनाश गायकवाड साहेब...

शेवगाव तालुक्यात डिझेल टंचाई; नांगरटी ठप्प, शेकडो एकर शेती पडीत राहण्याची भीती”

इमेज
शेवगाव (प्रतिनिधी): सज्जाद पठाण  खरीप हंगाम तोंडावर असताना शेवगाव तालुक्यात डिझेल टंचाईने गंभीर स्वरूप धारण केले असून, नांगरटीच्या हंगामात शेतकऱ्यांना मोठा फटका बसत आहे. पंपांवर तासन्तास रांगा लावूनही डिझेल मिळत नसल्याने शेतीची अत्यावश्यक कामे ठप्प झाली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. मे महिना हा मशागतीसाठी अत्यंत महत्त्वाचा कालावधी मानला जातो. या काळात नांगरट, रोटाव्हेटर आदी यंत्रांच्या सहाय्याने जमीन भुसभुशीत करून पेरणीसाठी तयार केली जाते. मात्र यंदा डिझेलच्या अभावामुळे शेतकरी हतबल झाले आहेत. वेळेवर मशागत न झाल्यास जमिनीतील ओलावा टिकत नाही, तण नियंत्रण होत नाही आणि पिकांची वाढ खुंटते. परिणामी संपूर्ण हंगाम धोक्यात येण्याची भीती निर्माण झाली आहे. यंदा दुष्काळाचे सावट असताना ही परिस्थिती अधिकच गंभीर ठरत आहे. “डिझेल नसेल तर शेती करायची कशी?” असा संतप्त सवाल शेतकरी उपस्थित करत आहेत. शेतात काम करावे की पंपावर थांबावे, हा मोठा प्रश्न त्यांच्या समोर उभा ठाकला आहे. दरम्यान, पुढील 8 ते 15 दिवसांत पावसाळा सुरू होण्याची शक्यता असताना वेळेवर...

डिजीप्रेस मिडिया संघटना भारत यांच्या राष्ट्रीय कार्यकारणीची घोषणा

इमेज
डिजीप्रेस मिडिया संघटना भारत यांच्या राष्ट्रीय कार्यकारणीची घोषणा डिजीप्रेस मिडिया संघटना भारत यांच्या राष्ट्रीय कार्यकारणीची नुकतीच घोषणा करण्यात आली असून संस्थापक व राष्ट्रीय अध्यक्षपदी श्री वैष्णव मनोज ढमाळ यांची निवड करण्यात आली आहे. तसेच राष्ट्रीय उपाध्यक्षपदी डॉक्टर सुहास शिवाजी पाटील तर राष्ट्रीय सचिवपदी श्री महेश बाळकृष्ण मोहिते यांची निवड जाहीर करण्यात आली. या निवडीमुळे संघटनेच्या कार्याला नवी दिशा मिळणार असल्याची भावना सदस्यांमधून व्यक्त होत आहे.डिजिटल पत्रकारिता, सामाजिक बांधिलकी आणि माध्यम क्षेत्रातील प्रतिनिधींना एकत्र आणण्याच्या उद्देशाने ही संघटना कार्यरत असून देशभरातील पत्रकार, युट्यूब न्यूज चॅनेल चालक, डिजिटल मिडिया प्रतिनिधी आणि सामाजिक कार्यकर्त्यांना संघटित करण्याचे काम संघटनेकडून केले जात आहे. नव्याने जाहीर झालेल्या राष्ट्रीय कार्यकारणीमुळे संघटनेचा विस्तार अधिक वेगाने होईल, असा विश्वास पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.संस्थापक व राष्ट्रीय अध्यक्ष श्री वैष्णव मनोज ढमाळ यांनी संघटनेच्या माध्यमातून पत्रकारांच्या हक्कांसाठी, डिजिटल मि...

कराड तालुक्यातील मनव गावचे सुपुत्र महेश बाळकृष्ण मोहिते यांची डी.जी. प्रेस मिडीया राष्ट्रीय सचिवपदी निवड

इमेज
कराड तालुक्यातील मनव गावचे सुपुत्र मा. महेश बाळकृष्ण मोहिते यांची डी.जी. प्रेस मिडीयाच्या राष्ट्रीय सचिव पदावर निवड झाल्याबद्दल कराड तालुक्यासह मनव गावात अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. त्यांच्या निवडीमुळे गावाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला असून सामाजिक, संघटनात्मक व पत्रकारिता क्षेत्रातील त्यांच्या कार्याची दखल घेत त्यांच्यावर ही महत्त्वाची जबाबदारी सोपविण्यात आल्याची भावना व्यक्त केली जात आहे. या निवडीमुळे संस्थेच्या राष्ट्रीय स्तरावरील कार्याला नवी दिशा मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे. विविध मान्यवर, पदाधिकारी, मित्रपरिवार व ग्रामस्थांकडून महेश मोहिते यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत असून त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या जात आहेत. “राष्ट्रीय सचिवपदी निवड झाल्याबद्दल मनःपूर्वक अभिनंदन व भावी कार्यासाठी हार्दिक शुभेच्छा.”

शेत वाचवा अभियान’ देशातील 2.712 कोटी नागरिकांपर्यंत पोहोचले; 7.17 लाख शेतकऱ्यांना खतांच्या समतोल वापराबाबत सजग करण्यात आले

इमेज
नवी दिल्‍ली,    केंद्रीय कृषी संशोधन आणि शिक्षण विभागाच्या अखत्यारीतील भारतीय कृषी संशोधन मंडळाने स्वतःच्या देशव्यापी ‘शेत वाचवा अभियानां’तर्गत लक्षणीयरित्या यशस्वी कामगिरी बजावली आहे. हे अभियान मृदा आरोग्य, खतांचा समतोल वापर तसेच शाश्वत शेतीवर अधिक लक्ष केंद्रित करते. ‘शेत वाचवा अभियाना’ने शेतकऱ्यांना तसेच इतर हितसंबंधीयांना शास्त्रीय पोषण व्यवस्थापनाविषयी शिक्षित करण्यासाठी विविध मंचाच्या माध्यमातून देशभरात एक सशक्त संपर्क प्रस्थापित केला आहे. या अभियानांतर्गत आतापर्यंत एकूण 12,979 जागरुकता शिबिरे आणि चर्चासत्रे आयोजित करण्यात आली असून त्यात 7.17 लाख शेतकऱ्यांना प्रत्यक्ष सहभागी करून घेण्यात आले आहे. क्षमता निर्मितीच्या उद्देशाने 3,145 प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आले असून त्यामध्ये 1,11,509 जण सहभागी झाले. तसेच हरित खते, जैविक खते आणि सेंद्रिय स्रोतांशी संबंधित 7,928 क्षेत्र प्रात्यक्षिकांच्या माध्यमातून उपस्थितांना या विषयांचे व्यावहारिक ज्ञान देण्यात आले. मुलभूत स्तरावरील सहभाग सुनिश्चित करण्यासाठी, पंचायती, सरपंच आणि जिल्हा परिषद सदस्यांच्या उत्साही सहभ...

जागतिक पुरवठा साखळीतील वाढत्या आव्हानांच्या पार्श्वभूमीवर, जेएनपीए येथे कंटेनर वाहतूक सुलभ करण्याच्या दिशेने सरकारच्या उपाययोजना केंद्रीय मंत्री पीयूष गोयल आणि सर्बानंद सोनोवाल यांनी आयात-निर्यात उद्योगातील भागधारकांबरोबर जागतिक पुरवठा साखळीतील आव्हानांचा घेतला आढावाव्यवसाय सुलभता टिकवून ठेवण्यासाठी रेल्वेद्वारे मालाची जलद उचल, हाताळणी शुल्क माफी, ग्रीन चॅनेल्स आणि ट्रेलर पूलिंग यासारख्या उपाययोजना लागू

इमेज
नवी दिल्‍ली   जागतिक पुरवठा साखळीतील आव्हानांच्या पार्श्वभूमीवर 'व्यवसाय सुलभता' टिकवून ठेवण्यासाठी आणि अखंड व्यापार परिचालन सुनिश्चित करण्यासाठी निर्णायक पाऊल उचलत, भारत सरकारने आयात-निर्यात (एक्झिम) समुदायाने उपस्थित केलेल्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी समन्वित ‘संपूर्ण सरकार’ प्रतिसाद लागू केला आहे. केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल आणि केंद्रीय बंदरे, नौवहन आणि जलमार्ग मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी 'ऑल इंडिया लिक्विड बल्क इम्पोर्टर्स अँड एक्सपोर्टर्स असोसिएशन'च्या  प्रतिनिधींबरोबर उच्चस्तरीय बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी सध्याच्या बदलत्या परिस्थितीचा आढावा घेतला, तसेच मालाची वाहतूक सुरळीत आणि जलद गतीने व्हावी यासाठी कामकाजातील अडथळे दूर करण्याच्या दृष्टीने तातडीच्या आणि दीर्घकालीन उपाययोजनांवर चर्चा केली. या बैठकीत कंटेनर्सच्या अधिक सुरळीत हालचालींवर लक्ष केंद्रित करण्यात आले; कारण आखाती देशांकडे जाणारे कंटेनर्स आता जवाहरलाल नेहरू बंदर प्राधिकरणाकडे (जेएनपीए) वळवण्यात आले आहेत, त्यामुळे बंदर आणि लॉजिस्टिक्सच्या पायाभ...

बीड नगर परिषद अतिक्रमण पथकावर कारवाई करा –द युवा ग्रामीण पत्रकार संघ आक्रमक

इमेज
 बीड : बीड शहरातील नगर परिषदेच्या अतिक्रमण विभागाकडून करण्यात आलेल्या कारवाईदरम्यान एका महिला भाजी विक्रेत्यासोबत अमानवी व अयोग्य वर्तन झाल्याचा आरोप करण्यात आला असून, या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी युवा ग्रामीण पत्रकार संघाने केली आहे. संघाचे संस्थापक अध्यक्ष अन्सार शेख यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार सादर केली असल्याचे सांगितले जाते. कारवाईदरम्यान महिला कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती का, संबंधित नियमांचे पालन झाले का आणि मानवी हक्कांचे उल्लंघन झाले का याची चौकशी व्हावी अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच संबंधित महिलेला न्याय न मिळाल्यास प्रकरण उच्च न्यायालय तसेच संबंधित आयोगांकडे नेण्याचा इशाराही देण्यात आला आहे. कारवाईच्या वेळी उपस्थित अधिकारी, कर्मचाऱ्यांचे जबाब, व्हिडिओ व इतर पुरावे तपासून निष्पक्ष निर्णय घेण्याची मागणी संघटनेकडून करण्यात आली आहे. या प्रकरणामुळे स्थानिक स्तरावर चर्चा सुरू असून प्रशासनाने तातडीने दखल घेऊन योग्य ती कार्यवाही करावी, अशी मागणी नागरिकांकडूनही व्यक्त होत आहे.

डिजीप्रेस मीडिया संघटना भारत

इमेज
📢 डिजीप्रेस मीडिया संघटना भारत 📢 नोंदणी क्र.: U88900PN2026NPL254356 🏛️ नियुक्ती जाहिरात – २०२६ पत्रकार, डिजिटल मीडिया क्रिएटर्स व माध्यम क्षेत्रातील सहकाऱ्यांसाठी सुवर्णसंधी! ‘डिजीप्रेस मीडिया संघटना भारत’ या राष्ट्रीय स्तरावर कार्यरत संघटनेच्या माध्यमातून पत्रकार, डिजिटल मीडिया प्रतिनिधी व माध्यम क्षेत्रातील कार्यकर्त्यांचे संघटन मजबूत करण्यासाठी जिल्हा व तालुका स्तरावरील नियुक्ती प्रक्रिया सुरू करण्यात येत आहे. 📋 उपलब्ध पदे 🔹 जिल्हा स्तर • जिल्हाध्यक्ष • जिल्हा उपाध्यक्ष • जिल्हा सचिव • जिल्हा संघटक • जिल्हा सदस्य 🔹 तालुका स्तर • तालुका अध्यक्ष • तालुका उपाध्यक्ष • तालुका सचिव • तालुका संघटक • तालुका सदस्य 🎯 संघटनेची उद्दिष्टे ✅ पत्रकार व डिजिटल मीडिया प्रतिनिधींना सक्षम व्यासपीठ उपलब्ध करून देणे ✅ माध्यम क्षेत्रातील हक्क व समस्यांवर संघटितपणे काम करणे ✅ ग्रामीण व शहरी माध्यम प्रतिनिधींमध्ये समन्वय निर्माण करणे ✅ माध्यम क्षेत्रात संघटनात्मक बळकटी निर्माण करणे 📞 संपर्क व नाव नोंदणी संस्थापक अध्यक्ष वैष्णव ढमाळ 📱 ८३९०७८९३२८ राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉ. सुहास पाटील 📱 ९८...

सौ. निकिता वैभव जाधव यांची डिजीप्रेस मिडिया संघटना भारत पलूस तालुका महिला अध्यक्षपदी नियुक्ती

इमेज
डिजीप्रेस मिडिया संघटना भारत या संस्थेच्या पलूस तालुका महिला अध्यक्षपदी सौ. निकिता वैभव जाधव यांची अधिकृत नियुक्ती करण्यात आली आहे. ही नियुक्ती संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री. वैष्णव ढमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉ. सुहास पाटील यांच्या नेतृत्वाखाली पार पडली. संस्थेच्या संघटनात्मक विस्ताराच्या दृष्टीने ही नियुक्ती महत्त्वपूर्ण मानली जात असून, सौ. निकिता जाधव या आपल्या नव्या जबाबदारीतून महिला संघटन बळकटीकरण, सामाजिक उपक्रमांचा विस्तार आणि तालुकास्तरीय संघटनात्मक कामकाज अधिक प्रभावीपणे पार पाडतील, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. संस्थेकडून त्यांना पुढील कार्यकाळासाठी हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.

ब्रेन बूस्टर अबॅकस क्लासेसच्या वार्षिक स्पर्धा परीक्षेच्या भव्य बक्षीस वितरण सोहळ्यास उत्स्फूर्त प्रतिसाद

इमेज
लोणंद प्रतिनिधी.... पांडुरंग कुंभार लोणंद, दि. १७ मे २०२६ : विद्यार्थ्यांच्या बौद्धिक विकासाला चालना देणाऱ्या ब्रेन बूस्टर अबॅकस क्लासेस, लोणंद यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला “भव्य बक्षीस वितरण सोहळा” अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात आणि दिमाखात संपन्न झाला. विद्यार्थ्यांचे यश, पालकांचा विश्वास आणि शिक्षकांचे अथक परिश्रम यांचा सुंदर संगम या कार्यक्रमात अनुभवायला मिळाला. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. श्री. नीलेश सरक (डायरेक्टर, विघ्नहर्ता हॉस्पिटल, लोणंद) तसेच डॉ. सौ. नीलम सरक (स्त्री रोग तज्ञ) यांनी उपस्थित राहून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. आपल्या व्यस्त दिनचर्येतून वेळ काढून त्यांनी कार्यक्रमाला उपस्थिती लावली आणि विद्यार्थ्यांचा उत्साह द्विगुणित केला. कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवरायांना वंदन करून आणि पुष्पहार अर्पण करून झाली. त्यानंतर विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक सादरीकरणे, अबॅकस कौशल्य प्रात्यक्षिके आणि बौद्धिक खेळांद्वारे उपस्थितांची मने जिंकली. विद्यार्थ्यांच्या जलद गणितीय कौशल्याचे सादरीकरण पाहून उपस्थित पालक आणि मान्यवरांनी आश्चर्य व्यक्त केले...

दौंड तालुक्यातील केडगाव, चौफुला, बोरीपार्धी विकासाची केंद्रे की दारूचे हब? वाढत्या अपघातांमुळे नागरिक चिंतेत

दौंड तालुक्यातील केडगाव, चौफुला, बोरीपार्धी विकासाची केंद्रे की दारूचे हब? वाढत्या अपघातांमुळे नागरिक चिंतेत नवनाथ खोपडे-प्रतिनिधी:-(दौंड) दौंड तालुक्यातील केडगाव, चौफुला आणि बोरीपार्धी ही गावे सध्या विकासाची नवी केंद्रे म्हणून उदयास येत आहेत. या भागात आधुनिक हॉस्पिटल सुविधा, नामांकित कंपन्यांचे मोटार शोरूम आणि दर्जेदार शैक्षणिक संस्थांचे जाळे निर्माण झाले आहे. मात्र, या विकासाच्या झगमगाटात एक भीषण वास्तव समोर येत असून, ही गावे आता 'दारूचे हब' बनू लागली आहेत की काय, असा प्रश्न नागरिक विचारत आहेत. विदारक वास्तव आणि वाढते धोके: स्थानिक नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार, विशेषतः चौफुला परिसरात रात्रीच्या वेळी दारू पिणाऱ्यांची जणू जत्राच भरते. सार्वजनिक ठिकाणी आणि रस्त्याच्या कडेला मद्यधुंद अवस्थेत फिरणाऱ्या व्यक्तींमुळे सर्वसामान्यांना चालणेही कठीण झाले आहे. या बेशिस्त वर्तनामुळे आणि मद्यपान करून गाड्या चालवल्यामुळे परिसरात अपघातांचे प्रमाण कमालीचे वाढले आहे. पुढच्या पिढीवर टांगती तलवार: हा सर्व प्रकार शालेय विद्यार्थी आणि तरुणांच्या डोळ्यांसमोर घडत असल्याने, पुढच्या पिढीवर याचे अत्...

महाराष्ट्रात 21 वी पशुगणनेचे मानधन रखडले; प्रगणकांमध्ये नाराजी

महाराष्ट्र रक्षक न्यूज | विशेष वृत्त डॉ सुहास पाटील सातारा जिल्हा प्रतिनिधी  महाराष्ट्रात पशुसंवर्धन विभागाकडून करण्यात आलेल्या 21 व्या पशुगणनेचे मानधन अद्याप प्रलंबित असल्याने प्रगणकांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. फेब्रुवारी 2025 मध्ये सुरू झालेली ही पशुगणना मे अखेरपर्यंत यशस्वीरित्या पूर्ण करण्यात आली होती. या कामासाठी पशुसंवर्धन विभागामार्फत प्रगणक आणि सुपरवायझर यांची नेमणूक करण्यात आली होती. प्रगणकांना प्रति कुटुंब शहरी भागासाठी 9 रुपये आणि ग्रामीण भागासाठी 10 रुपये मानधन देण्याचे जाहीर करण्यात आले होते. तसेच ऑनलाइन माहिती भरण्यासाठीही अतिरिक्त मानधन देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र, पशुगणना पूर्ण होऊन दीड वर्ष उलटून गेले असतानाही प्रगणकांना केवळ मोबाईल बिलाचा खर्च मिळाला असून मूळ मानधन अद्याप मिळालेले नाही. याबाबत तालुका पशुसंवर्धन अधिकाऱ्यांकडे चौकशी केली असता, मानधन केंद्र शासनाच्या पशुसंवर्धन विभागाकडून येणार असल्याने नेमके कधी मिळेल याबाबत स्पष्ट माहिती नसल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, या परिस्थितीमुळे प्रगणकांमध्ये तीव्र नाराजी पसरली असून भविष...

महाराष्ट्र रक्षक न्यूज सातारा ब्रेकिंग न्यूज पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांची सांगलीला बदली निखील पिंगळे साताऱ्याचे नवे एसपी

इमेज

डॉ.दिलीपराव चव्हाण यांचे निधन; “शब्दाला जागणारा नेता” हरपल्याने सर्वत्र हळहळ

इमेज
डॉ.दिलीपराव चव्हाण यांचे निधन; “शब्दाला जागणारा नेता” हरपल्याने सर्वत्र हळहळ पाटण प्रतिनिधी  कुंभारगाव (ता. पाटण) येथील बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखाना, मरळीचे माजी चेअरमन व विद्यमान संचालक कै. डॉ. दिलीपराव बापुराव चव्हाण यांचे वयाच्या ७१ व्या वर्षी अकस्मात निधन झाले. त्यांच्या निधनाने पाटण तालुक्यासह संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. आज सोमवार दिनांक २० एप्रिल २०२६ रोजी दुपारी १२.३० वाजता कुंभारगाव येथील वैकुंठधाम येथे त्यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री , शंभूराजे देसाई साहेब ,यशराज (दादा) देसाई, रविराज देसाई, कारखान्याचे चेअरमन, व्हाईस चेअरमन, संचालक मंडळ, विविध क्षेत्रातील पदाधिकारी, जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित राहून त्यांनी श्रद्धांजली अर्पण केली. कै. डॉ. दिलीपराव चव्हाण हे केवळ एक राजकीय कार्यकर्ते नव्हते, तर देसाई गटाचे खंबीर आधारस्तंभ होते. गट अडचणीत असताना त्यांनी नेहमीच धीर देत योग्य मार्गदर्शन केले.पाटण तालुक्यातील कुंभारगाव–ढेबेवाडी परिसरात त्यांनी तळागाळ...

कराड दक्षिण येळगाव येथे गॅसधारकांना घरपोच सिलेंडर सेवा ठप्प; दोन महिन्यांपासून नागरिक त्रस्त

इमेज
कराड दक्षिण येळगाव येथे गॅसधारकांना घरपोच सिलेंडर सेवा ठप्प; दोन महिन्यांपासून नागरिक त्रस्त  रामचंद्र धुळप कराड तालुका प्रतिनिधी  कराड तालुक्यातील दक्षिण येळगाव परिसरात गॅसधारकांना घरपोच गॅस सिलेंडर सेवा मिळत नसल्यामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. गेल्या दोन महिन्यांपासून ही समस्या कायम असल्याचे समोर आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दक्षिण येळगाव परिसरातील ग्राहकांना गॅस सिलेंडर मिळवण्यासाठी स्वतः एजन्सीपर्यंत जावे लागत आहे. त्यामुळे विशेषतः ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. संबंधित ओम शिवम गॅस एजन्सी कडून घरपोच सेवा सुरू करण्याबाबत वारंवार आश्वासन दिले जात असले तरी प्रत्यक्षात सेवा सुरू झालेली नाही, अशी तक्रार नागरिकांनी केली आहे. अधिकारी सतत उद्यापासून घरपोच सेवा सुरू होईल असे सांगतात; मात्र गेल्या दोन महिन्यांपासून आम्ही हेच ऐकत आहोत,” असे श्री. आनंदा शेवाळे यांनी सांगितले. दरम्यान, संबंधित प्रशासनाने या समस्येकडे तातडीने लक्ष देऊन घरपोच गॅस वितरण सेवा सुरू करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

Airtel Payments Bank च्या खातेदाराच्या वारसांना बँकेकडून 2 लाख रुपयांची आर्थिक मदत

इमेज
Airtel Payments Bank च्या खातेदाराच्या वारसांना बँकेकडून 2 लाख रुपयांची आर्थिक मदत रामचंद्र धुळप कराड तालुका प्रतिनिधी  कराड तालुक्यातील रस्ते अपघातात मृत्यू झालेल्या Airtel Payments Bank च्या एका खातेदाराच्या वारसांना बँकेकडून 2 लाख रुपयांची आर्थिक मदत देण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बाळासो कृष्णा शेवाळे (वय 70, रा. शेवाळेवाडी, येवती) यांचा गलमेवाडी–येवती रस्त्यावर झालेल्या भीषण अपघातात मृत्यू झाला. घटनेनंतर कुटुंबीयांनी सर्व आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून बँक प्रतिनिधी सौ. रोमा धुळप यांच्याकडे Airtel Payments Bank मध्ये विमा दाव्यासाठी अर्ज दाखल केला होता. बँकेने पडताळणी पूर्ण केल्यानंतर विमा योजनेअंतर्गत 2 लाख रुपयांची रक्कम वारसांना मंजूर करण्यात आली. सदर विमा रक्कम मिळवून देण्यासाठी साऊथ महाराष्ट्र (कोल्हापूर विभाग) चे CGO श्री. रविराज पाटील यांनी मोलाचे सहकार्य केले. तसेच झोनल मॅनेजर श्री. प्रवीण भोपळे आणि सातारा विभागाच्या ZTM आस्मा शेख यांनीही आवश्यक पाठपुरावा केला. ही रक्कम Airtel Payments Bank शाखा, शेवाळेवाडी (म्हासोली) येथे मृताच्या वारस आकाताताई ...

जि. प. शाळा गलांडवाडी येथे समर्थ शेंडगे याचा वाढदिवस खाऊ वाटपाने साजरा

इमेज
## **जि. प. शाळा गलांडवाडी येथे समर्थ शेंडगे याचा वाढदिवस खाऊ वाटपाने साजरा** **गलांडवाडी (प्रतिनिधी):**अमोल शिंदे  येथील **जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, गलांडवाडी** येथे इयत्ता पाचवीतील विद्यार्थी **कु. समर्थ रामदास शेंडगे** याचा वाढदिवस मोठ्या उत्साहात आणि सामाजिक बांधिलकी जपत साजरा करण्यात आला. या वाढदिवसाचे औचित्य साधून शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करण्यात आले. आजच्या काळात वाढदिवसावर विनाकारण खर्च न करता, तो आपल्या शाळेतील मित्र-मैत्रिणींसोबत आनंदात साजरा करावा, या हेतूने शेंडगे परिवाराने या उपक्रमाचे आयोजन केले होते. समर्थने आपल्या वाढदिवसानिमित्त वर्गातील आणि शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना खाऊ वाटून आनंद द्विगुणित केला. > "समर्थने आपल्या वाढदिवसाचा आनंद इतर विद्यार्थ्यांसोबत वाटून एक चांगला आदर्श ठेवला आहे. अशा उपक्रमांमुळे मुलांमध्ये आपुलकी आणि स्नेहाची भावना निर्माण होते," असे मत शाळेतील शिक्षकांनी व्यक्त केले. >  याप्रसंगी शाळेतील मुख्याध्यापक, शिक्षक वृंद, समर्थचे वडील श्री. रामदास शेंडगे आणि मित्रमंडळी उपस्थित होते. सर्व शिक्षकांनी आणि विद...

भव्य हिंदू संमेलनात पावसाचीही हजेरी

इमेज
भव्य हिंदू संमेलनात पावसाचीही हजेरी करडा प्रतिनिधी –  शेवाळवाडी येथे आयोजित करण्यात आलेल्या भव्य हिंदू संमेलनाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. मोठ्या संख्येने उपस्थित राहून नागरिकांनी कार्यक्रमाची शोभा वाढवली. धार्मिक आणि सांस्कृतिक वातावरणात पार पडलेल्या या संमेलनात विविध मान्यवरांनी मार्गदर्शन करत समाज एकजुटीचा संदेश दिला. दरम्यान, सायंकाळी सुमारे ५ वाजण्याच्या सुमारास अचानक पावसानेही आपली हजेरी लावली. मेघराजांच्या या आगमनामुळे वातावरण अधिक प्रसन्न झाले. पावसाच्या सरींनाही न जुमानता उपस्थितांनी कार्यक्रमात उत्साहाने सहभाग घेतला. या संमेलनामुळे परिसरात धार्मिक एकात्मता आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून कार्यक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

मंथन परीक्षेत देऊळगाव गाडा जिल्हा परिषद शाळेचे वर्चस्व; केंद्रातील पहिल्या ५ क्रमांकांत शाळेच्या ३ विद्यार्थिनी!

इमेज
  देऊळगाव गाडा (प्रतिनिधी):अमोल शिंदे  फेब्रुवारी २०२६ मध्ये घेण्यात आलेल्या 'मंथन राज्यस्तरीय सामान्य ज्ञान परीक्षेत' जिल्हा परिषद प्राथमिक शाळा देऊळगाव गाडा येथील विद्यार्थिनींनी दैदिप्यमान यश संपादन केले आहे. विशेष म्हणजे, केडगाव केंद्रामधून काढण्यात आलेल्या पहिल्या पाच क्रमांकांपैकी तब्बल तीन क्रमांक याच शाळेच्या विद्यार्थिनींनी पटकावत शाळेचा आणि गावाचा नावलौकिक वाढवला आहे. यशस्वी विद्यार्थिनींची कामगिरी:  कु. स्वरा मनोज शितोळे (इयत्ता ४ थी): हिने ३०० पैकी २४४ गुण मिळवून केडगाव केंद्रामध्ये प्रथम क्रमांक पटकावला. तिने राज्यात २१ वा, जिल्ह्यात २४ वा तर तालुक्यात १५ वा क्रमांक मिळवला आहे.  कु. श्रेया विजय दगडे (इयत्ता ४ थी): ३०० पैकी २३२ गुण मिळवून केंद्रामध्ये पाचवा क्रमांक मिळवला. तिने राज्यात ३५ वा, जिल्ह्यात ३० वा तर तालुक्यात २१ वा क्रमांक प्राप्त केला.  कु. श्रुती विजय दगडे (इयत्ता ४ थी): हिने देखील ३०० पैकी २३२ गुण मिळवून केंद्रामध्ये पाचवा क्रमांक प्राप्त केला आहे. एकाच शाळेतील तीन मुलींनी केंद्रस्तरीय गुणवत्ता यादीत स्थान मिळवल...

व्हॉईस ऑफ मीडिया सातारा जिल्ह्याच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

सातारा | प्रतिनिधी : सुहास पाटील  राज्यातील वृत्तपत्र उद्योगाला आर्थिक अडचणींमधून बाहेर काढण्यासाठी तसेच पत्रकारांवर होणाऱ्या अन्यायाला आळा घालण्यासाठी व्हॉईस ऑफ मीडिया सातारा जिल्ह्याच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले. या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, सन 2019 पासून कागद, प्रिंटिंग साहित्य, वीज, केमिकल्स आणि मनुष्यबळ खर्चामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून जवळपास 150 टक्क्यांपर्यंत खर्च वाढलेला आहे. मात्र, शासनाच्या जाहिरात दरामध्ये कोणतीही वाढ झालेली नाही. त्यामुळे लघु व मध्यम वृत्तपत्रे आर्थिक संकटात सापडली आहेत. यावर उपाय म्हणून शासनाने किमान 150% जाहिरात दरवाढ करावी, अशी प्रमुख मागणी करण्यात आली आहे. तसेच, जाहिरात बिलांचे 30 दिवसांत भुगतान करावे ई-टेंडर नोटीस पूर्ण स्वरूपात वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध करावी जाहिरात वितरणात पारदर्शकता राखावी 25 वर्षे पूर्ण केलेल्या वृत्तपत्रांना नैसर्गिक दरवाढ लागू करावी अशा विविध मागण्या निवेदनातून करण्यात आल्या आहेत. यावेळी राज्यातील पत्रकारांवर वाढत्या हल्ल्यांबाबतही चिंता व्यक्त करण्यात आली. अकोला, नांदेड, रत्नागिरी, पनव...

प्रथम वर्धापन दिन

इमेज

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष म्हणून अहिल्यानगरात सक्रिय कार्य

इमेज
शेवगाव प्रतिनिधी सज्जाद पठाण  स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष म्हणून अहिल्यानगरात सक्रिय कार्य   अहिल्यानगर : शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर ठामपणे आवाज उठवत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष दत्तात्रय बाळकृष्ण फुंदे यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. शेतीमालाला हमीभाव, वीजदर सवलत, पाणीटंचाई आणि पीकविमा यांसारख्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर त्यांनी प्रशासनाचे लक्षन वेधले आहे. फुंदे यांनी सांगितले की, शेतकरी हा देशाचा कणा असून त्याच्या अडचणी तात्काळ सोडवणे गरजेचे आहे. शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी संघटनेच्या माध्यमातून विविध आंदोलने आणि निवेदने देण्यात येत आहेत. अहिल्यानगर जिल्ह्यातील अनेक भागांत त्यांनी दौरे करून शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या असून त्या सोडवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. आगामी काळात मोठ्या प्रमाणात आंदोलन छेडण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.

इस्लामपूर येथे ‘A’ ग्रेड पशुधन व्यवस्थापन व दुग्धोत्पादन पदविका अभ्यासक्रमासाठी प्रवेश सुरू

इमेज
प्रतिनिधी सुहास पाटील इस्लामपूर येथे ‘A’ ग्रेड पशुधन व्यवस्थापन व दुग्धोत्पादन पदविका अभ्यासक्रमासाठी प्रवेश सुरू    इस्लामपूर : महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ, नागपूर मान्यताप्राप्त पशुधन व्यवस्थापन व दुग्धोत्पादन पदविका विद्यालय, इस्लामपूर येथे नवीन शैक्षणिक वर्षासाठी व्हेटरनरी डिप्लोमा (Veterinary Diploma) अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रिया सुरू झाल्या आहेत. गणेश शिक्षण प्रसारक मंडळ, साखराळे (इस्लामपूर) संचलित या संस्थेला ‘A’ ग्रेड मान्यता प्राप्त असून विद्यार्थ्यांसाठी उत्तम शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहेत. सदर अभ्यासक्रमाचा कालावधी २ वर्षे असून प्रवेश क्षमता ६० विद्यार्थ्यांची आहे. तसेच प्रवेशासाठी १०वी किंवा १२वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. या अभ्यासक्रमाद्वारे विद्यार्थ्यांना पशुधन व्यवस्थापन, दुग्ध व्यवसाय, पोल्ट्री व्यवस्थापन, तसेच विविध पशुसंवर्धन क्षेत्रातील प्रशिक्षण दिले जाणार आहे. अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर विद्यार्थ्यांना स्वयंरोजगाराच्या विविध संधी उपलब्ध होणार असून, शासकीय व निमशासकीय संस्थांमध्येही रोजगाराच्या संधी निर्माण होणा...

हिंगणगाव येथील जगताप डी.पी. प्रश्न अखेर मार्गी; ग्रामस्थांकडून आमदार व नेत्यांचे आभार

इमेज
फलटण विशेष प्रतिनिधी शंकर भोईटे  हिंगणगाव येथील जगताप डी.पी. प्रश्न अखेर मार्गी; ग्रामस्थांकडून आमदार व नेत्यांचे आभार  हिंगणगाव : गावातील दीर्घकाळ प्रलंबित असलेला जगताप डी.पी. (वीज वितरण) प्रश्न अखेर मार्गी लागला असून ग्रामस्थांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. या प्रश्नाच्या सोडवणुकीसाठी माननीय रणजीत सिंह नाईक निंबाळकर, आमदार सचिन पाटील तसेच प्रल्हाद तात्या साळुंखे पाटील आणि अभीभैया निंबाळकर यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. स्थानिक पातळीवरून दत्ता भोईटे, रमेश तात्या भोईटे आणि पंकज अहिरेकर यांनी आमदार साहेब व अभीभैय्या यांना संपर्क साधून जगताप डी.पी. संदर्भातील सविस्तर माहिती दिली. ही माहिती मिळताच आमदार साहेब आणि अभीभैय्या यांनी तात्काळ संबंधित अधिकाऱ्यांना सूचना करून प्रश्न सोडवण्याचे आदेश दिले. त्यांच्या तातडीच्या हस्तक्षेपामुळे हा प्रश्न अल्पावधीत मार्गी लागला. यामुळे हिंगणगाव ग्रामस्थांनी आमदार साहेब व अभीभैय्या यांचे मनापासून आभार मानत समाधान व्यक्त केले आहे.